Paripath - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 13, 2016

Paripath


.   ~:: 14.जानेवारी :: गुरुवार ::~
शुक्ल पक्ष पंचमीनक्षत्र : पूर्वभाद्रपदा
योग : वरियान
करण : बव
सूर्योदय : 07:14
सूर्यास्त : 18:20
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)       ▪ सुविचार ▪
==========================
14.    चिडणे हा विरोधावर मात करण्याचा
      मार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने
      तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३)   ▪ म्हणी व अर्थ ▪ =======Ⓜ=======
14.          दुष्काळात तेरावा महिना
         – संकटात अधिक भर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४)      ▪▫ सुभाषीत▫ ▪
==========================
14.     गतस्य शोचनं नास्ति ।
                $ अर्थ :~
   भूतकाळातील गोष्टींविषयी चिंता करू नये.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५)     ▪ दिनविशेष ▪
=======Ⓜ=======
~:: 14. जानेवारी :: गुरुवार ::~
* भूगोल दिन
* हा या वर्षातील १४ वा दिवस आहे.
* मकर संक्रमण
       $ महत्त्वाच्या घटना $
     ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
२००० : ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.
१९९८ : दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.
१९९४ : मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.
१९४८ : ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
१९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
     $ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
   ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९७७ : नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर
१९३१ : सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर
           (मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)
१९२६ ; महाश्वेता देवी – बंगाली लेखिका
१९२३ : चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते       (मृत्यू: २५ आक्टोबर २००९)
१९१९ : सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार
(मृत्यू: १० मे २००२)
१९०५ : दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री.
(मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)
१८९६ : ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख
(मृत्यू: २ आक्टोबर १९८२)
१८८३ : निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९
      $ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
२००१ : फली बिलिमोरिया  माहितीपट निर्माते
१९९१ : चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)
१७६१ : सदाशिवराव भाऊ  पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)
१७६१ : विश्वासराव – पानिपतच्य ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२)
१७४२ : एडमंड हॅले – हॅलेच् धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आण भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)
==================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६)     ⭕ स्फुर्तिगीत ⭕
==========================
14.       $ उषःकाल होता होता $
       ●●●●●●●●●●●●●●●●●●●
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७)       ⭕ देशभक्ती गीत ⭕ =======Ⓜ=======
14.     $ नन्हा मुन्ना राही हूँ $
      =====●●●★●●●=====
नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ
बोलो मेरे संग, जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द
रस्ते पे चलूंगा न डर-डर के
चाहे मुझे जीना पड़े मर-मर के
मंज़िल से पहले ना लूंगा कहीं दम
आगे ही आगे बढाऊँगा कदम
दाहिने बाएं दाहिने बाएं, थम!
नन्हा मुन्ना राही हूँ...
धूप में पसीना बहाऊँगा जहाँ
हरे-भरे खेत लहराएगें वहाँ
धरती पे फाके न पाएगें जन्म
आगे ही आगे ...
नया है ज़माना मेरी नई है डगर
देश को बनाऊँगा मशीनों का नगर
भारत किसी से न रहेगा कम
आगे ही आगे ...
बड़ा हो के देश का सितारा बनूंगा
दुनिया की आँखो का तारा बनूंगा
रखूँगा ऊँचा तिरंगा हरदम
आगे ही आगे ...
