Skip to main content

Posts

Showing posts from October, 2016

शून्यातून उभारले कोट्यवधींचे विश्व

शून्यातून उभारले कोट्यवधींचे विश्व
--------------------
घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. "जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट' हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या "फॅमिली'चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या "दास ऑफशोअर' कंपनीत झालाय.वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत... कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं... आयुष्यानं दिलेल्या चटक्‍यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते..."सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती. सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्ष…

इन्फोसिस सॉफ्टवेअर इंजिनिअर बनला पाणीपुरी उद्योजक

इन्फोसिस सॉफ्टवेअर इंजिनिअर बनला पाणीपुरी उद्योजक
------------------------------------------प्रशांत कुलकर्णी हा जेव्हा इन्फोसिस मध्ये काम करत होते तेव्हा त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात पाणीपुरी खाल्ली आणि फूड पोईजन होवून आजारी पडला, ह्यामुळे त्याला अनेक महिने त्याचे आवडते आणि अनेक लोकांचे आवडते खाद्यपदार्थ पाणीपुरी ह्यापासून वंचित रहावे लागले. ह्या घटनेने त्याचे आयुष्य बदलले, माहिती काढायला सुरवात केली, संशोधन केले तेव्हा त्यांना ह्या संपूर्ण भारतदेशातील पाणीपुरी खाद्यपदार्थाच्या व्यवसायामध्ये एकही ब्रँड आढळून नाही आला. इथेच त्यांनी भारतातील पहिले गपागप पाणीपुरी खाद्यपदार्थाचे ब्रँड सुरु केले.प्रशांत कुलकर्णीला जाणीव होती कि नोकरी सोबत स्वतःचे विश्व उभे करणे काही सोपे नाही आहे. प्रशांतकडे करोडोची कल्पना होती. त्याचे व्यवसायिक साथीदार आरती शिरसाट आणि पल्लवी कुलकर्णी सोबत तो गपागप ब्रँड आणि इतर खाद्यपदार्थ जसे ८० प्रकारच्या भेळ, २७ प्रकारचे चाट, पोहे इत्यादींचे व्यवस्थापन करतो.त्याने बिग बाझार शॉप सोबत करार केला आहे ज्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान मध्ये फ्रेन्चायझी…

2 रुपये रोजाने करत होती मजुरी; आज आहे 750 कोटींच्या कंपनीची मालकीन

2 रुपये रोजाने करत होती मजुरी; आज आहे 750 कोटींच्या कंपनीची मालकीन
---------------------------------------काही लोक गरीब कुटुंबात जन्म घेतात आणि संपूर्ण आयुष्य गरीबीच घालवतात. पण काही लोक असे असतात की, गरीबीवर मात करून श्रीमंत बनण्याचे स्वप्न पाहातात. अडचणीतून मार्ग काढून स्वत:चे नशीब स्वत:च्या हाताने लिहितात. इतकेच नव्हे तर, ते दुसर्‍यांसाठी प्रेरणा बनतात.आम्ही आपल्यासाठी अशाच एका होतकरु महिलेची यशोगाथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या महिलेचा जन्म एक गरीब दलित कुटुंबात झाला होता. तिचे कमी वयात लग्न झाले आणि काडीमोडीही झाला. पोटाची खडगी भरण्यासाठी तिला दोन रुपये रोजाने मजुरी करु लागली. पण, तिने परिश्रमाच्या जोरावर आज 750 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. कंपनीची ती मालकीन आहे. ही यशोगाथा आहे 'कमानी ट्यूब्स'च्या सीईओ कल्पना सरोज यांची.चला तर मग, जाणून घेऊया कापड मिलमध्ये एकेकाळी 2 रुपये रोजाने मजुरी करणार्‍या कल्पना यांची सक्सेस स्टोरी....हवालदाराच्या घरात जन्म....
कल्‍पना सरोज यांनी 1961 मध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा येथील दलित कुटुंबात जन्म घेतला. त्यांचे वडील प…

