कणा मोडला, तरी स्थापली ३४०० कोटींची कंपनी

कणा मोडला, तरी स्थापली ३४०० कोटींची कंपनी
------------------------------------------

सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेच्या ३१ वर्षीय लिझा फॉलजोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन वर्षांपूर्वी स्वत:च कंपनी सुरू केली होती तेव्हा लोक तिची थट्टा करायचे. म्हणायचे, लकवा झालेली ही मुलगी काय करू शकेल? पण लिझाने आपली हेटाळणी करणाऱ्यांची तोंडे आज अत्युच्च कामगिरी करून बंद केली आहेत. आज ती सुमारे ३४०० कोटी रुपयांच्या कंपनीची मालकीण आहे. लिझा लवकरच एक अब्ज डॉलर्सचा आयपीओ आणणार आहे. असे झाल्यास इतक्या प्रचंड रकमेचा आयपीओ सुरू करणारी ती जगातील पहिलीच महिला ठरेल.

लिझाने २०१३ मध्ये रिव्हेल सिस्टिम (http://revelsystems.com) कंपनी सुरू केली होती. मणक्याचे हाड मोडल्यानंतर लकवा आल्याने ती अंथरुणाला खिळली होती. याच काळात तिला ही कल्पना सुचली. २०१० मध्ये लिझा स्टॅनफोर्ड विद्यापीठात व्यवस्थापनात पदवी घेत होती. ती विद्यापीठात जलतरणही करायची. एके दिवशी पोहण्यासाठी घराबाहेर निघाली असताना अचानक पायऱ्यांवरून कोसळली. पाठीचा कणाच मोडल्याचे डॉक्टरी निदानात स्पष्ट झाले. ऑपरेशनमुळे लिझा उठबस करू शकत नव्हती. एक वर्षभर फिजिओथेरपी चालली.

२०१३ मध्ये लिझाने पदवी शिक्षण पूर्ण केले. आरोग्य थोड सुधारले. तंदुरुस्त झाल्यानंतर कंपनी सुरू केली आणि सेवेला ‘पॉइंट ऑफ सेल’ नाव दिले, जेणेकरून कामात उशीर होऊ नये. रिव्हेल सिस्टिम आयपॅडवर चालते. कंपनी रेस्तराँ, बार, किरकोळ किराणा, फूड ट्रक, काॅफी शॉप, इव्हेंट, मोबाइल, चित्रपट आदींचा व्यवसाय करते. कंपनीत ४०० कर्मचारी आहेत. लिझा दरवर्षी दोन मुलींना टेक फील्डमध्ये काम करण्यासाठी ७ लाखांची शिष्यवृत्तीदेखील देते.

किरकोळ क्षमतेची मुलगी म्हणवून घेणे मला आवडते, म्हणूनच यशस्वी आहे
एके दिवशी स्वत:ची कंपनी सुरू करायची, असा विचार मी नेहमी करायचे. तथापि, त्याची योजना आखायला मला वेळच मिळायचा नाही. मग अचानक अंथरुणाला खिळल्यानंतर वेळ मिळाला. ही कल्पना सुचल्यानंतर मला खूप आनंद झाला. कंपनी सुरू केली आणि यशस्वीही ठरले. व्यवसायातही लैंगिक समानता असली पाहिजे. इतर महिलांनीही स्वत:ची कंपनी सुरू करायला पाहिजे. विशेषकरून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. महिलांना स्वत:वर विश्वास असला पाहिजे. कारण, बहुतांश लोकांना महिलांनी नेतृत्वाच्या भूमिकेत नसावे, असे वाटते. ते लोक माझी थट्टा करायचे, एखादी महिला एक अब्ज डॉलरचा आयपीओ आणेल, असा त्यांनी विचारही केला नसेल. मी कमी क्षमतेची मुलगी आहे, असे म्हणवून घेणे मला आवडते.
------------------------------------------

------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Post a Comment

0 Comments