Skip to main content

Posts

Showing posts from July, 2016

सातारच्या "हणमंतराव गायकवाड" या कोट्याधीश व्यावसायिकाची एक असामान्य यशोगाथा - BVG Group

सातारच्या "हणमंतराव गायकवाड" या कोट्याधीश व्यावसायिकाची
एक असामान्य यशोगाथा - BVG Groupमाझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर
शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
----------------------------------------
संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम मिळालं आणि त्यानंतर ‘बीव्हीजी’चं नाव पसरतच गेलं.
पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पुढं पंतप्रधानांचं निवास.
तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली.
मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.
आज ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार.
अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत!
विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर,
ओएनजीसी, आयटीसी. कितीतरी. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था आहेत.
कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच.’’“ माझ्या सभोवताली पैशावर
निजलेले उडय़ा मारणारे
गगनचुंबीत राहणारे
कोटय़धीश-अब्जाधीश
मीही म…

निरमा' विकत घेणार 9,400 कोटी रुपयांची सिमेंट कंपनी

‘निरमा' विकत घेणार 9,400 कोटी रुपयांची सिमेंट कंपनी
------------------------------
निरमा कंपनी १.४ अब्ज डॉलरमध्ये (९, ४०० कोटी) सिमेंट कंपनी लाफार्ज इंडियाला खरेदी करणार आहे. “लाफार्ज इंडिया’ जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी असून लाफार्ज-होलसिमची भारतीय शाखा आहे. या व्यवहारासाठी आता प्रतिस्पर्धा नियामक आयोगाकडून (सीसीआय) मंजुरी घेतली जाणार आहे. लाफार्ज इंडिया खरेदीसाठी अजय पिरामल यांच्या पिरामल एंटरप्रायजेस आणि सज्जन जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीनेही बोली लावली होती. विदेशी कंपन्या आणि खासगी इक्विटी फंडनेही ही कंपनी खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु निरमाची बोली जास्त ठरली.लाफार्ज इंडियाचे तीन प्लँट आणि दोन ग्राइंडिंग स्टेशन आहेत. त्यांची वार्षिक क्षमता १.१ कोटी टन आहे. ही कंपनी रेडीमिक्स काँक्रीटही बनवते. निरमाची उपशाखा सिद्धिविनायक सिमेंट्सचा राजस्थानमध्ये २० लाख टन क्षमतेचा प्लँट आहे. लाफार्ज इंडियाला खरेदी केल्यानंतर याची क्षमता १.३५ कोटी टन होईल. ही कंपनी गुजरातमधील महुवामध्ये नवीन प्लँट उभारण्याच्या तयारीत आहे. लाफार्ज-होलसिमने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर के…

नोकरीत अपयश आता १० कोटींची कंपनी

नोकरीत अपयश आता १० कोटींची कंपनी 
------------------------------------------
चंद्रपूर येथील उद्योग वसाहतीत वनिता आहारचा उद्योग असून त्यांचे गुलाब जामून, ढोकळा, उकडपेंढी, मसाले, पापड व लोणचे विदर्भात चांगलेच प्रसिद्ध आहेत. आयएसओ 2200 मानांकन मिळविणाऱ्या वनिता आहारची उद्योग भरारी चकित करणारी आहे. विनायक धोटे यांनी सुरु केलेला हा उद्योग चांगलाच भरभराटीस आला आहे. नुकतीच या उद्योगाला भेट दिली. लघुउद्योगापासून सुरुवात झालेला हा व्यवसाय कसा भरभराटीस आला, याची यशोगाथा थक्क करुन गेली.अन्नप्रक्रिया अभ्यासक्रमात बीएससी केल्यानंतर श्री. धोटे यांनी नोकरी सुरु केली. मात्र नोकरीत अपयश आल्यावर काय करावे या विवंचनेत असताना 10 किलो शेंगदाने, 10 किलो बेसन व 1 तेलाचा डबा घेऊन लघु उद्योग सुरु केला आणि आज वनिता आहार या ब्रँडसह 10 कोटींच्या वार्षिक उलाढालींसह नावारुपास आला आहे. प्रत्यक्ष 200 तर अप्रत्यक्ष हजारो लोकांना रोजगार दिल्याचे वनिता आहारचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक हरिश्चंद्र धोटे यांनी अभिमानाने सांगितले.अन्न प्रक्रिया अभ्यासक्रमात बीएससी बीटेक केल्यानंतर कानपूर येथे नोकरी करणाऱ्या धोटे यांची …