Skip to main content

तुमच्याकडे एखादी हटके कल्पना असेल, नवं करायची उमेद असेल तर तुम्हाला ‘स्टार्ट अप’साठी सध्या एकदम पोषक वातावरण आहे खरं, पण सुरुवात कशी करायची, त्यासाठी नेमकं काय करायचं असे अनेक प्रश्न समोर असतात.
आपल्या काटेकोर नियोजनाबाबत आणि व्यवस्थापनासाठी जगप्रसिद्ध ठरलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांचं यश नेमकं लपलंय, ते ग्राहकांच्या गरजेचा नेमका विचार करण्यात. नोकरदार ग्राहकांच्या घरून जेवणाचे डबे घेत ‘लंच टाइम’पर्यंत पोहोचवणं, हा त्यामागचा विचार. या कल्पक विचाराला त्यांच्या अजोड व्यवस्थापनामुळे उद्योगाचा दर्जा मिळाला आणि ते जगभरातील व्यवस्थापनसंस्थांसाठी अभ्यासाचा विषय ठरले. यशस्वी उद्योगाचे गमक कल्पक विचारात असते आणि ‘स्टार्ट अप’साठी तोच कल्पक विचार यशाचा पाया ठरतो. आपली उद्योग संकल्पना जितकी ‘हटके’ असेल तितकी त्या उद्योगाच्या यशाची शक्यता अधिक.
डोकेबाज कल्पना
ज्याविषयी उद्योग सुरू करायचा आहे त्या सेवा किंवा उत्पादनाची ग्राहकांना किती गरज आहे याची ठाम माहिती असावी. आपला विचार, संकल्पना ही ग्राहकाभिमुख, त्याच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असावी. आपल्या सेवेद्वारे वा उत्पादनाद्वारे त्याची गरज भागावी, त्याची अडचण सुटावी, हा उद्देश असावा.
आपल्या अगोदरच कोणी त्या संकल्पनेवर विचार करून ती प्रत्यक्षात आणली असेल, तर आपल्या संकल्पनेचं नेमकं वैशिष्टय़ आणि ती किती वेगळी आहे, हे ठरवणं उद्योजकासाठी आवश्यक आहे.
योग्य व्यक्तींची साथ
कुठल्याही उत्तम संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी तितक्याच डोकेबाज आणि झपाटून काम करणाऱ्या ‘ध्येयवेडय़ांची’ साथ हवी. बऱ्याच यशस्वी उद्योगसमूहांची सुरुवात ही एक-दोन डोकेबाज आणि नवविचाराने झपाटलेल्या तरुणांनी केल्याचं पाहायला मिळेल. शाळा-महाविद्यालयातील घनिष्ठ मैत्रीही स्टार्ट अपचा उत्तम पाया ठरू शकते. याचं एक कारण म्हणजे सगळ्यांनाच सगळं काही नवीन असल्याने प्रत्येकजण झपाटून काम करतो. नवनव्या जबाबदाऱ्या वाटून काम करता येते, अडचणींना मिळून तोंड देता येते. उद्योगासाठी आवश्यक असलेली दृष्टी, योग्य दिशा, धोका पत्करण्याची तयारी, परस्परविश्वास, अदम्य उत्साह आणि प्रेरणा या बळावर दमदार वाटचाल करता येते. स्टार्ट अप उद्योजकाचे नेतृत्व सुरुवातीपासूनच सर्वाना सामावून घेणारे, योग्य दिशा दाखवणारे हवे.
बाजारपेठ
आपल्या सेवा/ उत्पादनास बाजारपेठेत किती वाव आहे, त्याचे विपणन (marketing) कसे होईल, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय क्लृप्त्या लढवाव्या लागतील, जाहिरात कशी करावी इ.चे भान असणे आवश्यक आहे. बाजारपेठेत नेमकी किती आणि कशी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत कसे टिकून राहावे, आपल्या सेवेचा/ उत्पादनाचा दबदबा कसा निर्माण करावा, याचा अभ्यास असावा.
भांडवल
उद्योग काय असेल, याचा विचार आणि त्याचा पक्का आराखडा तयार असला तरी भांडवलाच्या मुख्य प्रश्नाची धास्ती वाटतेच. मात्र आज भांडवल उभे करणे ही डोकेदुखीची बाब ठरली नाही. वयाने लहान असलेले बरेच स्टार्ट अप उद्योजक हे अनेकदा स्वत:ची बचत, अगोदरच्या नोकरीतील मिळकत किंवा कुटुंबाच्या पाठिंब्याने आपल्या उद्योगाची सुरुवात करतात. दुसरा एक पर्याय म्हणजे व्हेंचर कॅपिटल किंवा प्रायव्हेट इक्विटी फम्र्सकडून भांडवल उभे करणे. उद्योगाच्या पायाभरणीसाठी आणि भविष्यकालीन वृद्धीसाठी जे बीजभांडवल दिलं जातं, त्याला व्हेंचर कॅपिटल म्हणतात. शक्यतो सुरुवातीला दहा लाखांपर्यंत भांडवल मिळू शकतं. व्हेंचर कॅपिटल फम्र्सचा त्यांनी पैसे गुंतवलेल्या उद्योगाच्या लाभात ठरावीक वाटा असतो. माहिती तंत्रज्ञान, जैववैद्यकीय, पर्यायी उर्जासाधने यांसारख्या क्षेत्रांत व्हेंचर कॅपिटल फम्र्स मुख्यत्वे भांडवल पुरवतात. अर्थातच उद्योगाला मिळणारे भांडवल हे त्याच्या स्वरूपावर, त्याच्या आकारावरही अवलंबून असते. याव्यतिरिक्त बँकेकडून कर्जही घेता येते मात्र त्यासाठी कंपनीची नोंदणी झालेली असणे आवश्यक असते. स्टार्ट अप उद्योगात ‘हटके आयडिया’च चलनी नाणे असते. संकल्पनेच्या मुळाशी असलेल्या संभाव्य यशाचा ज्यांना अंदाज येतो म्हणजेच ज्यांना त्यातील यशाच्या शक्यता दिसतात-जाणवतात, तेव्हा भांडवल उभारणीचा मार्ग सोपा होतो. हा अंदाज ज्यांना येतो, जे रत्नपारखी स्टार्ट अप्सना बीजभांडवल पुरवतात त्यांना एंजल इन्व्हेस्टर (angel investor) म्हणतात.
