वय वर्ष 22, साधारण फॅशन ब्लॉगमधून करतेय कोट्यावधींचा व्यवसाय

वय वर्ष 22, साधारण फॅशन ब्लॉगमधून करतेय कोट्यावधींचा व्यवसाय
------------------------------------------

बारावीच्या नंतरच केवळ १७ वर्षीय मासूम मिनावाला हिने फॅशनच्या व्यापारी गोष्टींना समजण्याच्या उद्देशाने ब्रँड मार्केटिंग इंडियासह मार्केटिंगमध्ये इंटर्नशिपचा निर्णय केला. यादरम्यान त्यांना फॅशन ब्लॉगर्स विषयावर संशोधन प्रकल्प करण्यास मिळाला. मासूम सांगते की, फॅशन ब्लॉगिंगच्या संकल्पनेतून ती पहिल्यांदा ओळखीची झाली. त्यानंतर ती या प्रकल्पाने इतकी प्रभावित झाली की, तिने स्टाइल फिएस्टा डायरीज (http://www.stylefiestadiaries.com) नावाने आपला ब्लॉग सुरू केला. आवडीच्या धर्तीवर या ब्लॉगला काही वेळेत रीडर्सचे हजारो हिट्स, मोठ्या संख्येने कॉमेंट्स आणि आश्चर्यजनक फीडबॅक मिळायला सुरुवात झाली.

कंपनी : स्टाइल फिएस्टा
संस्थापक: मासूम मीनावाला,
काय विशेष ? : फॅशन ज्वेलरी आणि अॅक्सेसरीजचे ऑनलाइन पोर्टल.

प्रथम प्रशिक्षण घेतले :
जवळपासदीड वर्ष ब्लॉगिंग केल्यानंतर मासूमला जाणवले की, देशात फॅशन काही मोठ्या शहरांतील लोकांच्याच आवाक्यात आहे. दुसऱ्या बाजूने इंटरनॅशनल फॅशन वेबसाइट्सदेखील भारतीय बाजारात आपले उत्पादन उपलब्ध करून देत नसत आणि जे उपलब्ध आहेत तेही प्रचंड महागडे असत. या समस्येच्या समाधानासाठी मासूमने विचार केला की, तिची पोस्ट जे लोक इंटरनेटवर पसंत करतात त्यांनाच आपण आपली उत्पादने खरेदी करण्याची संधी का उपलब्ध करून देऊ नये. याच संकल्पनेला बिझनेसचे रूप देण्यासाठी मासूमने आपले फॅशन पोर्टल लाँच करण्याचा निर्णय केला. वडिलांच्या सल्ल्यावर मासूमने सहा फॅशनच्या संबंधित पदविका कोर्स पूर्ण केले. मासूनच्या मतानुसार माझे वडील इच्छित होते की, मी आपला उद्योग सुरू करावा आणि त्यापूर्वी आपल्या या क्षेत्रावर मजबूत पकड निर्माण करावी.

२२ वर्षांची अनुभवी बिझनेस वुमन :
कोर्सपूर्ण तर झाल्यावर मासूम मुंबईत परतली आणि आपली ई-कॉमर्स वेबसाइट आहे त्यावरच काम सुरू केले. डिसेंबर २०१२ मध्ये वडिलांच्या आर्थिक मदतीसह मासूमने आपले फॅशन पोर्टल स्टाइल फिएस्टा लाँच केले. आपल्या ब्लागमार्फत मासूमने आपल्या वेबसाइटचा प्रचार सुरू केला आणि आपल्या रीडर्सना आपलाच ग्राहकही बनवून टाकाल. सुरुवातीचे चार महिने प्रारंभिक गुंतवणूकच फक्त भरून निघाली. उद्योगाच्या प्रारंभीपासून ते त्याला यशस्वी होईपर्यंत मासूमला अनेक समस्यांचा सामना करावा लागला; पण प्रत्येक अडथळ्याने त्यांना एक नवा अनुभव आणि आत्मविश्वास दिला. वर्ष २०१४ मध्ये स्टाइल फिएस्टाचा महसूल जवळपास १.५ कोटी रुपयांचा आकडा पार करून गेला आणि एक सामान्य फॅशन ब्लॉगला एका मोठ्या कंपनीत रूपांतरित करणारी आजची २२ वर्षीय मासूम सांगते की, मी कोणतेही काम अपयशाची भीती मनाशी बाळगून करत नाही. ती तिच्या समवयस्कांमध्ये आता एक आयकॉन बनली आहे. मासूम सांगते की, मी नेहमी विचार करते की जर माझी कल्पना जर यशस्वी झाली नाही तर सर्वात वाईट काय होईल, याचा विचार करून मी सर्व आव्हानांना स्वीकारते.

Post a Comment

0 Comments