शांति की नगरी है मेरा ये वतन
सबको सिखाऊँगा प्यार का चलन
दुनिया मे गिरने न दूँगा कहीं बम
आगे ही आगे ...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८)    ▫ प्रार्थना ▫
==========================
14.    $ हे करुणाकरा ईश्वरा $
       =====●●●★●●●=====
हे करुणाकरा, ईश्वरा ।
कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट ।
दृढता ही तव पायी ॥
तूही आदि तू अनंत ।
तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
९)    ▫▪ बोधकथा ▪▫
=======Ⓜ=======
14.    $ प्रामाणिकपणा $
       ******************     
सऊदी अरब मध्‍ये बुखारी नामक एक विद्वान राहत होते. ते आपल्‍या प्रामाणिकपणासाठी खूप प्रसिद्ध होते. एकदा त्‍यांनी दूरचा समुद्रप्रवास करण्‍याचे ठरविले व त्‍याप्रमाणे ते प्रवासाला निघाले. त्‍यांनी प्रवासात आपल्‍यासोबत खर्चासाठी म्‍हणून एक हजार दिनार एका थैलीत बांधून घेतले होते. प्रवासाला सुरुवात झाली, या प्रवासाला निघालेल्‍या अन्‍य काही जणांबरोबर बुखारी यांची ओळख यानिमित्ताने झाली. बुखारी त्‍यांनी जीवनदर्शनाबद्दल सांगत असत. एक प्रवासी मात्र बुखारीजींच्‍या जास्‍त सहवासात राहिल्‍याने तो त्‍यांचा जवळचा माणूस बनला. बुखारीजी जिकडे जात, खात, हिंडतफिरत तिथे तो माणूस त्‍यांच्‍यासोबत असे. असेच एकदा बुखारीजींनी स्‍वत:जवळची दिनारांची थैली उघडली व त्‍यातील रक्कम काढून ते मोजू लागले. त्‍यावेळीही तो माणूस तिथेच होता. त्‍याने ती पैशांची थैली पाहिली व त्‍याला त्‍या पैशांचा मोह झाला. त्‍याने ती थैली चोरायचा कट मनातल्‍या मनात शिजवला. एकेदिवशी सकाळी तो जोरजोराने ओरडू लागला,’’ या अल्‍ला, या खुदा, मी पुरता लुटलो गेलो, माझे एक हजार दिनार चोरीला गेले. चांगले थैलीत बांधून आणलेले माझे पैसे कुणी हरामखोराने पळविले कुणास ठाऊक मला या संकटात कसे काय अडकावले आहे’’ जहाजावर असणा-या कर्मचा-यांनी त्‍याला धीर देण्‍याचा प्रयत्‍न केला, त्‍याला समजावले की बाबा तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत या लोकांपैकी जर कुणी घेतले असतील तर आपण त्‍यांना ते परत देण्‍यास सांगू या. जहाजाच्‍या कर्मचा-यांनी सर्वाची झडती घेण्‍यास सुरुवात केली. सर्वात शेवटी नंबर आला तो बुखारीजींचा. त्‍यांच्‍यापाशी जाताच कर्मचारी म्‍हणाले,’’ अरे तुमची कशी बरे आम्‍ही झडती घ्‍यावी. तुमची झडती घेणे म्‍हणजे सुद्धा देवाचा गुन्‍हा ठरेल. इतक्‍या प्रामाणिक आणि सच्‍च्‍या माणसाला आम्‍ही कसे तपासू.’’ हे ऐकून बुखारी म्‍हणाले,’’ नाही, ज्‍याचे पैसे चोरीला गेले आहेत त्‍याच्‍या मनात माझ्याबद्दल शंका राहिल, संशय बळावेल तेव्‍हा तुम्‍ही माझी व माझ्या सर्व सामानाची झडती घ्‍या’’ बुखारींची झडती झाली त्‍यात त्‍यांच्‍याकडे एक दमडासुद्धा मिळाला नाही. हा प्रसंग इथेच संपला. मात्र दोन दिवसांनी न राहवून तो चोरीची बोंब ठोकणारा प्रवासी बुखारींकडे आला व म्‍हणाला,’’ महाराज, तुमच्‍याकडे तर एक हजार दिनार होते हे मला माहित आहे. मी स्‍वत: ते पाहिले आहेत मग ते कुठे गेले’’ बुखारी हसून म्‍हणाले,’’ मित्रा, मी आयुष्‍यात कधीच धनाची चिंता केली नाही. मी फक्त प्रामाणिकपणा जपला. माझ्यावर ज्‍यावेळी झडतीची वेळ आली त्‍याच्‍याआधीच काही क्षण मी ते पैसे समुद्रात फेकून दिले होते. जर माझेच पैसे माझ्याजवळ सापडले असते तर कुठेतरी संशयाची सुई माझ्याभोवती फिरली असती म्‍हणून मी स्‍वत:च्‍या हाताने धन समुद्रात टाकले. तुला खरे वाटणार नाही पण ही गोष्‍ट जहाजावरील ब-याचजणांना माहिती आहे त्‍यामुळे तेच माझा आता खर्च करत आहेत. मी या हाताने धन जरी टाकले असले तरी माझ्या प्रामाणिकपणामुळे मला अनेक हातांनी मदत केली आहे. लोकांचा कायमच प्रामाणिक माणसांवर विश्‍वास बसतो.’’
