narendra modi speech - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 14, 2015

narendra modi speech

गिल्डहॉल, लंडन येथील भारत-इंग्लंड व्यापारविषयक बैठकीदरम्यानचे पंतप्रधानांचे भाषणआदरणीय श्री डेव्हिड कॅमेरॉन.

आदरणीय श्री ऍलन यारो, लंडनचे महापौर.

उपस्थित सर्व मान्यवर.आज संध्याकाळी तुम्हा सर्वांसमवेत असल्याचा मला आनंद आहे. मला एका गोष्टीचा खेद आहे कि , मला  या संपन्न देशात यायला उशीरच  झाला म्हणावस वाटतंय . परंतु , एक चांगली गोष्ट म्हणजे मी आणि माननीय कॅमेरॉन एकमेकांच्या नेहमी संपर्कात असतो .
दोघेही नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळी भेटत असतो आणि एकमेकांची मते माहिती करून घेत असतो. मागच्या वेळी आम्ही न्यूयॉर्कमध्ये भेटलो होतो आणि त्यावेळी कॅमेरुन म्हणाले होते की, भारत आणि इंग्लंडने आर्थिक आघाडीवर एकत्रित काम केले पाहिजे.

मित्रहो!

भारत आणि इंग्लंड परस्परांना कित्येक शतकांपासून चांगले ओळखतात. आमची शासनपद्धती ही मुख्यत्वे वेस्टमिनिस्टर मॉडेलवर आधारित आहे.

आमचे  देश परस्पराशी कसा संपर्क करायचा हे जाणतात

- एकमेकांसोबत कसे कार्य करायचे हे लोक जाणतात

- आमचा व्यापार एकमेकांच्या मदतीने कसा वाढवायचा हे जाणतात

याच कारणांमुळे इंग्लंड भारताशी व्यापार असणाऱ्या प्रमुख देशांपैकी आहे. भारतात परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये इंग्लंडचा तिसरा क्रमांक आहे. हे एकतर्फी नाही हे मी नमूद करु इच्छितो. परकीय थेट गुंतवणुकीसाठी भारत हा इंग्लंडसाठी सर्वात मोठा तिसऱ्या क्रमाकांचा स्रोत म्हणून उदयाला आला आहे. तथापि, आर्थिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी भारत आणि इंग्लंडला भरपूर वाव आहे.

आम्हांला आमच्यादरम्यान असलेल्या परस्पर सामंजस्याचा प्रभावीपणे वापर करुन घेता आला पाहिजे. ज्या क्षेत्रांमध्ये इंग्लंड प्रभावी आहे, ती क्षेत्रे विक

आम्हांला दोन्ही देशामध्ये  असलेल्या एकमेकांच्या सामंजस्याचा पूण-पणे वापर करुन घेता आला पाहिजे. ज्या ठिकाणी इंग्लंड प्रभावी असेल, त्या क्षेत्रांच्या विकासासाठी  आम्ही भर देऊ. यासाठी आम्ही योग्य वातावरण तयार करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. येथील भारतीय लोक इंग्लंड बरोबर  सहकार्य वाढवण्यावर जोर देण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

मित्रहो, माझे सरकार सत्तेत आल्यापासून आम्ही अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्याचा अविरत प्रयत्न करत आहोत. विशेषतः भारतात व्यापार करणे सुलभ व्हावे यासाठी अत्यंत आक्रमतेने काम करत आहोत. याचा भारताच्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे.

आमच्या कष्टाचे परिणाम आता प्रत्यक्ष रुपाने दिसून येत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रभावशाली अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश असल्याचे प्रतिपादन नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांनी केले होते. गेल्यावर्षीचा आमचा विकास दर 7.3 टक्के एवढा होता.

