platelets meaning in marathi - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, November 15, 2015

platelets meaning in marathi

⚡‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’⚡


हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.





हिमोग्लोबिन,

प्लाझ्माप्रमाणे

प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.

 तसेच 

रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होऊ न देण्याचं आणि रक्त पातळ होऊ न देण्याचं काम  ‘प्लेटलेट्स’ करतात.


या प्लेटलेट्स एखाद्या प्लेट सारख्या दिसतात. 
म्हणूनच शास्त्रज्ञांनी  याना ‘प्लेटलेट्स’ असे नाव दिले आहे.




या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’

ही संज्ञा वापरली आहे.


रक्तामध्ये प्रामुख्याने पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी), लालपेशी (आरबीसी),

आणि

प्लेटलेट्स (तंतुकणिका) या तीन पेशी असतात.



त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वात अधिक असते.

प्लेटलेट्स 

मेगा कॅरोसाइट्स या या मोठया हाडांतील

रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या पेशींपासून तयार होतात.

त्यांचं सर्वसाधारणपणे  रक्तातील आयुष्य 5-9 दिवसांचे आहे .

 प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये जुन्या झालेल्या प्लेटलेट्स नाश पावतात.


⚡प्लेटलेट्सचं कार्य⚡


रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही असणें  गरजेचे असते.

 रक्त ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य करत.

व शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण रक्त  करते.

  एखादी जखम झाल्यानंतर  रक्त जास्त प्रमाणात वाहून गेल्यानंतर  जीवितहानी  होऊ शकते. 


या वेळेस जखमेच्या  ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचे कार्य करत असतात .

त्यामुळे 
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ असे म्हटलं जाते .


⚡प्लेटलेट्सची संख्या ⚡


मानवी शरीरात प्लेटलेट्सची संख्या सामान्य पणे  दीड ते साडेचार लाख इतकी असते.


संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,

रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.

हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,

शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.


संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.

म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.

त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.

जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.

जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.


⚡प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं


• डेंग्यू, मलेरियाचा ताप

• अनुवंशिक आजार

• केमोथेरपी


⚡संख्या कमी झाल्यास...

साथीच्या तापात जसे 
डेंग्यू, मलेरिया मध्ये प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.

त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,

त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.


⚡प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :


• लसूण खाऊ नये.

• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.

• अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.

• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.

• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.

• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.

• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


प्लेटलेट्स कमी झाल्यास,

त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.

प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.

पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.



⚡नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .




जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.


शरीरातील   प्‍लेटलेट्स ची संख्या कमी होण्याच्या अवस्थेला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखतात.   सामान्य पणे प्लेटलेट काउंट निरोगी व्यक्तीच्या शरीरात 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु  हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली आल्यास याला लो प्लेटलेट मानल जाते. अनुवांशिक रोग, काही   औषधामुळे ,  कँसर मधील केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहल , विशिष्ठ प्रकारचे आजार जसे  डेंग्यू, चिकनगुणया  मलेरिया, झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्स  संख्या कमी होते .


   आहारात कोणत्या पदार्थांचा प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी  समावेश करावा?


⚡१.पपई -⚡


पपई  झाडाची पानं आणि  पपईचे फळ दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.




⚡२.गुळवेल⚡


गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.  1 चमचा मधा बरोबर  2 चमचे गुळवेल सत्व दिवसातून 2 वेळेस घ्या किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल.  आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर गुळवेल सत्व सहजपणे उपलब्ध होते.


⚡३.आवळा⚡

आवळा हा 
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी  आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये  व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात उपलब्ध असते जे प्लेटलेट्स वाढवण्याचे व प्रतिकार शक्ती  मजबूत करण्यास मदत करते. दररोज रिकाम्या पोटी सकाळी नियमितपणे 3-4 आवळे खावेत. 2 चमचे आवळा  ज्यूसमध्ये तुम्ही  मध टाकून हे मिश्रण घेऊ शकता.




⚡४.भोपळा⚡


भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधारणा   होण्या करिता उपयोग आहार आहे 

हे. व्हिटॅमिन 'ए' ने युक्त भोपळा असल्याने  प्लेटलेट चा योग्य विकास होण्या करिता मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.


⚡५.पालक⚡


व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत पालक आहे अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर  पाणी थंड झाल्यानंतर यात  अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळेस घ्या. तुम्ही पालकाचे सेवन या व्यतिरिक्त  सलाड, सूप, भाजी या स्वरुपात करू शकता.


⚡६.नारळ पाणी⚡

नारळ पाणी
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात  खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यात  इलेक्ट्रोलाइट्स मोट्या प्रमाणात असतात. त्याच बरोबर हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे पाणी शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयोगी आहे.


⚡७.बीट ⚡

प्लेटलेट वाढवन्यासाठी 
बीटचे सेवन  सर्वात लोकप्रिय आहार आहे. प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम  नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट व हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट करते. २ते ३मचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्स ची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.


Please share to all to improve health

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here