               $ तात्‍पर्य :--
          ~~~~~~~~~
जगात प्रामाणिकपणासारखा चांगला गुण नाही. प्रामाणिक माणसेच जगाला पुढे नेत आहेत हे ही शाश्‍वत सत्‍य आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०)   प्रेरणादायी विचार 
==========================
14.       जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११) ▪▫सामान्य नान▫▪
==========================
14. $ भारतातील विविध बाबींची सुरुवात $
            ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*पहिला मूकपट -
         ~: राजा हरिश्चंद्र (१९१३)
*पहिला बोलपट -
         ~: आलमआरा (१९३१)
*पहिला मराठी बोलपट -
         ~: अयोध्येचा राजा (१९३२)
*पहिले दूरदर्शन केंद्र -
         ~: दिल्ली (१९५९)
*पहिले आकाशवाणी केंद्र -
         ~: मुंबई(१९२७)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)  थोरव्यक्ती परिचय        =======Ⓜ=======
14.      $ सदाशिवराव भाऊ $
      =====●●●★●●●=====
यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
........................
           दिव्यत्वाची जेथ प्रचीती
             तेथे कर माझे जुळती ..!!

      
     * सदाशिवराव भाऊ *
(जुलै ५, इ.स. १७३० - जानेवारी १४ / जानेवारी २०, इ.स. १७६१)
    हे मराठा साम्राज्यातील एक सेनापती व नासाहेब पेशव्यांचे चुलतभाऊ होते. त्यांनी मराठ्यांचे पानिपतच्या तिसर्‍या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. पानिपताच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. सदाशिवरावभाऊही या लढाईत मारले गेले.
चिमाजी अप्पांचे चिरंजीव सदाशिवराव भाऊ आईविना आजी राधाबाई साहेब यांच्याकडे लहानाचे मोठे झाले. अप्पा नेहेमीच बाजीराव साहेबांबरोबर मोहिमेवर असायचे लहान सदाशिवाकडे फारसे लक्ष द्यायला त्यांना फुरसत नसायची. त्यानंतर ते शाहू महाराजांकडे दौलतीचे शिक्षण घेण्यसाठी दाखल झाले. जितके लेखणीमध्ये तरबेज तितकेच तलवारबाजीत. नंतर नाना साहेबांचा लग्नानंतर नाना आणि भाऊमध्ये अंतर पडू लागले याला कारण गोपिकाबाई. त्यांनी फक्त आपले आणि आपल्या मुलांचे कसे होईल याचाच विचार केला. खूप दिवस गोपिकाबाईंमुळे भाऊ शनिवार वाड्यावर येवू शकले नाही. ते सातार्‍याला होते. शेवटी शाहू राजांनी आज्ञा दिली आणि नानासाहेबांनी भाऊंना पुण्याला नेले. त्यानंतर भाऊंनी दौलतीचे कारभारी म्हणुन सूत्रे हाती घेतत मोठातल्या मोठा भाऊंपुढे यायला कापायचा त्यांचा हि पक्का कि ते लगेच समोरच्याला कात्रीत पकडायचे.भाऊंनी पहिल्यांदा नेतृत्व दाखवले ते निजामाविरुद्धआणि त्यात दौलताबादचा किल्ल सर केला. निजाम जेव्हा हात बांधून आला तेव्हा भाऊंनी इब्राहीमखान गारदी यास निजा आपल्या सैन
=======Ⓜ======= 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here