चालू आर्थिक वर्षात आमचा विकास दर 7.five टक्के असेल तसेच आगामी काळात हा वाढतच राहिल, असे प्रतिपादन जागतिक बँकेने केले आहे. या  प्रकारे आम्ही योग्य मार्गाने मार्गाक्रमण करण्यामध्ये नशीबवान ठरलो आहोत. व्यवसाय सुलभीकरणाविषयीचा जागतिक बँकेचा अहवाल-2016, यात भारताने 12 स्थानांची नेत्रदीपक प्रगती केली आहे. इतर कोणत्याही देशाने एवढी लक्षणीय सुधारणा केली नाही.
आम्ही  या सुधारणा सर्व पातळीवर घेऊन जाण्यासाठी कटीबद्ध आहोत. याकामी सहकार्याच्या आणि स्पर्धात्मक संघराज्य भावनेतून राज्य सरकारे केंद्र सरकारच्या हातात हात घालून वाटचाल करत आहेत.

आत्ताच , आम्ही जागतिक बँकेच्या मदतीने राज्यासाठी व्यापार सुलभीकरण मानांकन घेतले आहे . यामुळे राज्य सरकारांमध्ये व्यापाराविषयी निकोप स्पर्धा निर्माण झाली आणि व्यवसायपूरक वातावरण तयार करण्याविषयी प्रत्येकात चुरस निर्माण झाली.

अशाप्रकारे व्यापार सुलभीकरणाच्या प्रक्रियेसाठी उप-राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याची जागतिक बँकेची ही पहिलीच वेळ होती.

मित्रहो,

आज भारतासमोरचे मुख्य आव्हान म्हणजे, तरुणांना योग्यरित्या रोजगार पुरवण्याचे आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, आम्हाला उत्पादननिर्मितीवर भर द्यावा लागणार आहे. गेल्या कित्येक दशकांपासून उत्पादन निर्मितीचे प्रमाण एकूण सकल उत्पादनाच्या sixteen टक्क्यांच्या आसपास आहे. लघु आणि मध्य काळा साठी हा दर 25 टक्के पर्यंत  गेला पाहिजे. हा एक च दृष्टीकोन ठेवून आम्ही “मेक इन इंडिया” हा एक चांगला कार्यक्रम आम्ही सुरू केला. भारताला जगाच्या पाठी वरील उत्पादक केंद्र बनवण्यासाठी आम्ही सर्व आघाडीवर कार्य करत आहे.

हे ध्येय पूर्ण करण्यासाठी, व्यापार सुलभीकरणाच्या कसरतीनंतर, आम्ही उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी जलदरित्या मान्यता आणि मंजूरी देत आहोत. आमच्या नितीचे वैशिष्ट्ये म्हणजे, (पॉलिसी ड्रीव्हन गव्हर्नन्स) होय. प्रमुख नैसर्गिक स्रोत जसे कोळसा, स्पेक्ट्रम, लोह व खनिज भांडारांचे अत्यंत पारदर्शी पद्धतीने झालेले वाटप आणि लिलाव यामुळे गुंतवणूकदारांसाठी समान पातळीवर संधी निर्माण झाली आहे.

परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी, आम्ही रेल्वेमध्ये one hundred टक्के परकीय थेट गुंतवणुकीला मंजूरी दिली. संरक्षण आणि विमा क्षेत्रात 49 टक्के परकीय थेट गुंतवणुकीला मंजूरी दिली. अशा धोरणांमध्ये शेवटच्या क्षणी उद्‌भवणाऱ्या मुद्यांविषयीही आम्ही जागरुक आहोत. याच भावनेतून, आम्ही या आठवड्याच्या सुरुवातीस 15 क्षेत्रांमध्ये परकीय थेट गुंतवणुकीचे निकष बदलले आहेत.
एक उदाहरण सांगायचे  झाल्यास, कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये थेट परकीय  गुंतवणुकीसाठी आता बंधने नाहीत. तसेच सिंगल ब्रॅण्ड रिटेल, प्लॅन्टेन्शन, आणि   ई-कॉमर्स मध्ये संपूर्ण उदारीकरण केले आहे. आम्ही परकीय थेट गुंतवणुकीचे बहुतांश प्रस्ताव स्वयंचलित मार्ग अर्थात ऍटोमॅटीक रुटच्या माध्यमातून आणत आहोत.

