Skip to main content

Posts

Showing posts from August, 2016

औषधी वनस्पतीच्या शेतीतून ८०,००० रुपये प्रति महिना कमविणारी ग्रामीण महिला -----------------------------------------

औषधी वनस्पतीच्या शेतीतून ८०,००० रुपये प्रति महिना कमविणारी ग्रामीण महिला
-----------------------------------------बुलडाणा: सर्वात जास्त शेतकरी आत्महत्यांचा भाग म्हणून विदर्भाकडे पाहिलं जातं. त्यामुळेच या भागातील शेती यशोगाथेला – त्यातही ती महिला शेतकऱ्याशी संबंधित असेल तर – एक वेगळंच महत्व आहे.बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, कोरडवाहू शेतीत पीक बदलातून महिन्याला लाख रुपये कमावणाऱ्या, बुलडाण्यातल्या सुनीता ताडे आहेत आजच्या खऱ्या शेतीतल्या नवदुर्गा, त्यांचीच ही यशोगाथासुनिता ताईंची शेती
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सुनगाव हे जळगाव जामोद या आदिवासी बहुल भागातलं एक गाव. सातपुड्याच्या सानिध्यातला हा परिसर अविकसित आणि समस्यांनी कायमच घेरलेला. याच भागात सुनिताताई ताडे यांची ८ एकर कोरडवाहू शेती आहे. खरीपात कापूस तूर आणि रबीत गहू भुईमुगाची लागवड आणि त्यापासून मिळणारं जेमतेम उत्पन्न, हे चक्र भेदायचं सुनिताताईंनी ठरवलं. त्यांनी एक एकरात लेंडी पिंपळी म्हणजेच पानपिंपळी या औषधी वनस्पतीची लागवड केली.पानपिंपळीची शेती
सुनीताताई यांनी लागवडी पूर्वी दोन ट्रॉली शेणखत टाकून शेत तयार केलं. त्यावर  न…

स्वराज्य मिळाले पण सुराज्यासाठी चला लढा देऊ या! जय हिंद!

स्वराज्य मिळाले पण सुराज्यासाठी चला लढा देऊ या! जयहिंद!
विसाव्या शतकात या देशाने गुलामी विरुध्द लढा दिला. भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. At the stoke of the midnight hour, when the world sleep, India will awake to life and freedom. A moment comes but rarely in history, when we step out from old to the new…. India discovers herself again. अश्या शब्दात पंडीत नेहरू यांनी या क्षणाचे स्वागत केले होते.


स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला पंडित नेहरुंनी दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळ…

Denise

Denise ने एका लग्नाहून परतताना आपली आई Cheryl Huffton ला आपली कल्पना सांगितली की आई मी इको-फ्रेंडली वस्तूंचा एक व्ययसाय सुरू करतेय ज्यात तू माझी भागिदार आहेस. सोळा वर्षांपासून शिक्षिकेची नोकरी करत असलेली Cheryl आपल्या मुलीने अचानक समोर ठेवलेल्या या प्रस्तावाने गांगरूनच गेली आणि तिने पहिल्याच फटक्यात मुलीचा हा प्रस्ताव नाकारला.लग्नात इको-फ्रेंडली नॅपकीन पाहून Denise च्या डोक्यात ही व्यवसायाची कल्पना आली होती. त्या रात्री Denise ला झोप लागणारी नव्हती. रात्रभर जागून तिने आपल्या डोक्यात असलेल्या महिलांसाठी तयार कपड्यांच्या काही डिझाइन्स तयार केल्या. आईने हा प्रस्ताव नाकारला असला तरी तिलाही या डिझाइन्स खूप आपडल्या होत्या.त्याच वेळी प्रेमा या Cheryl च्या मोलकरीणीचा, जिने Denise ला अगदी लहानाची मोठी केली होती, तिचा पाय उच्च मधुमेहामुळे कापण्यात आला होता आणि तिच्या घरातल्यांनी ती निकामी झाली म्हणून तिला घराबाहेर केले होते. प्रेमा Cheryl ला आपली अनाथालयात सोय करून द्यावी यासाठी विनवणी करत होती. दोघी मायलेकींना प्रेमाची दया येत होती आणि तिला मदत करावी हे त्या दोघींना आपलं कर्तव्य वाटत होतं.या प…

पेपर टाकणारा लहानगा आज आहे १६०० कोटींच्या कंपनीचा मालक

------------------------------------------
कसबा पेठेतून न्यू जर्सीपर्यंतची वेगवान आगेकूच. एक भन्नाट यशोगाथा. अथक परिश्रमाने आकाराला आलं एक अफलातून चाकोरीबाहेरचं व्यक्तिमत्त्व. ‘दीपक सखाराम कुलकर्णी.’याव्यतिरिक्त लेखाला वेगळं शीर्षक असण्याचं काहीच कारण नाही. एवढय़ा तीन शब्दांतून यशाचं संपूर्ण डीएसके विश्व डोळय़ांसमोर उभं राहतं.मजला क्रमांक २६. दुर्गामाता टॉवर्स. दक्षिण मुंबई. उजव्या हाताला मुकेश अंबानींचं पेंट हाऊस, हेलिपॅड. डावीकडे ताज, गेट वे सकट अख्खी मुंबई. पुण्यातील कसबा पेठेत वाढलेल्या दीपक नावाच्या मराठी मुलाने कफ परेड भागात बत्तीस मजल्यांचा अवाढव्य टॉवर बांधलाय. कसबा पेठ म्हणजे तेला तांबोळय़ांची वस्ती, असं खुद्द लोकमान्य टिळक म्हणत. पेपरची लाइन टाकून, टेलिफोन पुसत, अपार कष्ट करून तेला तांबोळय़ांच्या वस्तीतून लहानाचा ‘मोठ्ठा’झालेला दीपक आज सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक आहे.पूर्ण नाव दीपक सखाराम कुलकर्णी. वय ५५ ते ६०च्या अध्येमध्ये. त्यांनी मुंबई-पुण्यापासून, हैदराबाद, चेन्नई, अमेरिकेपर्यंत सर्वत्र घरं बांधली आहेत. पुणे-मुंबई प्रवासात, दिवसभराच्या मीटिंग्ज आणि बिझी शेडय़ूलमध्येही…