Paripath - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, December 13, 2015

Paripath


         ****************
दिनांक :-  14/12/2015

१)     आजचे पंचाग 
        =============
14. सोमवार
शुक्ल पक्ष तृतियानक्षत्र : उत्तराषाढा
योग : व्रुद्धी
करण : गर
सूर्योदय : 07:03
सूर्यास्त : 18:03
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)     सुविचार 
       ===========
14.   कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३)     म्हणी व अर्थ  
        =============
14.    टाकीचे घाव सोसल्याशिवाय
देवपण येत नही.
      – कष्टाशिवाय यश मिळत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४)     सुभाषित 
       ===========
14.     विद्याविहीनः पशुः ।
                 $  अर्थ :-
विद्याविहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशूच आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५)    दिनविशेष 
       ============
.        ~:: सोमवार : १४ डिसेंबर ::~
      °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
•~राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन.
•~हा या वर्षातील ३४८ वा दिवस आहे.
          ~$ महत्त्वाच्या घटना $~
       ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९६१:टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४१:दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
१९२९:’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९०३:किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.
१८१९:अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.
     $ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
   ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९५३:विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू
१९४६:संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू: २३ जून १९८०)
१९३९:सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
१९३४:श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
१९२८:प्रसाद सावकार – गायक व नट
१९२४:राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८)
१९१८:योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.
१८९५:जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)
१५४६:टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (म्रुत्यू: २४ आक्टोबर १६०१)
१५०३:नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (म्रुत्यू: २ जुलै १५६६)
       $ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९७७:गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ आक्टोबर १९१९)
१९६६:शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)
१७९९:जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)
======================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६)    ⭕ स्फुर्तिगीत ⭕
      ============
14.     ~$ महाराष्ट्र जय महाराष्ट्र $~
        ***************************
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान
बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान
तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान
मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण
वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७)    ⭕ देशभक्ती गीत ⭕
       ==============
14.   $ गे मायभू तुझे मी फेडीन $
        ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला !
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी !
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८)     प्रार्थना 
        ==============
14.     ~$ सर्वेश्वरा शिवसुंदरा $~
         ************************
सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना
सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना
श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवें
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना
न्यायार्थ जे लढती रणीं
तलवार तू त्यांच्या करीं
ध्येयार्थ जे तमीं चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना
करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउलें
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
९)     बोधकथा 
        ================
14.       $ स्‍वप्न आणि सत्‍य $
         ********************
   एकदा स्‍वप्‍न आणि सत्‍य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता ’भविष्‍य घडविण्‍यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्‍या पित्‍याकडे गेले. पित्‍याला वादाचा विषय सांगितला. पिता म्‍हणाला,’’ज्‍या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्‍याचा भविष्‍य घडविण्‍यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्‍वप्नाने एकाच उडीत त्‍याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्‍हाच उचलले गेले होते. मग सत्‍याने प्रयत्‍न केला मात्र त्‍याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्‍न केले पण दोघेही अयशस्‍वी राहिले. शेवटी थकून ते पुन्‍हा एकदा पित्‍याकडे गेले तेव्‍हा पिता म्‍हणाला,’’ भविष्‍य घडविण्‍यात सत्‍य आणि स्‍वप्‍न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’
               $ तात्‍पर्य :--
  ख-या अर्थाने भविष्‍य घडवायचे असेल तर स्‍वप्‍नाला सत्‍याच्‍या खांद्यावर उभे करायला पाहिजे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०)   प्रेरणादायी विचार 
        ================
14. ~यशाच्या बारा गोष्टी~
१) ध्येय (ambition)
२) इच्छाशक्ती (will power)
३) मानसिकता (mentality)
४) दृष्टिकोण (attitude)
५) कार्य-तप्तरता (Bound by sensual gratification)
६) नियोजन (planning)
७) वेळेचे नियोजन (time-management)
८) एकाग्रता (concentration)
९) सिंहावलोकन (revision)
१०) सातत्य (consistency)
११) साथ-संगत (relationship)
१२) आत्मविश्वास (confidence)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११)    सामान्य नान 
        ==============
14.  मुख्य पदावरील व्यकी
    ~~~~~~~~~~~~~
* प्रधान मंत्री
               ~श्री नरेंद्र मोदी
* लोकसभा अध्यक्ष
               ~श्रीमती सुमित्रा महाजन
* सर्वोच्च न्यायलय के मुख्य न्यायधीश
               ~श्री एच एल दत्तू
* राष्ट्रीय मानवाधिकार आयोग के अध्यक्ष
              ~श्री के. जी.बाल क्रष्णन
* राष्ट्रीय महिला आयोग के अध्यक्ष
              ~श्रीमती ललिता कुमार मंगलम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)   थोरव्यक्ती परिचय
           ==============
14.       $ ग.दि. माडगूळकर $
         **********************
यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
*********************************
जन्म नाव:गजानन दिगंबर माडगूळकर
टोपणनाव:गदिमा
जन्म:ऑक्टोबर १, १९१९
शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू:डिसेंबर १४, १९७७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व:भारतीय
कार्यक्षेत्र:साहित्य, चित्रपट
भाषा:मराठी
साहित्य प्रकार:गीतरचना, कथा, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृतीगीतरामायण
     ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here