अशाप्रकारे सुधारणा घडवून आणताना, मला वाटते की परकीय थेट गुंतवणुकीसाठी खुल्या असलेल्या देशांपैकी भारताचे स्थान वरचे आहे.

पायाभूत सुविधांचे आव्हान ही भारतासमोरची मोठी समस्या आहे. आम्ही भविष्याच्या दृष्टीने विचार करता भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही स्वनियंत्रित आर्थिक नियोजन केल्यामुळे पायाभूत सुविधांसाठी अधिक स्रोत निर्माण करून देण्यात यशस्वी ठरलो आहोत. याशिवाय, आम्ही भारत गुंतवणूक आणि पायाभूत निधी उभारत आहोत. आमच्या स्वतःच्या स्रोतांमधून यासाठी आम्ही वार्षिक three.five अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी उभारण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. मालमत्ता व्यवस्थापनासाठी आम्ही तज्ज्ञांची समिती नियुक्ती करत आहोत.

रेल्वे, रस्ते आणि इतर क्षेत्रांसाठी आम्ही टॅक्स फ्री इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्डस हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. आम्ही इंग्लंड सरकारसोबत एकत्रित कार्य करु, ज्यामुळे आमचे औद्योगिक आणि आर्थिक संबंध वृद्धींगत होतील, तसेच भारतामध्ये पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करतील. लवकरच हे रोखे  देशातील आर्थिक मार्केटमधील प्रभावी साधन ठरतील.
मित्रहो,

परदेशीय इन्वेस्टराच्या भावना दुखावणारे नियामक आणि टॅक्स  प्रणालीशी सम्बधित अनेक मुद्दे होते. बऱ्याच वेळेपासून  प्रलंबित असलेले प्रॉब्लेम दूर  करण्यासाठी आम्ही योग्य पावले उचलली आहेत.

याची काही उदाहरणे सांगता येतील

-आम्ही  सुरक्षा आणि पर्यावरणासंबंधीच्या नियामक मंजूरी  लवकर गतीने देण्याचा निर्णय घेतला आहे.
- आम्ही संरक्षण उत्पादन परवान्यांचा कालावधी  ३ वर्षे वरून  अठरा वर्षे केला आहे.

- आम्ही संरक्षण उत्पादनांपैकी सुमारे 60 टक्के उत्पादने परवानामुक्त केली आहेत आणि अंतिम उपभोक्ता प्रमाणपत्रासारखी अनेक निर्बंध उठवली आहेत.

-आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की, पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी केली जाणार नाही. हे आम्ही अनेक मार्गांनी दाखवून दिले आहे.

-यात परकीय संस्थात्मक गुंतवणूकीवर (एफपीआय) किमान पर्यायी कर न आकारण्याचा समावेश आहे.

- आम्ही एफपीआय आणि इतर परकीय गुंतवणूकदारांसाठी संयुक्त क्षेत्रातील मर्यादा ही नवी संकल्पना सुरू केली आहे.

- आम्ही पर्यायी गुंतवणूक निधीसाठी बंधने निश्चित केली आहेत.

-बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही भांडवली लाभ कराचे सुलभीकरण केले आहे.

-आम्ही  (पर्मनंट इस्टॅबलिशमेन्ट नॉर्मस) स्थायी स्थापना नियम मध्ये सकारात्मक बदल केला  आहे.

- आम्ही जनरल अँटी अव्हॉयडन्स रुल्स दोन वर्षांनंतर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

- आम्ही (जीएसटी  वस्तू व सेवा कर विधेयक संसदेसमोर मांडले आहे. 2016 पासून हे लागू होईल

- आम्ही दिवाळखोरीच्या नवीन निकषांवर काम करत आहोत, यासाठी लवकरच  (कंपनी लॉ ट्रीब्युनल कंपनी कायदा प्राधिकरण) तयार करण्यात येत आहे.

