2 रुपये रोजाने करत होती मजुरी; आज आहे 750 कोटींच्या कंपनीची मालकीन

2 रुपये रोजाने करत होती मजुरी; आज आहे 750 कोटींच्या कंपनीची मालकीन
---------------------------------------

काही लोक गरीब कुटुंबात जन्म घेतात आणि संपूर्ण आयुष्य गरीबीच घालवतात. पण काही लोक असे असतात की, गरीबीवर मात करून श्रीमंत बनण्याचे स्वप्न पाहातात. अडचणीतून मार्ग काढून स्वत:चे नशीब स्वत:च्या हाताने लिहितात. इतकेच नव्हे तर, ते दुसर्‍यांसाठी प्रेरणा बनतात.

आम्ही आपल्यासाठी अशाच एका होतकरु महिलेची यशोगाथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या महिलेचा जन्म एक गरीब दलित कुटुंबात झाला होता. तिचे कमी वयात लग्न झाले आणि काडीमोडीही झाला. पोटाची खडगी भरण्यासाठी तिला दोन रुपये रोजाने मजुरी करु लागली. पण, तिने परिश्रमाच्या जोरावर आज 750 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. कंपनीची ती मालकीन आहे. ही यशोगाथा आहे 'कमानी ट्यूब्स'च्या सीईओ कल्पना सरोज यांची.

चला तर मग, जाणून घेऊया कापड मिलमध्ये एकेकाळी 2 रुपये रोजाने मजुरी करणार्‍या कल्पना यांची सक्सेस स्टोरी....

हवालदाराच्या घरात जन्म....
कल्‍पना सरोज यांनी 1961 मध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा येथील दलित कुटुंबात जन्म घेतला. त्यांचे वडील पोलिस विभागात हवालदार होते. कल्पना यांना दोन भाऊ व तीन बहीणी आहेत. मोठ्या अडचणींच्या सामना करत वडीलांनी मुलांचे पालनपोषण केले. कल्पना यांना शिक्षणासाठी सरकारी शाळेत जावे लागले.

कमी वयात लग्न...
कल्पना 12 वर्षाच्या होत्या, तेव्हा वडीलांना त्यांना शिक्षण सोडण्यास सांगितले. तेव्हा त्या सातव्या वर्गात शिकत होत्या. सामाजिक जबावाखाली त्यांच्या वडिलांनी कमी वयातच त्यांचे लग्न लावून दिले. कल्पना यांच्या पतीचे त्यांच्यापेक्षा तब्बल दुप्पट वय होते. पण कल्पना यांचा विवाह जास्त दिवस टीकला नाही. त्यांना सासरच्या मंडळीने इतका त्रास दिला की, अखेर त्यांना माहेरी येऊन राहावे लागले.

कापड मिलमध्ये 2 रुपये रोजाने काम केले....
कल्पना यांनी काकांकडे मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. कल्पना यांचे काका मुंबईतील एका स्लम वस्तीत राहात होते. ते पापड विकून आपला गुजारा करत होते. कल्पना यांना शिलाई काम येत होते. एके दिवशी काका कल्पना यांना एका कापड मिलमध्ये घेऊन गेले. पण, सुरुवातीला कल्पना यांना काम देण्यास मालकाने नकार दिला. बरीच विनंती केल्यानंतर 2 रुपये रोजाने दोरा कापण्याचे काम दिला मिळाले.

येथून बदलले कल्पना यांचे जीवन...
सर्वकाही ठीक सुरु असताना कल्पना यांच्या आयुष्यात एक घटना घडली. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्य बदलून गेले. त्यांची मोठी बहीण खूप आजारी होती. उपचारासाठी रुपये नसल्याचे तिचे निधन झाले. गरीबीशिवाय सर्वात वाईट दुसरी गोष्ट नाही, ही भावना कल्पना यांच्या मनात निर्माण झाली. कल्पना यांनी त्याच दिवशी मनाशी खुनगाठ बांधून श्रीमंत होण्याचा निर्धार केला.

कल्पना यांनी अशी निर्माण केली स्वत:ची ओळख....
कल्पना यांनी कर्ज घेऊन काही शिलाई मशीन खरेदी केल्या. त्या स्वत: 16-16 तास काम करू लागल्या. काही सरकारी योजनांचा अभ्यास केला. बँकांकडून कर्ज घेऊन अल्पावधीत त्यांना बिझनेसचा विस्तार केला. स्वत:ची ओळख निर्माण केली.

सुरु केला फर्नीचरचा बिझनेस...
कल्पना यांनी एका सरकारी योजनेतून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले. 22 वयात फर्नीचरचा बिझनेस सुरु केला.

कल्पना यांनी उभारले 4.5 कोटी रुपये...
कल्पना यांना एक प्लॉट 1 लाख रुपयांत मिळाला. पण त्यातून मोठा वाद झाला. वाद सुटला तेव्हा या प्लॉटची किंमत 50 लाख रुपयांच्या घरात झाली होती. कल्पना यांनी प्लॉटवर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी एका बिझनेसमनसोबत पार्टनरशिप केली. नफ्यातून 65 टक्के हिस्सा (4.5 कोटी रुपये) कल्पना यांना मिळाला.

'कमानी ट्यूब्स'च्या बनल्या मालकीन...
'कमानी ट्यूब्स' कंपनी 1985 मध्ये काही कारणास्तव बंद पडली होती. नंतर कंपनीची हक्क कामगारांना देऊन कंपनी पुन्हा सुरु झाली. पण, कामगार कंपनी चालवण्यास तयार नव्हते. कल्पना यांना संचालक मंडळावर घेण्यात आल्यानंतर कंपनी सुरु झाली. 2006 मध्ये कोर्टाने कल्पना यांना 'कमानी ट्यूब्स इंडस्ट्रीज'ची मालकीन बनवले. कल्पना यांनी एका वर्षात कंपनीवरील सर्व कर्ज फेडले. कामगारांचा थकलेला पगार केला. आज ही कंपनी 750 कोटी रुपयांचा बिझनेस करत आहे. कल्पना यांना 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Post a Comment

0 Comments