6 वर्षाचा निहाल दररोज कमवतो 1 लाख रुपये, त्याच्या अंगी आहे हे खास कौशल्य

6 वर्षाचा निहाल दररोज कमवतो 1 लाख रुपये, त्याच्या अंगी आहे हे खास कौशल्यनवी दि‍ल्‍ली- म्हणतात ना! बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सहा वर्षाचा नि‍हाल राज हा असाच काहीसा आहे. इतक्या कमी वयात त्याने अनेक गुण संपादन केले आहे. त्याच्या अंगी उत्कृष्ट स्वयंपाक बनवण्याचे कौशल्य आहे.निहाल आपल्या टॅलेंटच्या जोरावर दिवसाकाठी एक लाख रुपये कमवतो. तो एक कुकरी शो चालवतो. त्याचा हा शो सोशल मीडि‍यावर नेहमी ट्रेंडमध्ये असतो.       

असे लॉन्‍च केले ‘यूटयूब’ चॅनल
निहाल लहानपणापासून आईला किचनमध्ये मदत करत आहे. तेव्हा त्याचे वडील त्याचा व्हिडिओ बनवत होते. नंतर व्हिडिओ त्यांनी फेसबुक अकाउंटवर शेअर केला. यूजर्सनी  निहालचे खूप कौतुक केले. तेव्हा निहालच्या वडीलांनी यूट्यूब चॅनल ‘किचाट्यूब’ बनवण्याचा निर्णय घेतला. चॅनलवर निहालचा प्रत्येक व्हिडिओ अपलोड होऊ लागला. तसे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. निहाल राजचे यूटयूब चॅनल जानेवारी 2015 मध्ये लॉन्च झाले होते.
निहाल कुकरी शो करतो....
‍निहालला अमेरिकन पॉपलुर शो 'एलेन डी जेनरेस' शोमध्ये पुटटु नामक एक रेसिपीचा अवॉर्ड देण्यात आला होता. तो यूटयूब चॅनलवर स्वत…

बदलांनी विचलित होऊ नका, व्यवसायाकडे लक्ष द्या

बदलांनी विचलित होऊ नका, व्यवसायाकडे लक्ष द्या
मुंबई : कंपनीच्या सर्वोच्च पातळीवरील नेतृत्वात झालेल्या बदलांनी विचलित होऊ नका, आपल्या व्यवसायाकडे, तसेच बाजारातील नेतृत्वाकडे लक्ष द्या, असे आवाहन टाटा सन्सचे नवे चेअरमन रतन टाटा यांनी मंगळवारी केले. आपली चेअरमनपदी झालेली निवड हंगामी स्वरूपाची आहे, नवा चेअरमन लवकरच शोधला जाईल, असेही टाटा यांनी सांगितले.सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर, रतन टाटा यांनी काल टाटा सन्सच्या सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर, आज त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. टाटाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाउसमध्ये झालेली ही बैठक तीन तास चालली. उद्योग समूहाच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करून, नंतर रतन टाटा यांच्या भाषणाचा तपशील माध्यमांना देण्यात आला.नेमले दोन नवे संचालकटाटा सन्सवर मंगळवारी राल्फ स्पेथ आणि एन. चंद्रशेखरन यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्पेथ या समुहातील जग्वार लॅण्ड रोव्हर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर चंद्रशेखरन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनीचे मुख्य कार्यकारी …

पोल्ट्रीमधील २२०० कोटींचे सुलतान

पोल्ट्रीमधील २२०० कोटींचे सुलतान
------------------------------------------------------------
‘हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा’ अशी उर्दू भाषेत एक म्हण आहे. त्याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीकडे हिंमत आहे, जो हिंमतीने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जातो. त्याच्या मदतीला देव सदैव तत्पर असतो. ही म्हण आठवण्याचं कारण म्हणजे बहादूर अली. लहानपणी अकाली बाबांचं निधन झालं. कुटुंबाचा सगळा भार अंगावर आला. आलेल्या परिस्थितीवर मात करत प्रसंगी सायकल दुरुस्तीचं काम केलं. पण हिंमत हरली नाही. आपल्या नावाला जागत बहादूर अलीने शून्यातून व्यवसाय उभारला. २००० कोटींच्या वर कंपनीची उलाढाल नेत कुक्कुटपालन क्षेत्रातील भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून नावलौकीक मिळवला. छत्तीसगड मधील राजनंदगाव. अवघी १६ लाख लोकसंख्या असलेला जिल्हा. याच ठिकाणी एका गरीब मुस्लीम कुटुंबात बहादूर अलीचा जन्म झाला. सर्व काही आलबेल आहे असं वाटत असतानाच बहादूर अलीच्या बाबांचा अकाली मृत्यू झाला. लहान वयातच बहादूर अलीवर कुटुंबाची जबाबदारी आली. मोठा भाऊ सुलतान अली घरचं सायकल दुरुस्त करण्याचं छोटंसं दुकान सांभाळत होता. बहादूर अली त्याला मदत करु…