मित्रहो,
देशाची करप्रणाली निश्चित  व अधिक पारदर्शी  असली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. करविषयक बाबींवर अस्सल गुंतवणूकदार आणि प्रामाणिक करदाता यांच्यासाठी जलद आणि योग्य निर्णय झाले पाहिजेत.

- खासगी गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूकीविषयीच्या भावना सकारात्मक झाल्या आहेत.

- गेल्या वर्षाच्या तुलनेत FDIचा ओघ 40 टक्क्यांनी वाढला आहे.

- अर्नेस्ट व यंगने नुकत्याच दिलेल्या अहवालात भारत गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र असल्याचे सांगितले आहे. हरितक्षेत्र गुंतवणूक (ग्रीनफिल्ड इन्व्हेस्टमेंट) यामध्ये 2015 च्या पहिल्या सत्रात भारताचा क्रमांक पहिला आहे.

- अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणविषयक मासिकाने परकीय थेट गुंतवणुकीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे.

- फ्रॉस्ट आणि सुलिवन ने a hundred देशांचा विकास, गुंतवणूक आणि नेतृत्त्व याविषयी अभ्यास करुन भारताला पहिला क्रमांक दिला आहे.

-संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या व्यापार आणि विकासविषयक परिषदेच्या (अंक्टाड) गुंतवणूक आकर्षित करण्याच्या मानांकनामध्ये भारताची 15 व्या स्थानावरुन 09 व्या स्थानावर प्रगती झाली आहे.

-वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या जागतिक निर्देशांकात सोळा स्थानांनी झेप घेतली आहे.

- मुडीजनेही भारताचे मानांकन सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.
अशाप्रकारे, आम्ही  १८महिन्यांमध्ये, जागतिक खेळीयां चा विश्वास संपादन केला आहे.
 सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून, आम्ही यापूर्वी फक्त सरकारी गुंतवणूक असलेल्या क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहोत. तसेच बाजार नियमनासाठी आम्ही सार्वजनिक उपक्रमांतून आमचा हिस्सा कमी करुन निर्गुंतवणूक करत आहोत. सार्वजनिक-खासगी भागीदारीविषयीच्या तुमच्या अनुभवातून शिकण्यास आम्ही उत्सुक आहोत.

मी वैयक्तिरित्या तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो की, प्रत्येक गुंतवणूकदार आणि उद्योजकाच्या बौद्धिक संपदा अधिकाराच्या रक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बौद्धीक संपदा प्रशासनात पारदर्शकता यावी म्हणून आम्ही अनेक ऑनलाईन उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. सर्वसमावेशक असे राष्ट्रीय बौद्धीक संपदा हक्क धोरण निश्चित करण्यात येत आहे.

मित्रहो,
आमचे स्वप्न सत्यात उतरवण्या साठी तुमच्या सहभागाची गरज आहे
. ध्येय साध्य करण्यासाठी जलद आणि प्रभावीरित्या कार्य करण्याची आमची कटीबद्धता ही ब्रिटीश कंपन्यांसाठी चांगली संधी आहे. या संधीमध्ये 50 दशलक्ष घरे बांधण्यापासून 100 स्मार्ट सिटीची निर्मिती करणे, रेल्वेचे जाळे अद्ययावत करणे आणि नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करणे, a hundred seventy five गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेची निर्मिती, वितरण व पारेषण करणे, राष्ट्रीय महामार्गांपासून ते पुलांची बांधणी करण्यापर्यंत, मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करणे. अशाप्रकारे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक करण्यास कदाचित दुसऱ्‍या कोणत्याही देशांमध्ये एवढा वाव असणार नाही. मुख्य म्हणजे, अशाप्रकारे व्यापक पातळीवर उत्पादन आणि वापर कोणत्याही देशात असणार नाही.