कंपनी नोंदणी
सोल प्रोप्रायटरशिप आणि प्रायव्हेट लिमिटेड या दोन प्रकारांतर्गत भारतात कंपनीची नोंद करता येते. कुठलीही नोंदणी ही कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत होते. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाव्यतिरिक्त सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची परवानगीसुद्धा आवश्यक असते. अधिक माहितीसाठी
www.mca.gov.in आणि acmsme.gov.in ला भेट द्यावी.
कर्जपुरवठा
उद्योगासाठी भांडवल उभारताना किंवा व्यवसायवृद्धीसाठी कर्जाची गरज असते. अशा वेळी कंपनी नोंदणीकृत असणे आणि वेगवेगळ्या परवानग्या असणे आवश्यक असते. बँकेकडून कर्ज घेताना उद्योग आराखडा तयार असायला पाहिजे.
उद्योग आराखडा
उद्योजकाच्या डोक्यातील सगळ्या संकल्पनांचे मूर्त रूप म्हणजे त्याचा उद्योग आराखडा अर्थात बिझनेस प्लान. यात आपल्या उद्योगाचे नाव, सेवा/ उत्पादनाची कायदेशीर माहिती, बाजारपेठेचा अभ्यास, उत्पादनाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती, विपणननीती, कंपनीच्या व्यवस्थापनाची माहिती. उदा. संचालक मंडळ, कंपनीतील विविध विभाग, कामाची जबाबदारी, कर्मचाऱ्यांची माहिती इ.चा त्यात समावेश असावा.
स्टार्ट अप उद्योजक हे वयाने लहान पण कल्पना आणि उत्साहाच्या बळावर काहीतरी नवे करू पाहण्याचे धाडस करत असतात. अशा वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. एखाद्या नवजात बाळाच्या सुदृढ आरोग्याची जशी काळजी घेणे अत्यावश्यक असते त्याचप्रमाणे एखाद्या नव्या ‘स्टार्ट अप’ला बळ देण्यासाठी इनक्युबेशन किंवा एक्सलरेटर सेंटर्स मोलाची भूमिका बजावतात. अशाच काही इनक्युबेशन सेंटर्सची माहिती स्टार्ट अप उद्योजकांसाठी महत्त्वाची ठरेल.
इंडियन एंजल नेटवर्क इनक्युबेटर
भारत शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हा उद्यम कार्यक्रम राबवला आहे. कुठल्याही उत्तम संकल्पनेला आणि त्यानुसार सुरू केलेल्या ‘स्टार्ट अप’ला १८-२४ महिने तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाते. आज हे देशातील सर्वोत्तम इनक्युबेशन सेंटर मानले जाते.
टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर-
हे केंद्र दिल्ली आयआयटीमध्ये आहे. नावाप्रमाणेच केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘स्टार्ट अप्स’ना इथे मार्गदर्शन केले जाते. संकल्पनेचा पाया अतिशय भक्कम करून व्हेंचर कॅपिटलिस्टशी भेट घडवून आणण्यात आणि विद्यार्थ्यांना उद्योगी करण्यात हे केंद्र महत्त्वाचे आहे.
सोसायटी फॉर इनोव्हेशन अॅण्ड आंत्रप्रोनरशिप, आयआयटी मुंबई –
भारत शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने या केंद्रात केवळ आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील स्टार्ट अप्सना मार्गदर्शन केले जाते.
अनलिमिटेड इंडिया, मुंबई –
सर्व क्षेत्रांतील स्टार्ट अप्सना येथे मार्गदर्शन केले जाते. इतकेच नव्हे तर ८० हजार ते २० लाखांपर्यंत बीज भांडवल दिले जाते.
सीड बी इनोव्हेशन अॅण्ड इनक्युबेशन सेंटर, आयआयटी- कानपूर
लघुउद्योग क्षेत्रातील स्टार्ट अप्सना चालना देण्यासाठी हे केंद्र मदत करते. विज्ञान- तंत्रज्ञानातील स्टार्ट अप्सव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांतील स्टार्ट अप्सनासुद्धा ते मदत करते.
स्वत:च्या संकल्पनेवर दृढ विश्वास, योग्य व्यक्तींची साथ, आत्मविश्वास, अदम्य ऊर्जा या बळावर स्टार्ट अप्समध्ये यश मिळवता येईल. त्या जोडीला अर्थविषयक वृत्तपत्रांतून, संकेतस्थळांवर स्टार्ट अप्सविषयी बरीच माहिती मिळते, अनेकांच्या यशोगाथा वाचायला मिळतात. तेव्हा या क्षेत्रात ‘अभ्यासोनि प्रकटावे’.
-

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…