फक्त 50 रुपयांपासून सुरु केला बिझनेस, आज आहे 40 कोटींच्या कंपनीचे मालक

फक्त 50 रुपयांपासून सुरु केला बिझनेस, आज आहे 40 कोटींच्या कंपनीचे मालक
------------------------------------------

अवघ्या 50 रुपयांत 'वेबसाइट डिझायनिंग व होस्टिंग'चा बिझनेस सुरु करणारे अभिषेक रुंगटा हे आज 40 कोटींच्या कंपनीचे मालक आहेत. कोलकात्यात राहाणारे अभिषेक रुंगटा हे अथक परिश्रमाच्या जोरावर यशस्वी बिझनेसमन ठरले आहे.

अभिषेक यांनी आयुष्यात अनेक कठीण संघर्षाचा सामना केल्यानंतर स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. कॉमर्समध्ये पदवीचे शिक्षण घेतानाच अभिषेक यांनी आपला बिझनेस सुरु केला होता. आज त्यांची कंपनी परदेशातही आपला बिझनेस करते आहे.

अभिषेक यांनी शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्वत:ची ई-मेल सर्व्हिस सुरु केली होती. यात त्यांच्या कुटुंबियांचे त्यांना मोलाचे पाठबळ लाभले. सन 1997 मध्ये इंटरनेटचा एक नवा कॉन्सेप्ट होता. ई-मेल सर्व्हिसच्या माध्यमातून बिझनेस व त्यांचे क्लाइंटदरम्यान योग्य कम्युनिकेशन साधण्याचे काम अभिषेक करत होते.

पैसा घेवून पळून गेला सर्व्हिस प्रोव्हाइडर
अभिषेक यांनी बिझनेस सुरु करण्‍यासाठी कुटुंबियांकडून 46,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. यातून 30 हजार रुपये त्यांना इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर दिले होते. उर्वरित रकमेत मोडेम खरेदी केले. एक कॉम्प्यूटरवर काम सुरु केले परंतु, काही दिवसांतच सर्व्हिस प्रोव्हाइडरने त्यांची फसवणूक केली. तो पैसा घेवून पसार झाला.

पैसा बुडाला परंतु मागे फिरले नाही...
अभिषेक यांना सुरुवातीला एक नव्हे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून त्यांची आर्थिक फसवणूक झाली. परंतु अभिषेक मागे फिरले नाही. त्यांना नव्या कॉन्सेप्टवर काम करण्‍यास सुरुवात केली. अभिषेक यांनी टेक एक्सपोमध्ये जावून मार्गदर्शन घेतले. टेक एक्सपोमध्ये गेल्यानंतर अभिषेक यांच्या अनेक लोक संपर्कात आले. एक्सपोच्या लोकांनी आउटलेट उघडून अभिषेक यांच्या बिझनेसला प्रोत्साहन दिले.

50 रुपयांत केला कंपनीचा प्रचार...
अभिषेक यांना वेबसाइट डिझायनिंगचे ज्ञान होते. एका एक्सपोमध्ये त्यांनी भाड्याने एक स्टॉल घेण्याचा निर्णय घेतला. स्टॉलसाठी तीन दिवसांत 6000 रुपये खर्च झाले. अभिषेक यांच्याकडे तेव्हा इतके पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला की, स्टॉलमधील एक भाग ते आपल्यासाठी ठेवतील व इतर भाग दुसर्‍या कोणाला देतील. अभिषेक यांनी मोडेम विकण्याचे काम केले. सुरुवातीला त्यांनी वेबसाइट डिझायनिंगची अॅडर्व्हटाइझिंग सुरु केली. हॅंडबिल्सवर आपला प्रचार करू लागले. यासाठी त्यांना फक्त 50 रुपये खर्च आला. हीच खरी इंडस नेट टेक्नॉलॉजी कंपनीची खरी सुरुवात ठरली.

ही आहे कंपनीची अचिव्हमेंट्‍स...
> सन 2008 मध्ये डन व ब्रॅडस्ट्रीटने 'इंडस नेट टेक्नॉलॉजी'ला पहिला #IT SMEचा किताब दिला.
> सन 2010 मध्ये नासकॉमने इमरजिंग 50 कंपनीत 'इंडस नेट टेक्नॉलॉजी'ला स्थान दिले.
> टेक्नॉलॉजी क्षेत्रात आशियातील पहिल्या 500 कंपन्यात डेलॉएट टेक्नॉलॉजीने 'इंडस नेट टेक्नॉलॉजी'ला स्थान दिले.
> डेलॉएटने 2011 मध्ये भारतातील 50 सर्वात फास्त ग्रोइंग कंपन्यांमध्ये 'इंडस नेट टेक्नॉलॉजी'ला स्थान दिले.
मिळाले अवॉर्ड
> बंगाल कॉर्पोरेट अवॉर्ड, 2013
> इंडिया एसएमई 100 अवॉर्ड, 2014
> फ्रेंचाइज इंडिया, स्मॉल बिझनेस ऑफ द ईयर अवॉर्ड, 2014

------------------------------------------
सौजन्य : दिव्य मराठी
------------------------------------------
----------------------------------------

Source : http://divyamarathi.bhaskar.com/news-hf/BUS-BSP-from-rs-50-to-rs-40-crore-its-a-success-of-indus-net-technology-5369535-NOR.html?seq=1

Post a Comment

0 Comments