बिनभांडवली ऑनलाईन जॉब्स

बिनभांडवली ऑनलाईन जॉब्स
---------------------------
ऑनलाईन जॉब म्हणजे दुसरेतिसरे काही नसून इंटरनेटच्या वापरामुळे घरबसल्या उपलब्ध होणारे जॉब्स, या जॉबमध्ये जगभरातल्या विविध ठिकाणची विविध कंपन्यांची कामे आपल्या संगणकावरून करता येतात. ही कामे आणि त्यांचे स्वरूप विविध प्रकारचे आहे.

यात अ‍ॅड पाहण्यापासून ते लिखाणापर्यंत आणि वस्तूंचे प्रोमोशन करण्यापासून ते इंटरनेटवर फोटो विकण्यापर्यंतचे असे विविध प्रकार आहेत. या ऑनलाईन जॉब्सचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या भांडवलाशिवाय हे जॉब आपणास करता येतात. आपणास गरज आहे पण आपल्याजवळच्या संगणकाची आणि इंटरनेटची. जे आपण वापरतच असतो.

1) यू ट्युबपासून मिळवा उत्पन्न : यू ट्युब ही गुगल कंपनीची जगातली सर्वात मोठी ऑनलाईन व्हिडीओ शेअरिंगची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जगातले विविध  प्रकारचे व्हिडीओ शेअर केले जातात. विविध व्यक्ती, कंपन्या किंवा संस्था हे व्हिडिओ शेअर करीत असतात. आपले व्हिडीओ जगभर पाहिले जावेत या हेतूने हे व्हिडीओ शेअर केले जातात. असे जर असेल तर यू ट्युबसारख्या साधनाद्वारे कसे काय उत्पन्न मिळू शकेल हा प्रश्‍न आपल्या मनात येतो. त्याचं असं आहे की आपण जेव्हा यू ट्युबवर व्हिडीओ टाकतो जगभरातून विविध लोक ते व्हिडीओ पाहत असतात.

ठराविक व्हिव्यु झाल्यानंतर यू ट्युबवर व्हिडीओ शेअर करणारा अकाऊंट होल्डर यू ट्युबच्या पार्टनर प्रोग्रॅमला जॉईन होऊन उत्पन्न प्राप्त करायला सुरुवात करू शकतो. यू ट्युब या वाढत जाणार्‍या व्हिव्युमुळे त्या व्हिडीओपूर्वी जाहिराती टाकून उत्पन्न मिळविते आणि त्याचा फायदा व्हिडीओ टाकणार्‍याला मिळतो आणि त्यापासून तो प्रत्येक वाढत जाणार्‍या व्हियुबरोबर उत्पन्न मिळवू लागतो.

2) फोटोग्राफ्स विकून मिळवा उत्पन्न :  यू ट्युबवर ज्याप्रमाणे व्हिडीओ आपलोड करून उत्पन्न मिळू शकते त्याप्रमाणे आपण काढलेले चांगल्या दर्जाचे फोटो विकूनही आपणाला उत्पन्न मिळवता येते. हे फोटो फोटोबकेट (Photobucket)), शटरस्टॉक (Shutterstock)), आयस्टॉक (istock),  अशाप्रकारच्या वेबसाईटला विकता येतात. या आणि अशा प्रकारच्या कितीतरी वेबसाईटस् विविध  प्रकारच्या फोटोंच्या शोधात असतात. निसर्ग, व्यक्तिचित्रण, प्राणी, विविध स्थाने, साहसी प्रसंग यासारख्या कित्येक प्रकारातील फोटो या वेबसाईटस् विकत घेतात. या फोटोचा वापर या वेबसाईटस् स्क्रीनसेव्हर बनविण्यासाठी, जाहिरातीसाठी करत असतात. त्यामुळे ज्यांना फोटोग्राफीची चांगली आवड आहे त्यांनी उत्पन्नाचा हा मार्ग चोखाळायला हरकत नाही.

