Skip to main content

औषधी वनस्पतीच्या शेतीतून ८०,००० रुपये प्रति महिना कमविणारी ग्रामीण महिला -----------------------------------------

औषधी वनस्पतीच्या शेतीतून ८०,००० रुपये प्रति महिना कमविणारी ग्रामीण महिला
-----------------------------------------

बुलडाणा: सर्वात जास्त शेतकरी आत्महत्यांचा भाग म्हणून विदर्भाकडे पाहिलं जातं. त्यामुळेच या भागातील शेती यशोगाथेला – त्यातही ती महिला शेतकऱ्याशी संबंधित असेल तर – एक वेगळंच महत्व आहे.

बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, कोरडवाहू शेतीत पीक बदलातून महिन्याला लाख रुपये कमावणाऱ्या, बुलडाण्यातल्या सुनीता ताडे आहेत आजच्या खऱ्या शेतीतल्या नवदुर्गा, त्यांचीच ही यशोगाथा

सुनिता ताईंची शेती
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सुनगाव हे जळगाव जामोद या आदिवासी बहुल भागातलं एक गाव. सातपुड्याच्या सानिध्यातला हा परिसर अविकसित आणि समस्यांनी कायमच घेरलेला. याच भागात सुनिताताई ताडे यांची ८ एकर कोरडवाहू शेती आहे. खरीपात कापूस तूर आणि रबीत गहू भुईमुगाची लागवड आणि त्यापासून मिळणारं जेमतेम उत्पन्न, हे चक्र भेदायचं सुनिताताईंनी ठरवलं. त्यांनी एक एकरात लेंडी पिंपळी म्हणजेच पानपिंपळी या औषधी वनस्पतीची लागवड केली.

पानपिंपळीची शेती
सुनीताताई यांनी लागवडी पूर्वी दोन ट्रॉली शेणखत टाकून शेत तयार केलं. त्यावर  नांगरणी आणि रोटावेटर करून २ बाय२ चे १२०० वाफे तयार करून घेतले, जानेवारी २०१३ मध्ये त्यात अंजनगाव सुर्जी येथून आणलेले पानपिंपळीची – बेणे टोचण पद्धतीने- लागवड केली. पांगाऱ्याच्या झाडावर हे पानपिंपळीचे वेल चढवले. वेळोवेळी खत- औषधांचं नियोजन केलं. पहिल्या वर्षी लागवडीसाठी या पिकाला दोन लाखांचा खर्च आला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी दीड लाख खर्च आला. पहिल्या वर्षी ८ क्विंटल उत्पादन मिळालं, आता १५ क्विंटलपर्यंत उत्पादन होत आहे. एकदा लागवड केल्यावर पुन्हा पुन्हा लागवड करण्याची गरज नसते.

तिसऱ्या वर्षी 15 क्विंटल उत्पादन
सुनीता ताडे यांचे पान पांगरा उत्पादनाचे हे तिसरे वर्ष आहे. त्यांना १५ क्विंटल उत्पादन झालंय ज्याला दिल्लीचे व्यापारी जागेवर ४८ हजार रुपये क्विंटलचा दर देतात. म्हणजे एकरी साडेसात लाख रुपये मिळतात, दीड लाखाचा खर्च वजा जाता पानपिंपळीपासून सहा लाखाचा निव्वळ नफा त्यांना मिळतोय.

महिलांना प्रशिक्षण
सुनीताताई आणि त्यांच्यासारख्या उद्यमशील महिलांच्या मदतीसाठी महिला आर्थिक विकास मंडळ माविमने (http://www.mavimindia.org) पुढाकार घेतला. त्यांच्या तेजस्विनी बचत गटातील महिलांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतलं, अर्थसहाय्यासोबतच माविमने शेतीतील नवनवीन प्रयोग करण्यासाठी महिलांना प्रोत्साहनही दिलं. त्यातूनच सुनीताताईंनी पानपिंपळी औषधी वनस्पती लागवड करुन आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरु केली.

बुलडाणा जिल्ह्यात वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक शेतकरी आहेत. पारंपरिक पिकांच्या पलिकडे जाऊन शेतीचा विचार केला तर शेती तोट्यात जाणार नाही असं सुनीताताई सांगतात.

क्लासवन अधिकाऱ्याएवढं मासिक उत्पन्न
बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या सुनिताताई जुनी परंपरागत कोरडवाहू शेती करत असत. त्यात त्यांना खर्च वजा जाता बेताचा नफा उरायचा. त्यांची शेतीपण निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असायची. त्याला वनौषधीची जोड देऊन सुनिताताई ताडे आज १० लाखांचा नफा कमावतायत. म्हणजे त्यांच्या ८ एकर शेतीतून महिन्याला ८० हजार रुपये मिळवतायत. थोडक्यात, बारावी पास सुनीताताई सुनगावसारख्या आदिवासी भागात शेतीतून क्लास वन अधिकाऱ्याचा पगार मिळवत आहेत. त्यामुळेच सुनिताताई आहेत शेतीतील नवदुर्गा.

- संदिप शुक्ला, एबीपी माझा, बुलडाणा

सौजन्य: एबीपी माझा
------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा
--------------------------

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…