Skip to main content

Posts

Showing posts from November, 2016

साखरेचे खाणार त्याला नरेंद्र देणार

साखरेचे खाणार त्याला नरेंद्र देणार
-----------------------
सन २०००. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील शिंन्दोगी भाग. भारतातील इतर भागांप्रमाणे शेतीबहुल भाग. बहुतांश सगळेच शेतकरी. दिवसभर शेतात राबून देखील पैसा मात्र कमीच. रायप्पा मल्लाप्पा कलटी हा या भागातील शेतकऱ्यांपैकी एक शेतकरी. ४० एकर जमीन. या ४० एकरावर रायप्पा मका लावायचा. सगळा खर्च जाऊन हाताशी यायचे फक्त १ लाख रुपये. या उत्पन्नातून तो कसाबसा शेतीची कामं आणि घर चालवायचा. हाती शिल्लक काहीच उरायचे नाही. म्हणण्यासाठी त्याच्याकडे एक दुचाकी होती. हीच काय त्याची श्रीमंती दर्शविणारी मालमत्ता. याच दरम्यान या परिसरात एक साखर कारखाना आला. रायप्पाने मक्याचं पीक बंद करुन ऊसाचं पीक घ्यायला सुरुवात केली. तो ऊस थेट कारखान्याला विकू लागला. विकल्यानंतर १५ दिवसांच्या आत रायप्पाला पैसे मिळू लागले. आज रायप्पाला वर्षाला २० ते ३० लाख रुपये निव्वळ नफा होतो. आज त्याच्याकडे १०० एकर जमीन आहे. आता रायप्पा दुचाकीवरुन नव्हे तर टाटा इंडिकामधून प्रवास करतो. ही सारी किमया घडली श्री रेणुका साखर कारखान्यामुळे. श्री रेणुका साखर कारखान्याने कमी वेळेत एवढी प्रग…

या ग्रामीण भागातील शास्त्रज्ञाला भेटा, ज्याने सामान्य लोकांसाठी तयार केली २० गॅजेटस्

या ग्रामीण भागातील शास्त्रज्ञाला भेटा, ज्याने सामान्य लोकांसाठी तयार केली २० गॅजेटस्

३५ वर्षीय रुद्र नारायण मुखर्जी झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात सिंदूरपूर या छोटयाशा गावात राहतात. त्यांच्या परिसरात मात्र ते सर्वपरिचित आहेत ते ग्रामीण वैज्ञानिक म्हणूनच! आतापर्यत त्यांनी २२असे शोध लावले आहेत ज्यातून तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्यांच्या ग़ंभीर समस्या दूर केल्या आहेत.रुद्र त्यांच्या पालकांसोबत तसेच त्यांचे मोठे बंधू, त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत राहतात. सेवानिवृत्त अभियंत्याचा मुलगा म्हणून रुद्र यांनी नवनवीन गॅजेटस अर्थात उपकरण तयार करण्यात अगदी लहान वयापासूनच रुची दाखवली, आजही त्यात खंड पडला नाही. त्यांनी सांगितले की, “ मी किफायतशीर पध्दतीने २० ते २२ प्रकारच्या उपकरणांची निर्मिती केली आहे, ज्यांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. आजही मी सुमारे ४० प्रकारच्या नव्या कल्पनांवर काम करत असून त्या जगात यापूर्वी कुणी अंमलात आणल्या नाहीत”.रुद्रा यांनी असे हेल्मेट तयार केले आहे जे अपघात झाल्यास त्याची सूचना अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना देते, स्त्रियांसाठी धोक्याची सूचना देणारी घंटा तयार…