3) डोमेन (Domain) खरेदी विक्रीतून मिळवा उत्पन्न : डोेमेन म्हणजे इंटरनेटवर अशी जागा जी वेबसाईट बनविण्यासाठी बुक करता येते. अशी डोमेनस इंटरनेटवरीलGodaddyसारख्या  कित्येक डोमेन रजिस्टाराकडून विकत घेता येणे किंवा विकणे शक्य असते. ऑनलाईन जॉबमधील चांगल्या पद्धतीचे उत्पन्न मिळवून देणारा हा एक महत्त्वपूर्ण असा मार्ग आहे. डोमेन विक्रीकर्त्यांकडून डोमेन विकत घेतल्यानंतर ते स्पेसिफीक डोमेन गरजू कंपन्यांना विकत घेता येते.

सध्याच्या जाहिरातीच्या युगात नावाला खूप महत्त्व आहे. अशावेळी ठराविक डोेमेनअ‍ॅड्रेस उपलब्ध करून घेणे हे खूप महत्त्वपूर्ण ठरते. हे डोमेनअ‍ॅड्रेस उपलब्ध नसेल तर ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते विकत घ्यावे लागते. अशावेळी खरेदी केलेल्या किंमतीच्या दहापट किंमतीने ते विकता येते. काहीवेळा तर या डोमेनचा भाव शेकडोपट नव्हे तर हजारोपटही मिळू शकतो.

अशाप्रकारे ऑनलाईन उत्पन्न साधनामधील हा एक चांगले उत्पन्न मिळवून देणारा मार्ग ठरू शकतो.

ऑनलाईनसर्व्हेतून मिळवा उत्पन्न :

कुठल्याही प्रकारच्या बिझनेसमध्ये सर्व्हे ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट असते.  प्रॉडक्ट निर्मिती, प्रॉडक्ट विक्रीपासून ते ग्राहकांचं प्रॉडक्टविषयी असणारं मत इथपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सर्व्हे उपयोगी पडतोच.

आज इंटरनेटच्या वाढत्या वापरांमुळं कंपन्यांचे सर्व्हे हे ऑनलाईन पद्धतीने केले जातात. या सर्व्हेमध्ये जगभरातील विविध कंपन्या प्रॉडक्टविषयी मत मागतात. यामध्ये प्रॉडक्ट किंवा सेवा दोहोंचाही समावेश होतो. या मताच्या आधारे कंपन्यांना आपली मार्केटिंग स्ट्रॅटॅजी ठरविणं शक्य होतं. या मताविषयी जाणून घेण्यासाठी कंपनी एक प्रकारची प्रश्‍नसूची बनविते आणि त्या प्रश्‍न सूचीची उत्तरे आपणास द्यावी लागतात. यासाठी त्या कंपनीच्या ऑनलाईन

सर्व्हेसाठी रजिस्ट्रेशन करून आपणाला ते करणे शक्य होते. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनी/विविध कंपन्या प्रत्येक वेळी ही प्रश्‍नसूची पाठवून देते आणि आपणाला ती प्रश्‍नसूची भरून द्यावयाची असते

इंटरनेटवर उपलब्ध असणार्‍या शेकडो ऑनलाईन जॉबमधील काही जॉबचा परिचय आपण करून घेतला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जॉब्स करण्यासाठी विशेष भांडवलाची गरज नसते. गरज असते ती फक्त थोडा वेळ काढण्याची आणि ठराविक कौशल्याची. एवढे जरी आपण करू शकू तर या इंटरनेटसारख्या माध्यमातून उत्पन्न मिळविणे शक्य होते. पण हे सर्व करत असताना एका गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे ज्या कंपनीसाठी आपण काम करणार आहोत त्या कंपनीची विश्‍वासार्हता तपासणे, इंटरनेटवर अशा शेकडो कंपन्या आहेत की ज्या नकली आहेत. या कंपन्या काम करून घेतात पण त्याचा परतावा देत नाहीत.

अ‍ॅमॅझॉन फ्लिपकार्ट, ईबे, यू ट्युब यासारख्या अधिकृत आणि विश्‍वासार्ह कंपन्या निवडूनच त्यांच्याबरोबर असे काम करणे योग्य ठरते. यासाठी सर्वप्रथम या कंपन्यांची विश्‍वासार्हता चेक करणे आद्यकर्तव्य ठरते.

Post a Comment

0 Comments