6 वर्षाचा निहाल दररोज कमवतो 1 लाख रुपये, त्याच्या अंगी आहे हे खास कौशल्य

6 वर्षाचा निहाल दररोज कमवतो 1 लाख रुपये, त्याच्या अंगी आहे हे खास कौशल्य

नवी दि‍ल्‍ली- म्हणतात ना! बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सहा वर्षाचा नि‍हाल राज हा असाच काहीसा आहे. इतक्या कमी वयात त्याने अनेक गुण संपादन केले आहे. त्याच्या अंगी उत्कृष्ट स्वयंपाक बनवण्याचे कौशल्य आहे.

निहाल आपल्या टॅलेंटच्या जोरावर दिवसाकाठी एक लाख रुपये कमवतो. तो एक कुकरी शो चालवतो. त्याचा हा शो सोशल मीडि‍यावर नेहमी ट्रेंडमध्ये असतो.       


असे लॉन्‍च केले ‘यूटयूब’ चॅनल
निहाल लहानपणापासून आईला किचनमध्ये मदत करत आहे. तेव्हा त्याचे वडील त्याचा व्हिडिओ बनवत होते. नंतर व्हिडिओ त्यांनी फेसबुक अकाउंटवर शेअर केला. यूजर्सनी  निहालचे खूप कौतुक केले. तेव्हा निहालच्या वडीलांनी यूट्यूब चॅनल ‘किचाट्यूब’ बनवण्याचा निर्णय घेतला. चॅनलवर निहालचा प्रत्येक व्हिडिओ अपलोड होऊ लागला. तसे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. निहाल राजचे यूटयूब चॅनल जानेवारी 2015 मध्ये लॉन्च झाले होते.


निहाल कुकरी शो करतो....
‍निहालला अमेरिकन पॉपलुर शो 'एलेन डी जेनरेस' शोमध्ये पुटटु नामक एक रेसिपीचा अवॉर्ड देण्यात आला होता. तो यूटयूब चॅनलवर स्वत: ‘कुक‍री शो’ देखील चालवतो. वह कुकरी शोमध्ये तो इनोव्हेटिव्ह डिशेस बनवतो. सॉल्‍टी डिशेसपेक्षा तो डेजर्ट बनवणे त्याला आवडते. मिकी माउस मॅंगो रेसिपीने त्याला फेसबुकवर प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर तो लाइव्ह शो करु लागला. नि‍हाल राजचा व्हिडिओ शेअर करण्यासाठी फेसबुकवर एक स्‍लॉट देखील देण्यात आला आहे. या स्‍लॉटसाठी त्याला 2000 डॉलर अर्थात 1,33521 रुपये दिले जातात. 

निहालची रेसिपी पसंत करतात लोक
या ‘लिटिल शेफ’ची रेसि‍पीज टेस्‍ट करण्यासाठी लोकांच्या अक्षरश: उड्या पडतात.  वडीलांनी त्याच्या रेसिपीज यूटयूबवर शेअर केल्या. या रेसिपीजचे व्हिडिओ बनवले जातात. हे सर्व व्हिडिओ यूटयूब चॅनलवर लॉन्‍च केले जातात. निहालच्या रेसि‍पीजला  ऑडि‍यन्सकडून खूप पसंती मिळते. तसेच शेअर केल्या जातात.


निहाल राज हा कोचीचा राहाणारा आहे. लि‍टि‍ल शेफ ‘नि‍हाल-राज’ला स्वयंपाक बनवण्याची प्रचंड आवड आहे. 'लि‍टि‍ल शेफ’ म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवण्याचे त्याचे स्वप्न आहे. .

‘कि‍चाटयूब’ हे आता पॉपुलर चॅनल बनले आहे. याद्वारा त्याला अनेक पॉपुलर शेफला भेटण्याची संधी मिळाली. त्यात संजीव कपूर, कुणाल कपूर यांचा समावेश आहे. 
एवढेच नाही तर त्याला अनेक कुकिंग रियालिटी शोच्या देखील ऑफर मिळाल्या आहेत.

 

Post a Comment

0 Comments