"हम ७-७ है" मल्टीनॅशनलला टक्कर देणार सात देशी उद्योजक

"हम ७-७ है"  मल्टीनॅशनलला टक्कर देणार सात देशी उद्योजक
-----------------------------------------

नाशिक- बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अाव्हान पेलण्यासाठी स्वदेशी डेअरीशी संबंधित छाेट्या उद्याेगांनी एकत्र येत माेठे अाव्हान उभे करण्यासह ‘मेक इन इंडिया’ चा नवा अादर्श उभा केला अाहे. देशाच्या सात राज्यांतील सात अाइस्क्रीम कंपन्यांच्या उत्पादकांनी एकत्र येत ‘ फन इंडिया डेअरी’ उभी केली अाहे. दिल्लीत दहा वर्षांपूर्वी झालेल्या डेअरी प्रदर्शनात ह्या उत्पादकांची अाेळख झाली, मैत्री झाली अाणि एकत्रित व्यवसायाची कल्पना पुढे अाली, करारही झाला. अाता या कंपन्या ‘ फन इंडिया डेअरी’ (http://www.funindiadairy.com) ब्रँडखाली, सर्व कंपन्यांपुढे अाव्हान देताना िदसतील.

अशा प्रकारे स्वदेशी कंपन्या एकत्र येत बहुराष्ट्रीय कंपन्यांपुढे अाव्हान उभे करण्याची ही संकल्पना उभी राहिली ती अाैटघटकेच्या भेटीत निर्माण झालेल्या चिरकालीन मैत्रीतून. नाशिक िजल्ह्यातील माळेगाव एमअायडीसीत नहार फ्राेजन फूड्स‌ ही कंपनी क्रिमिका अाइस्क्रीम या नावाने तशी सुपरिचित अाहे. कंपनीचे एम.डी. अाशिष नहार हे विविध अाइस्क्रीम उत्पादने, यंत्रसामग्रीच्या प्रदर्शनास भेट देत असतात. दहा वर्षांपूर्वी िदल्लीतील प्रदर्शनात दहा उद्याेगांचे मालक भेटले. मैत्री झाली. व्यवसाय विकासासाठी बैठका हाेत राहिल्या. त्यातूनच एकत्रित माल खरेदीची संकल्पना पुढे अाली. अाइस्क्रीमचे रॅपर, कप, पॅकिंग मटेरियल यांची एकत्रित अाॅर्डर द्यायचा निर्णय झाला. त्याचे चांगले परिणाम िदसू लागले. सरासरी पंधरा टक्के फायदा यातून िमळाला. यातूनच उभी राहिली एकत्रित ब्रँडिंग, विक्रीची संकल्पना. यावर खूप चर्चा झाली अाणि अाकाराला अाली ‘फन इंडिया डेअरी’. या सात उत्पादक मित्रांत सामंजस्य करारही झाला अाहे.अाता एकाच ब्रँडखाली व्यवसाय करत अाहेत.

एकीचा फायदा
या सातपैकी एकेका उद्याेगाची प्रतििदवशी पाच हजार लिटर अाइस्क्रीम तयार करण्याची क्षमता हाेती, एकत्र अाल्याने ती तीस हजार लिटर झाली. देशपातळीवर नाव पाेहाेचले असून महागडे उत्पादन सल्लागार ठेवणे शक्य झाल्याने गुणवत्ता वाढलीे. मार्केटिंग माेठ्या प्रमाणावर शक्य झाली. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरातमध्ये उत्पादने बाजारात अाली.

डेअरी उत्पादनेही लवकरच
दूध, दही, लस्सी, ताक, मसाला ताक यांसारखी निव्वळ डेअरी उत्पादने लवकरच बाजारात अाणण्याचे उद्दिष्ट अाहे. भारतीय दैनंदिन जीवनात दूध व त्यासंबंधित पदार्थ यांचे माेठे महत्त्व व त्याच अनुषंगाने वापरही जास्त अाहे. त्यामुळे ही उत्पादने अाणली जाणार अाहेत.

या कंपन्यांचा सहभाग : नाशिकची नहार फ्राेजन फूड्स अँड अाइस्क्रीम, जबलपूरची मल्टी अाइस्क्रीम इंडस्ट्रीज, अमाेदची (गुजरात)काम्बाेलीवाला डेअरी, चंदिगडची कमल मिल्क फूड‌्स, कटकची हेल्थ फूड प्राॅडक्टस‌्, चित्तुरची हरिणी डेअरी फुड‌्स‌ ,किसनगडची (राजस्थान)अरिहंत फ्राेजन फुड‌‌्स ह्या त्या कंपन्या अाहेत, ज्यांनी अाता अापली उत्पादने ‘ फन इंडिया डेअरी’ नावाने बाजारात अाणली अाहेत.

https://www.facebook.com/funindiadairy

- संजय भड
सौजन्य: दैनिक दिव्‍य मराठी
------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Post a Comment

0 Comments