आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल? या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात.
१) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय?
२) आणि सध्या तुम्हाला संगत कुणाची आहे?
चांगली पुस्तकंपण वाचत नसाल, आणि बरी माणसंपण आपल्या अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्याने कुणी सांगायला हवं?
- मला वाटतं तरुण मुलांनी फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी ते त्यांचं जगणं एका खास उंचीवर नेऊ शकतात.
१)जे कराल, ते उत्तम करा!
विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्या कुणाशी आहे! जे करायच ते उत्तमच करायच , पहिल्या वेळेसच असं काहीतरी खास करा की, ते उत्तमोत्तम असलं पाहिजे याची काळजी घ्या आणि जे जे केलं, त्या पेक्षा काहीतरी चांगलं करण्याची तयारी करा!
२) इन्व्हॉल्व व्हा
आपण जर प्रश्न सोडवायला तयार नसेल तर आपण त्या प्रश्नाचाच एक भाग बनून जातो, आनि स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे त्यामुळे नेहमी तक्रार करणं सोडल पाहिजे , जे समोर येईल त्याच्याशी भिडलं पाहिजे . त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.
३)थोडंसं एक्स्ट्रा
लोकांच्या अपेक्षांपेक्षा काहीतरी जास्त करण्याचा , प्रयत्न जास्त करून अपेक्षांपेक्षा जास्त काम करण्याची तयारी ठेवा.
जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळंच करतात, तुम्ही काहीतरी एक्सट्रा करणार की नाही हे ठरवा!
४) भूमिका घ्या
सगळंच गोलमोल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. किंबहुना निष्ठा ठेवा, भूमिकाच घ्या व त्यावर ठाम रहायाला शिका
५) फोकस
तुमचं ध्येय काय आहे , तुम्हाला नक्की काय करायचंय , हे विसरूच नका. काहीही झालं तरी, तुमचे लक्ष हलता कामा नये.
६) मित्र जपूनच निवडा.
बरेच वेळा नेता चांगला असतो, पण त्याचे सल्लागारच बाद असतात, हे वाक्य आपण नेहमी च ऐकतो. तसं आपलंहि व्हायला नको , म्हणूनच मित्रच चांगले व जपून निवडा. चांगल्या यशस्वी माणसावर लक्ष द्या त्यांचे दोस्त पहा, संगतीचा परिणाम होतोच.
७) स्वत:वर भरवसा ठेवा
अनेकदा इथंच गाडं घसरतं. असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा.
८) कॅरॅक्टर जपा.
एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही लोकां विषयी आपणास वाटतं भलतंच, पण ती वेगळीच असतात . त्यामुळे आपली प्रतिमा काय तयार होतेय याकडे लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.
९) जगायचं कशासाठी?
विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.
१0) दिवसाची सुरुवात आनंदी
उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या पासून स्वत:ला सकारात्मक ऊर्जेचा एक डोस द्या. 100

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.