ऑनलाइन पैसा कमावण्याची आयडियाघरी बसून ऑनलाइन पैसा कमावण्याची आयडिया खूप लोकप्रिय ठरत‍ आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना घरबसल्या ऑनलाइन जॉब (Work Form Home) करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. इंटरनेटमुळे हे शक्य झाले आहे. भारतासह इतर देशांमध्ये 65,000 पेक्षा जास्त लोक दर महिन्याला घर बसल्या ऑनलाइन जॉब करून 10 हजार ते 40 हजार रुपये मिळवत आहेत.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला नऊ शानदार ऑनलाइन जॉब्सविषयी माहिती देत आहोत. या माध्यमातून तुम्ही देखील घरबसल्या चांगली कमाई करू शकतात.

कंपन्यांच्या जाहिराती वाचण्याचा जॉब...
ऑनलाइन जाहिराती वाजून मोठा पैसा कमावता येतो, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. इंटरनेटवर विविध कंपन्या जाहिरात देत असतात. हा जॉब जाहिरातीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे हा ऑनलाइन जॉब खूप लोकांना करण्यास आवडतो. पैसा कमावण्यासाठी सर्वोत्कृष्ट ऑनलाइन जॉब आहे.

जगभरात जाहिरातीचा मोठा बिझनेस चालतो. विविध कंपन्या आपल्या बजेटनुसार माध्यमांची निवड करतात. जाहिरातीच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते. ऑनलाइन जाहिराती देणार्‍या अनेक कंपन्या आहेत. जाहिराती वाचण्यासाठी यूजर्सला या कंपन्या मानधन देत असतात. या वेबसाइट्सवर साइनअप करून तुम्ही जाहिराती वाचून घर बसल्या पैसा कमावू शकतात.

ऑनलाइन मायक्रो जॉब
मायक्रो जॉब अर्थात छोटे काम. याचा अर्थ असा की, हे काम करण्यासाठी जास्त श्रम लागत नाही. येथे बुद्धी लावावी लागते. हे काम करण्‍यासाठी काही मिनिटे लागतात. इतकेच नव्हे तर काही सेकंदातही हे काम होऊन जाते. जगात ऑनलाइन मायक्रो जॉब देणार्‍या अनेक कंपन्या आहेत. त्यात mturk व MicroWprkers या कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्या लोकांना ऑनलाइन जॉबची संधी उपलब्ध करून देतात. एका जॉबचे पाच रुपये ते 100 रुपयांपर्यंत मानधन मिळते.

ऑनलाइन सर्व्हे जॉब
ऑनलाइन सर्व्हे करून चांगला पैसा कमावता येतो. ऑनलाइन सर्व्हेमध्ये अनेक कंपन्या वेगवेगळ्या उत्पादन व सेवेविषयी माहिती देत असतात. उत्पादन विक्रीसाठी प्रोत्साहीत करणे, हा या कंपन्यांचा मुख्य उद्देश असतो. या कामासाठी कंपन्या ऑनलाइन सर्व्हे करतात आणि त्यासाठी यूजरला मोबदलाही देतात.

ऑनलइन फोटो सेलिंगचा जॉब
ऑनलाइन जॉबच्या यादीतील आणखी एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे ऑनलाइन फोटो सेलिंगचा जॉब होय. कॉम्प्यूटर, लॅपटॉपवरच नव्हे तर स्‍मार्टफोनवरही हा जॉब घर बसल्या करता येतो. निसर्ग, जंगली प्राणी, रियल लाइफ इन्सिडेंट व निसर्गरम्या ठिकाणांचे छायाचित्र काढून तुम्ही ते ऑनलाइन विक्री करू शकतात. विशेष म्हणजे PhotoBucket, Shutterstock व iStock आदी विकून भरपूर पैसा कमावू शकतात.

घरबसल्या ब्‍लॉगिंग करा...
ऑनलाइन जॉबसाठी इंटरनेटवर आधारित ब्‍लॉगिंग हे देखील पैसा कमावण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. त्यात तुम्ही स्वत:चा ब्लॉग बनवू शकतात. यावर नियमत ब्लॉग लिहिल्यास गूगल AdSense नुसार प्रत्येक ब्‍लॉगवर मिळणार्‍या क्लिकनुसार पैसा मिळतो. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या ब्‍लॉग लिहून पैसा कमावू शकतात.

ऑनलाइन कॅप्‍चा सॉल्विंग जॉब
तुम्ही ऑनलाइन डाटा एंट्री जॉबच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी चांगली माहिती आहे. ऑनलाइन कॅप्‍चा इंट्रीचे काम करून तुम्ही भरपूर पैसा कमावू शकतात. देश व जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत. हजारो व लाखोंच्या संख्येत वेबसाइट आहेत. त्यांना कॅप्‍चाच्या माध्यमातून सुरक्षित केले जाते. तुम्ही एक ते दोन तासांत एक हजार कॅप्‍चा सॉल्व्ह करू शकतात. प्रत्‍येक एक हजार कॅप्‍चावर 1 ते 2 डॉलर कमावू शकतात.

प्रमोशन एफिलिएटेड जॉब
अलिकडे भारतात अशा साइट पॉपुलर होत आहे. येथे लोक ऑनलाइन शॉ‍पिंग करतात. यात फ्लिपकार्ट, अमेजन, स्‍नॅपडील, ईबे आदींचा समावेश आहे. या साइट प्रमोशन एफिलिएटेड जॉबसाठी भरपूर पैसा मोजतात. दरम्यान ऑनलाइन शॉपिंगची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या साइटशी फ्लिपकार्ट एफिलिएट, अमेजन डॉट इन एफिलिएट व इतर मोठ्या भारतीय साइट एफिलिएट बनून प्रत्‍येक वस्तूच्या विक्रीवर 4 टक्के ते 10 टक्के मानधन मिळवू शकतात.

फ्रीलांसिंग जॉब
फ्रीलांसिंग अर्थात स्‍वतंत्र रूपात केले जाणारे काम. फ्रीलांसिंगच्या माध्यमातून कस्टमरला त्याच्या गरजेनुसार सेवा दिली जाते. यात तुम्ही अट व मर्जीनुसार काम करू शकतात. तसेच तुम्ही घरबसर्‍या जॉबच्या शोधात असाल तर रायटिंग, ऑनलाइन प्रमोशन, वेब डिझायनिंग, कोडिंग, व्हिडिओ बनवणे, फोटोग्राफी व इमेज एडिटिंग सारखे जॉब्स करून भरपूर पैसा कमावू शकतात.

ऑनलाइन रायइटिंग जॉब
ज्या लोकांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन रायटिंग जॉब चांगला सिद्ध होऊ शकतो. आज जवळपास सर्वच वेबसाइट वाचनिय कंटेंट आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे काम देतात. यासाठी ऑनलाइन रायटरची मागणी असते. ही वेबसाइट एका आर्टिकलसाठी 250 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत मानधन देतात. या सारख्ये वेबसाइटमध्ये Fiverr, Elance व Freelance.com आदी प्रमुख आहेत.

Post a Comment

0 Comments