धंद्यासाठी भांडवल कसे उभारायचे?

धंद्यासाठी भांडवल कसे उभारायचे? व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. तुमच्याकडे अजिबात भांडवल नसेल तर धंदा सुरु करण्याचे स्वप्न बघू नका. बियाण्याविना शेती होत नसते, तसेच पैशाविना धंदाही होत नाही. बीजभांडवल हे बहुधा वैयक्तिक बचत, कुटूंबियांनी पुरवलेला निधी, नोकरी करुन साठलेली शिल्लक यातून उभारले जाते. लक्षात ठेवा, धंद्याचा शुभारंभ कधीही उसने मागून आणलेल्या पैशातून किंवा कर्जाच्या पैशाने करु नका. त्यामागे एक श्रद्धा आहेच, परंतु चतुराईचा भाग जास्त आहे. आम्ही शाळकरी वयात होळीची लाकडे जमवण्यासाठी एक युक्ती करायचो. गावातील कुणाचीही लाकडे लंपास करायची नाहीत, असा घरातल्यांचा दंडक होता त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या घरातून एक लाकूड घेऊन येई. मग ती मोळी आम्ही सगळ्या घरांपुढे मिरवत न्यायचो आणि मोठ्या नम्रतेने घरमालकाला सांगत असू, की इतरांप्रमाणे तुम्हीही होळीला एखादे लाकूड द्या. प्रत्येकाला वाटायचे, की शेजाऱ्याने लाकूड दिलंय तर आपणही द्यावे. अशा रीतीने आमचा हेतू साध्य व्हायचा. व्यवसायातही अशीच युक्ती कामी येते. आधी आपले पैसे गुंतवून धंदा सुरु करावा. नवउद्योगांसाठी सरकारच्या अनेक प…

धंद्यासाठी भांडवल कसे उभारायचे?

धंद्यासाठी भांडवल कसे उभारायचे? व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. तुमच्याकडे अजिबात भांडवल नसेल तर धंदा सुरु करण्याचे स्वप्न बघू नका. बियाण्याविना शेती होत नसते, तसेच पैशाविना धंदाही होत नाही. बीजभांडवल हे बहुधा वैयक्तिक बचत, कुटूंबियांनी पुरवलेला निधी, नोकरी करुन साठलेली शिल्लक यातून उभारले जाते. लक्षात ठेवा, धंद्याचा शुभारंभ कधीही उसने मागून आणलेल्या पैशातून किंवा कर्जाच्या पैशाने करु नका. त्यामागे एक श्रद्धा आहेच, परंतु चतुराईचा भाग जास्त आहे. आम्ही शाळकरी वयात होळीची लाकडे जमवण्यासाठी एक युक्ती करायचो. गावातील कुणाचीही लाकडे लंपास करायची नाहीत, असा घरातल्यांचा दंडक होता त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या घरातून एक लाकूड घेऊन येई. मग ती मोळी आम्ही सगळ्या घरांपुढे मिरवत न्यायचो आणि मोठ्या नम्रतेने घरमालकाला सांगत असू, की इतरांप्रमाणे तुम्हीही होळीला एखादे लाकूड द्या. प्रत्येकाला वाटायचे, की शेजाऱ्याने लाकूड दिलंय तर आपणही द्यावे. अशा रीतीने आमचा हेतू साध्य व्हायचा. व्यवसायातही अशीच युक्ती कामी येते. आधी आपले पैसे गुंतवून धंदा सुरु करावा. नवउद्योगांसाठी सरकारच्या अनेक प…