Skip to main content

10/2/16


====💻===Ⓜ🅰🅿===💻====

Ⓜ🅰🅿●★परीपाठ★●Ⓜ🅰🅿
       =====●●●★●●●=====

🔳   दिनांक :-  10/02/2016   🔳
     🔘🔘 वार -  बुधवार 🔘🔘
   ■★■★■★■★■★■★■★    
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१)  🔶🔹आजचे पंचाग🔹🔶
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
    ~:: 10. फेब्रुवारी :: बुधवार ::~
      ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
                 माघ शु. २
तिथी : शु. द्वितीया ,   नक्षञ : शततारका ,
योग : परिघ  ,        करण : तैतिल  ,
सूर्योदय : 07:12 ,    सूर्यास्त : 18:34 ,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)       🔷▪ सुविचार ▪🔷
==========================
10.      वेळेवर घेतलेल्या चांगल्या व
        सकारात्मक निर्णयाचा कधीच  
        पश्चाताप होत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३)   ▪🔸 म्हणी व अर्थ 🔸▪ ====💻===Ⓜ🅰🅿===💻====
10.       खायला काळ भुईला भार
        $– ज्याचा काही उपयोग नाही
      असा माणूस भार बनतो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४)      ▪▫ सुभाषीत▫ ▪
==========================
10.    नास्ति ज्ञानात् परं सुखम् ।
                  $ अर्थ :--
       ज्ञानापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट
       अधिक आनंददायी नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५)     ▪🔹 दिनविशेष 🔹▪
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
     ~:: 10. फेब्रुवारी :: बुधवार ::~
       =====●●●★●●●=====
* हा या वर्षातील ४१ वा दिवस आहे.

       $ महत्त्वाच्या घटना $
     ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
२००५ : उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
१९९६ : आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
१९४९ : गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
१९४८ : पुणे विद्यापीठाची स्थापना
१९२९ : जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.

   $ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
       ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
१९४५ : राजेश पायलट – केंद्रीय मंत्री (मृत्यू: ११ जून २०००)
१९१० : दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ मे २००२)
१८९४ : हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)
१८०३ : जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ
           (मृत्यू: ३१ जुलै १८६५)

     $ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
       ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
२००१ : गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १५ जुलै १९०४)
१९८२ : नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२)
१९२३ : विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २७ मार्च १८४५)
==========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६)     🔹⭕ स्फुर्तिगीत ⭕🔹
==========================
10.    ~$ पहा टाकले पुसुनी डोळे $~
         **************************
पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका
रणांगणी जा सुखे राजसा परतुन पाहू नका !

झडे दुंदुभी झडे चौघडा
रणरंगाचा हर्ष केवढा
एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका !

शकुनगाठ पदरास बांधुनी
निरोप देते तुम्हा हासुनी
आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका !

या देशाची पवित्र माती
इथे वीरवर जन्मा येती
तोच वारसा तुम्ही पोचवा येणार्‍या शतका !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७)       ⭕ देशभक्ती गीत ⭕ ====💻===Ⓜ🅰🅿===💻====
10.     $ जय भारता जय भारता $
         ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता

जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता

तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा, परते पहा परतंत्रता

बलिदान जे रणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले उदयाचली हो सांगता

ध्वज नीलमंडल हो उभा, गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा, दलितांस हा नित्‌ तारता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८)    ▫🙏 प्रार्थना 🙏▫
==========================
10.     $ सर्वेश्वरा शिवसुंदरा $
         ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना

सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना

श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवें
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना

न्यायार्थ जे लढती रणीं
तलवार तू त्यांच्या करीं
ध्येयार्थ जे तमीं चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना

करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउलें
सृजनत्व या हृदयामध्ये नितजागवी भीतीविना
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
९)    ▫▪ बोधकथा ▪▫
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
10.    🌻गरज सरो,वैद्य मरो🌻
       =====●●●★●●●=====
  एकदा एका श्रीमंत माणसाचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला. तऱ्हेतऱ्हेचे वैद्य केले. साधू संतांचे उपाय केले, तरी उतार पडेना. शेवटी एक विद्वान वैद्य त्याचेकडे आला. त्याने मुलाला तपासले व बरे करण्याची हमी दिली. तेव्हा त्या श्रीमंताने वैद्यराजांना सांगितले, "वैद्यराज! माझ्या मुलाला काही करून बरे करा. तुम्ही जर माझ्या मुलाला बरे केलेत तर माझी सर्व इस्टेट मी तुम्हाला देईन. वैद्यराजांनी खूप मेहनत करून एका महिन्यात त्याच्या मुलाला पूर्ण बरे केले आणि त्या श्रीमंतास आपले वचन पाळण्यास सांगितले. आता तो गृहस्थ बदलला. वैद्याला म्हणाला, "वैद्यराज! भलतेच काय मागता? आपणाला वेड तर लागले नाही ना! अहो, त्रासलेला माणूस असे बोलून जातो, ते सगळे खरे मानायचे असते का? माझ्या मुलाची स्थिती पाहून मी त्यावेळी वेडा झालो होतो आणि त्या वेडाच्या भरात मी आपणास भलतेच काही कबूल केलेही असेल. पण वेडेपणात दिलेले वचन शहाणपणात पाळायचे नसते'. त्याने त्या वैद्याला काहीही दिले नाही.
            🌻तात्पर्य🌻
👉जगात माणसे गरजेपूरते काहीही कबूल करतात.गरज सरली ,की सोयीस्कारपणे बदलतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०)  🔸 प्रेरणादायी विचार 🔸
==========================
10.    सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते,
   खर तर दिवस हा आपल्या सुंदर
         विचारांनी सुरु होतो...!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११) ▪▫सामान्य नान▫▪
==========================
10.  !!..भारताचे जनक/शिल्पकार..!!
     ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार
       $- सरदार वल्लभभाई पटेल.
*मराठी वृत्तपत्रशक्तीचे जनक
       $- आचार्य बालशाश्त्री जांभेकर.
*भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक
       $- दादासाहेब फाळके.
*भारताच्या अनुविज्ञानाचे जनक
       $- डॉ.होमी भाभा.
*आधुनिक मराठी कादंबरीचे जनक
       $- ह.ना.आपटे.
*आधुनिक मराठी कवितेचे जनक
       $- केशवसुत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)  🔹थोरव्यक्ती परिचय🔹        ====💻===Ⓜ🅰🅿===💻====
10.   $ जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे $
           =====●●●★●●●=====
    🙏💐  यांची आज जयंती   💐🙏
  त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!!  .....................................................
        दिव्यत्वाची जेथ प्रचीती
          तेथे कर माझे जुळती ....
🙏🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏🙏

* जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट मुरकुटे *

जन्म :~ ऑक्टोबर १०, १८०० मुंबई
मृत्यू :~ जुलै ३१, १८६५

  हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.

  जगन्नाथ शंकरशेट यांचा जन्म मुंबईत दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबात झाला. पूर्वजांप्रमाणे भटभिक्षुकी न करता त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेट यांच्या हवाली करीत.

  त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         Www.managaveacademy.blogspot.in
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
       * बुधवार * ~ 10/02/2016
***********************************

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…