‘द टेबल’ ... कालपर्यंत चार्टर्ड अकौंटंट असलेल्या आज आहेत रेस्टॉरेंट मालकीण!

‘द टेबल’ ... कालपर्यंत चार्टर्ड अकौंटंट असलेल्या आज आहेत रेस्टॉरेंट मालकीण!

‘द टेबल’ च्या सहसंस्थापिका आहेत गौरी देवीदयाल. . . .मुंबईच्या कुलाब्यात आहे ‘द टेबल’. . .’द टेबल’ ने केली कम्युनिटी डायनिंगची सुरुवात. .

त्यांना जबाबदारीच्या उद्यमात पडायचे नव्हते, पण त्यांनी अशी एक गोष्ट केली की त्या आज यशस्वी उद्यमी आहेत. गौरी देवीदयाल यांनी लंडन युनिवर्सिटी मधून पदवी शिक्षण पूर्ण केले आणि चार्टर्ड अकौंटंट आहेत, परंतू आज त्या मुंबईच्या कुलाबा येथे चालविल्या जाणा-या ‘द टेबल’ या प्रसिध्द रेस्टॉरेंटच्या मालक झाल्या आहेत. 

गौरी सांगतात की, ज्यावेळी सन २००८मध्ये त्यांनी या कामाबाबत विचार केला त्यावेळी या भागात नव्या रेस्टॉरेंटची अत्यंत गरज होती. खरेतर त्यावेळी त्या अनेक प्रकारच्या कायदेशीर आणि आर्थिक बाबी सांभाळत होत्या, ज्यांचा त्यांनी अभ्यास केला होता. परंतु एकदा या क्षेत्रात घुसल्यावर मागे वळून पहायचा प्रश्नच नव्हता. खरेतर त्यावेळी गौरी यांची कारकिर्द ऐन भरात होती, कारण त्या लंडनमध्ये प्राईस वॉटर हाऊस कुपर्समध्ये कर सल्लागार म्हणून काम केल्यानंतर केपीएमजी साठी काम करत होत्या. त्या लंडनमध्ये सुमारे आठ वर्षांपर्यंत राहिल्या. त्यावेळी त्यांनी आणि जे युसूफ जे आता त्यांचे पती आहेत, त्यांनी मुंबईला परत येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गौरी लंडनहून तर जे युसूफ सँन फ्रान्सिस्को येथून सन २००८च्या सुरुवातीला भारतात परत आले. येथे आल्यावर दोघांनी रेस्टॉरेंटच्या व्यवसायात नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. गौरी मानतात की त्यावेळी हा निर्णय त्यांच्यासाठी कठीण होता. कारण त्यांचा आदर-आतिथ्य क्षेत्राशी काहीच संबंध नव्हता. तरीही त्यांना 'जे' यांच्या मदतीने उद्यमिता क्षेत्रात पाऊल ठेवायचे होते.

शेवटी दोघांचे विचार आणि प्रयत्न यांतून  ‘द टेबल’ ची सुरुवात झाली. सुमारे २३वर्षे अमेरिकेत घालविणारे ‘जे’ यांनी १४वर्ष सँन फ्रान्सिस्को येथे व्यतित केली होती. त्यांची इच्छा होती की ते अमेरिकेतील फूड कल्चर भारतात आणतील. त्यांना विविध रुचीपूर्ण पदार्थ आणि वेगवगेळ्या रेस्तरॉंमध्ये मिळणा-या पदार्थांचा खास अनुभव होता. गौरी रेस्तरॉं सुरू करण्यापूर्वीच्या  क्षणांची आठवण सांगताना म्हणतात की, त्यांचे लग्न डिसेंबर २०१०मध्ये झाले आणि त्यांनी लग्नाच्या तीन आठवडे आधीच ‘द टेबल’ची सुरुवात केली होती. गौरी यांच्या मते ‘जे’ यांना उद्यमी व्हायचे होते त्यांना या कामाबाबतचा दृष्टीकोन आणि विश्वास होता. त्याशिवाय आर्थिक बाबतीत ‘जे’ धोका घेण्यास सक्षम होते. तर त्या हे कार्य यशस्वीपणे करण्यास सक्षम होत्या.

‘द टेबल’ ची सुरुवात करण्यामागे जो विचार होता त्यानुसार शहरात असे रेस्तरॉं असावे जेथे न केवळ छान जेवण मिळावे तेथील वातावरणात खूप मोकळेपणा असावा. गौरी यांच्या मते त्यांना हे अभिप्रेत नव्हते की, द टेबलचा उपयोग लोकांना केवळ काही खास वेळेलाच करतील, किंबहुना त्यांना असे वाटत होते की लोक येथे केव्हांही येतील आणि येथे येऊन आरामाचा आस्वाद घेतील. त्यांनी इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या पध्दतीने लोकांसमोर जेवण वाढण्यास सुरुवात केली. त्यांनी लोकांना यासाठी प्रोत्साहित केले की जसे ते कुटूंबासोबत बसून जेवतात तसेच त्यांनी येथे बसून जेवणाचा स्वाद घ्यावा.

