मराठी उद्योजकाला शोधत जर्मन अधिकारी आला, ऑर्डर देऊन गेला

मराठी उद्योजकाला शोधत जर्मन अधिकारी आला, ऑर्डर देऊन गेला
-----------------------------------------

औरंगाबाद - पॅकेजिंग म्हणजे कोरुगेटेड बॉक्स एवढेच आपल्याला माहीत आहे. पण त्यातही जागतिक दर्जाचे संशोधन करून "बेस्ट' देण्याचा प्रयत्न करणारे उद्योजक संजय भाताडे यांचे वाळूज भागातील युनिट पाहण्यासाठी जर्मन कंपनीचा उच्चपदस्थ अधिकारी आला अन् वाळूजमध्येही वर्ल्ड क्लास पॅकेजिंग होत असल्याचे पाहून तो अवाक् झाला. त्याने ऑर्डर फायनल करून भाताडे यांना शुभेच्छा दिल्या.

वाळूज भागातील सेक्टरमध्ये संजय भाताडे यांचे विशाल पॅकेजिंग इंडस्ट्रीज नावाने युनिट आहे. त्यापुढे रांजणगाव ते जोगेश्वरी बनकरवाडीत केदारनाथ पॅकेजिंग नावाने दुसरे युनिट आहे. या युनिटमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅकेजिंग करून दिले जाते. मात्र, त्यांचे हे काम विदेशी कंपन्यांसमोर कधी आले नव्हते. सीमेन्स कंपनीचे मुख्यालय जर्मनीत आहे. त्यांना औरंगाबादेतील कारखान्यातून मलेशियाला ट्रान्सफॉर्मर बनवून पाठवण्याची ऑर्डर मिळाली.

प्रथमचमोठी ऑर्डर :
औरंगाबादच्याकारखान्यांतून विदेशात जाणार असल्याने सीमेन्सच्या जर्मनीतील मुख्यालयाने औरंगाबादला वर्ल्ड क्लास दर्जाचे पॅकेजिंग होते काय याची चौकशी केली. तेव्हा औरंगाबादच्या सीमेन्सच्या अधिकाऱ्यांनी भाताडे यांच्या कंपनीचे नाव सुचवले. ही कंपनी गेल्या वीस वर्षांपासून सीमेन्सला देशांतर्गत पॅकेजिंग करून देत आहे.

जर्मनीहूनअधिकारी वाळूजला :
जपानआणि जर्मनी हे दोन्ही देश तंत्रज्ञानाबाबत खूप प्रगत आहेत. ते दुसऱ्यांच्या तंत्रज्ञानावर पटकन विश्वास टाकत नाहीत. त्यामुळे वाळूज येथील भाताडे यांच्या युनिटची पाहणी करण्यासाठी सीमेन्सची टीम आली. यात जर्मनीहून स्टीफन शेजरीनर, शहरातील कंपनीचे अधिकारी प्रीतम कटारिया, अाशिष मिश्रा, सचिन मुळे यांचा समावेश होता. स्टीफन यांनी कारखान्याची बारीक पाहणी केली आणि काही मिनिटांतच पॅकेजिंगची मोठी ऑर्डर दिली.

जर्मनभाषेत केले स्वागत :
कोरुगेटेडबॉक्स प्रकारचे पॅकेजिंग युनिट संजय भाताडे यांनी वीस वर्षांपूर्वी सुरू केले. या कोकणी व्यक्तीच्या कुणीही ओळखीचे नव्हते. जवळ पुरेसा पैसाही नाही. अशा परिस्थितीतूनही वाट काढत त्यांनी केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पॅकेजिंगची पहिली ऑर्डर पूर्ण केली. आता त्यांच्या नावावर विदेशी अधिकारी कंपनीत येण्याची पाहिलीच वेळ होती. त्यामुळे जर्मन लोकांची मानसिकता समजून घेऊन त्यांचे स्वागत जर्मन भाषेत करणारा बोर्डच कंपनीच्या आवारात लावला. शिवाय जर्मन भाषेतच त्यांचे स्वागत केल्याने तो अधिकारी आश्चर्यचकित झाला.

सद््गुण जोपासल्यानेच यश
सतत नवे उद्योजक तयार करण्याची वृत्ती, चारित्र्यसंपन्नता, दूरदृष्टीबरोबर कष्टाची जोड असेल तर यश मिळतेच. हा मंत्र मी आयुष्यभर जपत आहे. तोच नवउद्योजकांना सांगतो. लहान भाऊ पत्नीचीही साथ मिळाल्याने मी प्रगती करू शकलो. - संजय भाताडे, सीईओ,केदारनाथ पॅकेजिंग इंडस्ट्रीज

------------------------------------------
सौजन्य : दिव्य मराठी
------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक        
------------------------------------------
Source : http://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-german-officer-in-search-of-marathi-industrialist-5347773-NOR.html

Post a Comment

0 Comments