"हम ७-७ है" मल्टीनॅशनलला टक्कर देणार सात देशी उद्योजक

"हम ७-७ है"  मल्टीनॅशनलला टक्कर देणार सात देशी उद्योजक
-----------------------------------------नाशिक- बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अाव्हान पेलण्यासाठी स्वदेशी डेअरीशी संबंधित छाेट्या उद्याेगांनी एकत्र येत माेठे अाव्हान उभे करण्यासह ‘मेक इन इंडिया’ चा नवा अादर्श उभा केला अाहे. देशाच्या सात राज्यांतील सात अाइस्क्रीम कंपन्यांच्या उत्पादकांनी एकत्र येत ‘ फन इंडिया डेअरी’ उभी केली अाहे. दिल्लीत दहा वर्षांपूर्वी झालेल्या डेअरी प्रदर्शनात ह्या उत्पादकांची अाेळख झाली, मैत्री झाली अाणि एकत्रित व्यवसायाची कल्पना पुढे अाली, करारही झाला. अाता या कंपन्या ‘ फन इंडिया डेअरी’ (http://www.funindiadairy.com) ब्रँडखाली, सर्व कंपन्यांपुढे अाव्हान देताना िदसतील.अशा प्रकारे स्वदेशी कंपन्या एकत्र येत बहुराष्ट्रीय कंपन्यांपुढे अाव्हान उभे करण्याची ही संकल्पना उभी राहिली ती अाैटघटकेच्या भेटीत निर्माण झालेल्या चिरकालीन मैत्रीतून. नाशिक िजल्ह्यातील माळेगाव एमअायडीसीत नहार फ्राेजन फूड्स‌ ही कंपनी क्रिमिका अाइस्क्रीम या नावाने तशी सुपरिचित अाहे. कंपनीचे एम.डी. अाशिष नहार हे विविध अाइस्क्रीम उत्पादने, यंत्रस…

एक टांगेवाला अब्जाधीश कसा बनला ? ------------------------------------------

एक टांगेवाला अब्जाधीश कसा  बनला ?
------------------------------------------मसाल्यांचा राजा- एमडीएच मसाला
टीव्ही वर जाहिरात पाहताना आपल्याला एक पांढऱ्या मिशातील आजोबा दिसतात. अगदी यांच्याकडे पाहूनच चाचा चौधरी हे पात्र तयार केलं असावं असं वाटतं. जाहिरात विश्वातील सर्वांत वयोवृद्ध असे ते मॉडेल आहेत. आज त्यांचं वय ९३ वर्षे आहे. तरिही मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या ते सक्षम आहेत. ६० वर्षांपूर्वी अवघ्य़ा १५०० रुपयांत त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय आपण एमडीएच मसाले नावाने ओळखतो. भारतात असा एकही व्यक्ती नसावा ज्याला एमडीएच मसाले हे नाव वा एमडीएच मसालेच्या जाहिरातीतील ते आजोबा आठवत नसतील. या आजोबांचं नाव आहे महाशय धरमपाल गुलाटी. महाशियां दी हट्टी हा या एमडीएचचा फुलफॉर्म. १९१९ साली महाशय चुन्नीलाल गुलाटी यांनी पाकिस्तानातील सियालकोट मध्ये महाशियां दी हट्टी नावाचं मसाल्याचं दुकान सुरु केलं. २७ मार्च १९२३ साली महाशय गुलाटी आणि माता चनन देवी यांच्या पोटी धरमपालने जन्म घेतला. हे दाम्पत्य धार्मिक, परोपकारी स्वभावाचे होते. आर्य समाजाचे अनुयायी होते. धरमपाल शिक्षणात एवढा हुशार नव्हता. १९३३…

शेकडो महिलांना स्वयंपूर्ण करणारी उद्योजिका

शेकडो महिलांना स्वयंपूर्ण करणारी उद्योजिका
---------------------------------------स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न साकार करण्याच्या ऊर्मीतून रेवथी रॉय (http://www.revathiroy.com) यांनी उभी केलेली आशियातील पहिली संपूर्ण स्त्रियांची टॅक्सी सव्‍‌र्हिस ‘फॉर्शे’. अवघ्या लाख रुपयांच्या भांडवलावर एका गॅरेजपासून सुरू झालेला हा व्यवसाय पुढे विस्तारत गेला, इतका की यंदाच्या वर्षी ‘हे दीदी बाइक टॅक्सी कंपनी’, ‘झाफिरो लर्निग’ आणि ‘झाफिरो व्हेंचर्स’ या कंपन्याही त्यांनी स्थापन केल्या. उद्देश
दारिद्रय़ रेषेखालील गरजू, इच्छुक मुलींना दुचाकी चालविण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना पार्सल डिलिव्हरी सव्‍‌र्हिसमध्ये रोजगार मिळवून देणं. शासनाच्या स्टार्टअप्स, कौशल्यविकास संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या, ‘बी द चेंज’ हा मंत्र अंगिकारणाऱ्या रेवथी यांना नुकताच नीती आयोगाचा ‘वुमन ट्रान्स्फॉर्मर इंडिया’ सन्मान मिळाला आहे. त्यांच्याविषयी..
वर्ष २००७. एखाद्या घाईगर्दीच्या वेळी आपण टॅक्सी पकडण्यासाठी म्हणून टॅक्सीला हात करतो. टॅक्सी थांबते. टॅक्सीचालक स्त्री सहजतेने मीटर ‘डाऊन’ करीत आ…