एका IDEA ने बदलले आयुष्य, जिद्दीच्या जोरावर उभे केले 1000 शहरांमध्ये साम्राज्य ---

एका IDEA ने बदलले आयुष्य, जिद्दीच्या जोरावर उभे केले 1000 शहरांमध्ये साम्राज्य
------------------------------------------

जयपूर (राजस्थान)- शाळेत विज्ञानाचे शिक्षक नव्हते. शिक्षणाच्या सोई उपलब्ध नव्हत्या. पण त्यांना आयआयटीत जायचे होते. त्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः घेऊन आयआयटीचे स्वप्न साकार करुन दाखवले. जेव्हा पैसे कमवण्याची वेळ आली तेव्हा ऑनलाइन बिझनेस करण्याचा निश्चय केला. या क्षेत्रात पाऊल ठेवताच त्यांच्या आयडियाला 25 गुंतवणुकदारांनी खारीज केले. पण त्यांचा उत्साह कमी झाला नाही.

त्यांनी ऑनलाइन क्लासिफाईड प्लॅटफॉर्म quikr चा तब्बल 1000 शहरांमध्ये विस्तार केला. आता प्रत्येक महिन्याला तब्बल 3 कोटी युजर्स quikr वर येतात.

ही गोष्ट आहे, जयपूरमध्ये जन्मलेले आणि दरीबा गावातून शालेय शिक्षण पूर्ण करणारे प्रणय चुलेट यांची. . त्यांनी खास आमच्यासोबत संवाद साधताना आयुष्यातील खासगी बाबी आणि ऑनलाईन बिझनेसची सहस्ये त्यांनी शेअर केली.

शाळेत सायंसचे टिचर नव्हते. अशा वेळी घरी बसून कशी तयारी केली?
माझा जन्म जयपूरमध्ये झाला. पराभव न स्वीकारण्याची मानसिकता बालपणीच घडली. वडीलांची पोस्टिंग दरीबा माइन्समध्ये होती. मी केंद्रीय विद्यालयात शिकत होतो तेव्हा आम्हाला सायंस टिचर नव्हते. पण मला आयआयटीत जायचे होते. मी माझ्या बळावर तयारी केली. तेव्हा त्या क्षेत्रातून आयआयटी दिल्लीत जाणार मी पहिला विद्यार्थी होतो.

ऑफिसमध्ये दरीबा माईंसची ब्लूप्रिंट?
दरीबा माईंसची ती जागा मला आजही माहित आहे, जी एकदम पडीक होती. माझे वडील तेथे अधिकारी होते. मी त्या जागेला ब्लुप्रिंटपासून एक मोठी माईन होताना बघितले आहे. तेव्हापासून वाटले, की आयडिया लागू करतो तोच लीडर असतो.

प्रोफाइल- प्रणय चुलेट
शिक्षण- आयआयटी दिल्ली केमिकल इंजिनिअरिंग आणि आयआयएम कोलकाता येथून एमबीए

मला बालपणापासूनच बिझनेस करायचा होता. मी दहा वर्षे अमेरिकेत राहिलो. न्युयॉर्कला गेलो तर स्वतःची कंपनी सुरू केली. 2000 मध्ये तेथे डॉट कॉम कंपन्यांचा बुम होता. तेव्हा माझ्याकडे फक्त व्हिसा आणि हिंमत होती. मी सुरू केलेली पहिली कंपनी अमेरिकी कंपनीसोबत मर्ज केली. त्यानंतर दुसरीकडे नोकरी केली. 2007 मध्ये अमेरिकेत असताना quikr सारख्या एका वेबसाईटची माहिती मिळाली. तेव्हा तेथील लोक वृत्तपत्रापासून इंटरनेट आणि मोबाईलवर शिफ्ट होत होते. याचे ऑप्शन भारतात उपलब्ध नव्हते. त्यानंतर मी भारतात परतलो.

अशा स्वरुपाचा बिझनेस भारतात सुरू करता येईल असे मला वाटले. त्यानंतर 2008 मध्ये quikr ची स्थापना केली. सहा वर्षांनी quikr मध्ये विदेशी गुंतवणूक वाढू लागली. न्युयॉर्कमधील एका कंपनीने नुकतेच 60 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. आपल्या देशात एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मची गरज होती ज्यावर सर्वसाधारण लोक वस्तू विकत घेऊ शकतील आणि विकू शकतील. मी याची काळजी घेतली, की quikr संपूर्णपणे भारतीय माइंडसेटने तयार व्हावे. त्याचे काम चालावे.quikr वर पाच कॅटेगरी सर्वांत महत्त्वाच्या आहेत. रिअल इस्टेट, कार-मोटार-बाईक, जॉब लिस्टिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि सर्व्हिसेस.

माझ्या टीमचे वैशिष्ट म्हणजे त्यात बेस्ट इंजिनिअर्स आहेत. काम करण्याची पद्धत साधी, सोपी आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सोपे आणि लगेच सोल्युशन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला वाटते, की मिटिंगमध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त काळ लागू नये. यामुळे आम्ही स्टॅंडिंग मिटिंग घेतो. आम्ही मिटिंगमध्ये सायकलच्या सिट लावणार आहोत.

आता quikr या वेबसाईटवर राजस्थान येथील सीपों आणि ऑनलाईन कॅटल फेअर आयोजित करणार आहेत. राजस्थानचा विचार केला तर येथील बाजारपेठील सर्व आवश्यकतांचा विचार करण्यात आला आहे. लवकरच आम्ही आमच्या प्रॉडक्टमध्ये राजस्थानी जीपोंचा समावेश करणार आहे. तेथे जनावरांचा व्यवहार मोठा आहे. तशा स्वरुपाचे बाजार तेथे लावले जातात. ऑनलाईन कॅटल फेअर आयोजित करण्याचा आम्ही विचार करीत आहोत.

सौजन्य: दैनिक दिव्‍य मराठी
------------------------------------------

Post a Comment

0 Comments