Skip to main content

11/2/16

Managave Academy Pargaon

Ⓜ🅰🅿●★परीपाठ★●Ⓜ🅰🅿
       =====●●●★●●●=====

🔳   दिनांक :-  11/02/2016   🔳
     🔘🔘 वार -  गुरुवार 🔘🔘
   ■★■★■★■★■★■★■★    
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    🌀🇮🇳🌟 राष्ट्रगीत 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       🌀🔶🌟 प्रतिज्ञा 🌟🔶🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌀🇮🇳🌟 संविधान 🌟🇮🇳🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१)  🔶🔹आजचे पंचाग🔹🔶
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
   ~:: 11. फेब्रुवारी :: गुरूवार ::~
                ~ माघ शु. ३ ~
तिथी : शुक्ल पक्ष तृतिया,
नक्षत्र : पूर्वभाद्रपदा ,
योग : सिद्धि,        करण : गर ,
सूर्योदय : 07:09 , सुर्यास्त : 18:35
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
२)       🔷▪ सुविचार ▪🔷
==========================
11.    लीनता आणि विनयशिलता या
          धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
३)   ▪🔸 म्हणी व अर्थ 🔸▪
11. अंथरूण पाहून पाय पसरावे
      – ऎपत पाहून खर्च करवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
४)      ▪▫ सुभाषीत▫ ▪
==========================
11.     धिगाशा सर्वदोषभूः ।
                 $ अर्थ :--
     सर्व दोषांस कारणीभूत असलेल्या आशा
     नामक दोषाचा धिक्कार असो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
५)     ▪🔹 दिनविशेष 🔹▪
====💻===Ⓜ🅰🅿===💻====
     ~:: 11. फेब्रुवारी :: गुरूवार ::~
      ~~~~~~~~~~~~~~~~~
* हा या वर्षातील ४२ वा दिवस आहे.

        $ महत्त्वाच्या घटना $
     ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
२०११ : १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
१९९९ : मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
१९९० : २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका
१९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

     $ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $
   ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९४२ : गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री
(मृत्यू: १ मार्च २००३)
१९३७ : बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
१८४७ : थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक
(मृत्यू: १८ आक्टोबर १९३१)
१८३९ : अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक  (मृत्यू: २६ मे १९०२)

     $ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $
  ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
१९९३ : सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८)
१९७७ : फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रप्रणेते
१९६८ : पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या.
(जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
==========================
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
६)     🔹⭕ स्फुर्तिगीत ⭕🔹
==========================
11.    $ महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी $
       ●●●●●●●●●●●●●●●●●●●
महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी
मुशाफिरा चल माझ्यासाठी

अपूर्व सुंदर मूर्त होऊनी
जिथे नांदते शौर्य मराठी
हरहर गर्जत जरिपटक्याची
जिथे नाचली भगवी काठी

रक्त ठिबकल्या समशेरीचा
टिळा शोभतो जिच्या ललाटी
जिने उधळली शिवचरणावर
जलपुष्पे ती अनंतकोटी

नीत्य राहती दत्तदिगंबर
जिच्या तटावर भक्तीसाठी
जिला लागली समर्थ गुरुनी
चैतन्याची शिकवण मोठी

शीळ घालते नरसिंहांना
जिथे लावणी सुस्वरकंठी
थाप डफावर ऐकून प्रेते
उठली येथे क्रांतीसाठी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
७)       ⭕ देशभक्ती गीत ⭕ ====💻===Ⓜ🅰🅿===💻====
11.   $ गे मायभू तुझे मी फेडीन $
        ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.

आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला !

मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी !

आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
८)    ▫🙏 प्रार्थना 🙏▫
==========================
11.      $ तेजोमय नादब्रह्म हे $
        =====●●●★●●●=====
तेजोमय नादब्रह्म हे
रुणझुणले काळजात, लखलखले लोचनात
अंबरात, अंतरात, एकरूप हे

सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे

कुसुमांच्या हृदयातून स्‍नेहमयी अमृतघन
चोहिकडे करूणा तव, बरसून ये स्वरलाघव
परमेशा साद घालि तुझे रूप हे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
९)    ▫▪ बोधकथा ▪▫

11.      $ मनाची शुद्धता $
       =====●●●★●●●=====
  दोन तरुण साधु उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही होता. त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते. पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते, पाउस पडत होता, ओढा जोराने खळखळत वाहत होता. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती. दोन साधुंपैकी एका साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. खूप वेळ घुश्यात चालल्यावर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला,"मित्र! बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे.तेंव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग." तो दुसरा साधू म्हणाला,"हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. स्त्रीकडे बघणे, स्पर्श करणे हे महत्पाप तू केले आहेस. तेंव्हा तू माझ्या मनातून उतरला आहेस." त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला,"असं आहे तुझ्या नाराजीचे कारण! पण मित्रा, ती स्त्री जेंव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेंव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो. ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेंव्हाही माझ्या मनात फक्त सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही. मनातून सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधुपण आले असे समजता येईल आणि मग त्यासाठी संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले तर त्या व्यक्तीला साधुपण मिळेल."

           $ तात्पर्य :~
मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१०)  🔸 प्रेरणादायी विचार 🔸
==========================
11.      तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
        कोणी शंका घेत असेल तर
   मुळीच कमीपणा वाटू देवू नका.
        कारण लोक नेहमी
   सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
         लोखंडाच्या नाही...!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
११) ▪▫सामान्य नान▫▪
==========================
11.  !!..भारताचे जनक/शिल्पकार..!!
      ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक
      $- लॉर्ड रिपन.
*भारताच्या हरितक्रांतीचे जनक
      $- डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
*भारताच्या धवलक्रांतीचे जनक
      $- डॉ.व्हार्गीस कुरियन.
*भारतीय भूदान चळवळीचे जनक
      $- आचार्य विनोबा भावे.
*भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
      $- विक्रम साराभाई.
*भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक
      $- सॅम पित्रोदा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१२)  🔹थोरव्यक्ती परिचय🔹        ====💻===Ⓜ🅰🅿===💻====
11.    $ प्रल्हाद केशव अत्रे $
        ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
  आचार्य अत्रे किंवा प्र. के. अत्रे या नावाने ओळखले जाणारे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती याला उभा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही.

   त्यांच्या लेखणीने साहित्यातील बहुतांश सर्व प्रकारांना आपलेसे केले होते, तर त्यांच्या वाणीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे केले होते. साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या क्षमतांसह असामान्य उंची गाठली हे विशेष!

   संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपल्या वाणी व लेखणीद्वारे भरीव असे कार्य केले, लोकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळातच झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र (मराठा, नवयुग) ही त्यांची प्रभावी साधने होती. मृत्युलेख (श्रद्धांजलीपर लेख) व अग्रलेख ही त्यांची खासियत होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक होता. अत्र्यांचे भाषण म्हणजे त्यांचे हशा व टाळ्यांच्या माध्यमातून परखड विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हुकमी साधन होते.
   आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत त्यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ‘गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही.’
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         ✒✏▪संकलन▪✏✒
🌟managaveacademy.blogspot.in
      * गुरुवार * ~ 11/02/2016
***********************************

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…