याशिवाय ते काही निवडक रेस्तरॉंपैकी पहिले असे रेस्तरॉं होते की, ज्यानी कम्युनिटी डायनिंगची सुरुवात केली. त्यामागे हा विचार होता की, अनोळखी लोकही एकमेकांसमोर एका मोठ्या टेबलावर बसतील आणि सहभोजन करताना ओळख करून घेतील. सुरुवातीला येथे येणा-या ग्राहकांमध्ये याबाबत थोडा संकोच होता मात्र लवकरच लोकांना ही बाब पसंत पडली.

गौरी यांनी सुमारे वर्षभरापूर्वी अलिबाग येथे एक एकर जमीन घेतली होती जेणे करून त्यांना विकएंडला तेथे जाता यावे. एक दिवस त्यांनी पाहिले की तेथे खूप मोठ्या प्रमाणात पालक उगवलेली त्यांनी पाहिली, पण त्याचे काय करायचे हे त्यांना समजले नाही. त्यानंतर त्यांनी ही पालक आपल्या मित्र आणि परिवारात वाटून टाकली. तरीही बरीच भाजी  उरली, त्यावेळी त्यांनी विचार केला की आजुबाजूच्या रेस्तरॉंना ही भाजी पाठवली तर?त्या नंतर त्यांनी तेथे अनेक प्रकराच्या भाज्या लावण्यास सुरुवात केली. ‘द टेबलच्या अनेक भाज्या याच फार्मवरून येतात. सध्या गौरी यांच्या या शेतावरून पालक, चाकवत, मुळा, फुलकोबी, टोमॅटो अशा अनेक प्रकारच्या भाज्या येतात. द टेबलसाठी या फार्मचा विचार अगदी सॅनफ्रान्सिको प्रमाणे करण्यात आला आहे. तेथेही गरज असलेल्या भाज्या फार्मवरून रेस्टॉरेंट मालक स्वत:च लागवड करून घेतात.

आज गौरी यांना त्यांच्या निर्णयाचा अभिमान आहे त्या खूपच समाधानी आहेत. त्या मानतात की स्वत:चा व्यवसाय असल्याने कसेही जगण्याचे स्वातंत्र्य आहे. गौरी मानतात की उद्यमिता केल्याने काही गोष्टी अशा असतात की त्या मान्य कराव्या लागतात परंतू काही अशाही असतात ज्या कधीच मान्य करता येत नाहीत. गौरी यांच्यामते ज्यावेळी त्या चार्टर्ड अकौंटंटचे काम करत  होत्या त्यावेळी त्या केवळ करभरणा याच क्षेत्रात पारंगत होत्या. ते एक छान क्षेत्र होते ज्यात त्यांनी प्राविण्य मिळवले होते. गौरी सांगतात की त्यानंतर सारे काही खूपच बदलले. पूर्वी त्या केवळ एक कर्मचारी होत्या आता त्या खूप मोठा मार्ग पार करत मालकाच्या भूमिकेत असतात. त्या आज त्यांच्याकडे काम करणा-या कर्माचा-यांच्या व्यवस्थापनाचे काम करतात.

गौरी यांना अजूनही लक्षात आहे की, ज्यावेळी त्यांनी आपली छान कारकिर्द आणि लंडन सोडून देशात परत येण्याचा निर्णय घेतला होता, त्यांच्या कुटुंबियांचा विरोध सहन केला होता. पण आज तेच लोक त्यांच्या या यशावर अभिमान व्यक्त करतात. गौरी यांचे वडील उद्यमी होते, आणि आई कलाकार. त्यांची एक बहिण ग्राफिक डिझायनर आहे तर दुसरी एक लेखिका आहे. या सा-या जणांनी गौरी यांना बराच काळ हे समजावले की, त्यांनी हा निर्णय बदलावा पण गौरी त्यांच्या निश्चयावर कायम राहिल्या. आज गौरी दुहेरी जबाबदारी पाहतात. एकीकडे त्यांच्या अडीच वर्षीय मुलीचे संगोपन आणि उद्यमाची जबाबदारी! असे असले तरी या दोन्हीचा समन्वय कसा ठेवायचा तेही त्यांना माहिती आहे. विशेष म्हणजे त्यांचे पतीदेखील या उद्यमात आहेत आणि दोघे मिळून ही काळजी घेतात की दोघांपैकी एकजण आपल्या चिमुकली जवळ नक्कीच राहतील

Post a Comment

0 Comments