आम्ही या संधीची सांगड आमची धोरणे आणि जनता यांच्यामध्ये घालणार आहोत. डिजिटल इंडिया आणि स्कील इंडिया यासारखे कार्यक्रम जनतेने या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी आम्ही स्टार्ट अप इंडिया ही मोहीम सुरू केली आहे. स्टार्ट अप्समध्ये गेल्या काही दिवसांत   कमालीची वाढ झालेली दिसून येते. यापैकी काही स्टार्ट अप्स नी आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्पादकांना शह देण्याचा प्रयत्नही चालू केला आहे.

मित्रहो,

भारत माहिती तंत्रज्ञान क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. देशाच्या सव्वाशे कोटी देशवासियांना तत्काळ सेवा मिळण्यासाठी आम्ही याला पाठबळ देत आहोत. अक्षय ऊर्जा आणि

नवीन तंत्रज्ञान हा आमचा नवीन मंत्र आहे. आम्ही स्वच्छ आणि हरित मार्गाने करु. ऊर्जा कार्यक्षमता, पाण्याचा पुनर्वापर, टाकाऊपासून ऊर्जानिर्मिती, स्वच्छ भारत आणि नद्यांची स्वच्छता हे प्रमुख उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत. मनुष्यबळ विकास आणि  आधुनिक तंत्रज्ञान व्यतिरिक्त हे उपक्रम गुंतवणुकीसाठी पर्यायी मार्ग ठरतील.

आमचा देश सळसळत्या तरुणाईचा व मध्यमवर्गीयांचा आहे. भारतात प्रचंड मोठी देशी बाजारपेठ आहे. मी म्हणतो की, थ्री डी डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड (लोकशाही, लोकसंख्या व मागणी) ही आमची मुख्य शक्ती आहे. याशिवाय भारतातील तरुण जोखीम स्वीकारण्यासाठी तयार झाले आहेत. उद्योजक होण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. अशाप्रकारे आम्ही डी पासून ई कडे वाटचाल करत आहोत, ई म्हणजे उद्योजकता (आंत्रप्रनेरशिप).

मित्रहो,

भारतीय अर्थव्यस्थेच्या उड्डाण अवस्थेसाठीची आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. बाहेरील प्रतिभा, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक योग्यप्रकारे सामावून घेण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. मी आपणास आश्वस्त करतो की, ही दिवसेंदिवस  परिस्थिती अधिक चांगली व योग्य होत जाणार आहे. यासाठी तुमच्या  नवकल्पना आणि उद्योजकतेचे स्वागत आहे. योग्य ते बदल करण्यासाठी आमच्या  धोरणात  आणि कार्यपद्धतीमध्ये करण्यास आम्ही तयार आहोत.  मी वैयक्तिरित्या पंतप्रधान कॅमेरुन यांचे दूरदृष्टी नेतृत्त्व आणि भारताप्रतीची आवड, यामुळेब्रिटीश सरकार आणि कंपन्यां बरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहे.
आपणा सर्वांचे भारतात येण्यासाठी
या शब्दांनी मी स्वागत करतो. मी वैयक्तिकरित्या तुमचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी  लक्ष घालेन. तुमच्या पैकी काही जण भारतीय आहेत, काही जण तर भारतात पोहचले ही आहेत.
पण जे अजून पर्यंत पोहचले नाहीत, त्याना मी म्हणेन की,

- या क्षनाला भारतात असणे हे शहाण पणाचे ठरेल .

- तसेच भारतात गुंतवणूक पद्धत चांगली करण्यासाठी आम्ही काम करत आहोत

आणि

- माझ्यावर विश्वास ठेवा, मेक इन इंडियासाठी आम्ही यापेक्षाही चांगले काम करत आहोत.

धन्यवाद.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here