Skip to main content

Posts

Showing posts from September, 2016

साध्या वेफर्स विक्रीतून उभारली १२०० कोटींची कंपनी !

साध्या वेफर्स विक्रीतून उभारली १२०० कोटींची कंपनी !
------------------------------------------
गुजरातमधील जामनगर जिल्हा काहीसा दुष्काळग्रस्त भाग. याच भागातील कलावड तालुक्यातील धुंधोराजी हे २००० लोकवस्ती असलेलं खेडेगाव. या गावातील पोपटभाई विराणी आपल्या कुटुंबासह शेतीवर गुजराण करत होते. आणि १९७२ चा तो भयंकर दुष्काळ पडला. पावसाचा थेंब नव्हता. शेती करणं अवघड झालं होतं. पोपटभाईंनी आपली पिढीजात जमीन विकून २० हजार रुपये आपल्या मुलांना व्यवसाय करण्यासाठी दिले. ही मुले राजकोटला आली. शेतीची पार्श्वभूमी असल्याने शेतीशी संबंधित काहीतरी व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी खते आणि कृषीविषयक साधने खरेदी केली. विकताना मात्र ही खते बनावट असल्याचं कळलं. विराणी बंधूंसाठी हा फार मोठा धक्का होता. वडलांनी वडिलोपार्जित जमीन विकून व्यवसायासाठी पैसा दिला होता. फसवणुकीमुळे पैसा पण गेला होता. आता पुढे काय करायचं हा यक्षप्रश्न होता. विराणी बंधूंनी एक कॉलेज कॅन्टीन चालवायचं ठरवलं. यावेळी चंदुभाई अवघा १७ वर्षांचा होता. ज्यावेळेस कॉलेज मध्ये पहिलं पाउल ठेवायचं वय असतं त्यावेळी हा किशोरवयीन मुलगा कॅन…

वय वर्ष 22, साधारण फॅशन ब्लॉगमधून करतेय कोट्यावधींचा व्यवसाय

वय वर्ष 22, साधारण फॅशन ब्लॉगमधून करतेय कोट्यावधींचा व्यवसाय
------------------------------------------
बारावीच्या नंतरच केवळ १७ वर्षीय मासूम मिनावाला हिने फॅशनच्या व्यापारी गोष्टींना समजण्याच्या उद्देशाने ब्रँड मार्केटिंग इंडियासह मार्केटिंगमध्ये इंटर्नशिपचा निर्णय केला. यादरम्यान त्यांना फॅशन ब्लॉगर्स विषयावर संशोधन प्रकल्प करण्यास मिळाला. मासूम सांगते की, फॅशन ब्लॉगिंगच्या संकल्पनेतून ती पहिल्यांदा ओळखीची झाली. त्यानंतर ती या प्रकल्पाने इतकी प्रभावित झाली की, तिने स्टाइल फिएस्टा डायरीज (http://www.stylefiestadiaries.com) नावाने आपला ब्लॉग सुरू केला. आवडीच्या धर्तीवर या ब्लॉगला काही वेळेत रीडर्सचे हजारो हिट्स, मोठ्या संख्येने कॉमेंट्स आणि आश्चर्यजनक फीडबॅक मिळायला सुरुवात झाली.कंपनी : स्टाइल फिएस्टा
संस्थापक: मासूम मीनावाला,
काय विशेष ? : फॅशन ज्वेलरी आणि अॅक्सेसरीजचे ऑनलाइन पोर्टल.प्रथम प्रशिक्षण घेतले :
जवळपासदीड वर्ष ब्लॉगिंग केल्यानंतर मासूमला जाणवले की, देशात फॅशन काही मोठ्या शहरांतील लोकांच्याच आवाक्यात आहे. दुसऱ्या बाजूने इंटरनॅशनल फॅशन वेबसाइट्सदेखील भारतीय बाजारात आपले उत्प…