Skip to main content

Posts

Showing posts from December, 2016

उद्योग आधार - गरज, महत्त्व व प्राप्त करण्याची प्रक्रिया.

व्यवसायाच्या वाटेवर चालताना
गेले लिहायचे राहून – आता वाचकांच्या आग्रहास्तव
-------------------------------------------------------
लेख ३१ – उद्योग आधार - गरज, महत्त्व व प्राप्त करण्याची प्रक्रिया.
-------------------------------------------------------
भांडवली उभारणीचे विविध पर्याय आपण पाहिले. भांडवलनिर्मिती करताना तारण नसल्यास काय करावे ते पाहिले. त्यात नवउद्योजकांसाठी पर्वणी ठरलेला भांडवलनिर्मितीचा मार्ग म्हणजे मुद्रा कर्ज. हे मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी आपला उद्योग नोंद असणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या उद्योगाचा आधार नंबर म्हणजे उद्योग आधार कार्ड आपल्याकडे असणे गरजेचे आहे. उद्योग आधार नोंदणी केलेल्या उद्योजकाला मुद्रा कर्ज मिळणे इतर उद्योजकापेक्षा सोपे ठरते. कारण उद्योग आधार ही आधार कार्ड प्रमाणेच उद्योजकाची वैशिष्टपूर्ण ओळख असते. या उद्योग आधार कार्डावर एक व्यवसायिक एकाहून अधिक उद्योगाची नोंदणी करु शकतो.बहुतांश लघुउद्योजक (एकल व्यक्ती कंपनी, एलएलपी, प्रा. लि. व लि. कंपन्या वगळून इतर सर्व) हे आपले व्यवसाय स्थानिक पातळीवर आपला उद्योग रजिस्टर करतात. त्यामुळे केंद्र सरकार कडे या उद्योगा…

_*मुलांना बचत करायला शिकवा...*_

_*मुलांना बचत करायला शिकवा...*_लहान मुलांना वाढत्या वयासोबत चांगल्या सवयीही लावणे आवश्यक असते. अनेक चांगल्या सवयीबरोबरच त्यांना पैशांची बचत करण्यासही शिकवले पाहिजे. जेणेकरुन त्यांचे भवितव्य चांगले होईल. पण ही सवय लावावी तरी कशी? त्यासाठी जाणून घ्या पुढील काही ट्रिक्स...👉 तुम्ही सांगितलेली कामे मुलांनी जबाबदारीने केल्यावर किंवा चांगला अभ्यास केल्यावर त्यांना काही रक्कम बक्षिस म्हणून द्या. तसेच दिलेली रक्कम साठवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. यामुळे त्यांना अभ्यास करण्याबरोबरच पैसे साठवण्याची सवयसुद्धा लागते.👉 मुलांनी साठवलेल्या पैशांतून तुम्ही त्यांनाच काही तरी वस्तू घेण्यास सांगू शकता. यामुळे त्यांना बचतीचे महत्त्व समजेल. 👉 कधी-कधी मुले काही गोष्टींसाठी खूपच हट्ट करतात. यावेळी त्यांना ठामपणे 'नाही' म्हणून सांगितले पाहिजे. पैशाचे महत्त्व आणि बचत किती महत्त्वाची असते हे त्यांना समजावा. 👉 लहानपणापासूनच जर मुलांच्या हट्टावर नियंत्रण ठेवले नाही तर भविष्यातसुद्धा त्यांचा दृष्टिकोन किंवा स्वभाव हट्टी होण्याची शक्यता असते. त्यांना एकमेंकाना देण्याची किंवा शेअरची सवय लावा. यामुळे…

शेकडो टन शेतीमाल निर्यात करणारा ग्रामीण मराठी तरुण

शेकडो टन शेतीमाल निर्यात करणारा ग्रामीण मराठी तरुण
---------------------------------------विजय कावंदे यांच्या मालकीची वडिलोपार्जित केवळ १० एकर जमीन. पाच भावंडे. कोरडवाहू जमिनीत बेताचे उत्पन्न  मिळते त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करण्याला पर्याय नाही हे लक्षात घेऊन विजयने बारावी डीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नोकरी मिळविली. तरी त्याची शेतीची असलेली नाळ कायम होती. नोकरी करत करत आपल्या शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला. शेतीतील उत्पन्न वाढवत व विविध प्रयोग करत विदेशात भाजीपाला निर्यात केला अन् आता विदेशातील ४० एकर जमीन लीजवर घेऊन त्या ठिकाणी भाजीपाला उत्पादनाची तयारी सुरू केली.
********
लातूर तालुक्यातील वांजरखेडा या गावच्या केवळ १० एकर जमीन असलेल्या एखाद्या शेतकऱ्याने प्रारंभी आपल्या शेतीतील उत्पन्न वाढवत व विविध प्रयोग करत विदेशात भाजीपाला निर्यात केला अन् आता विदेशातील ४० एकर जमीन लीजवर घेऊन त्या ठिकाणी भाजीपाला उत्पादनाची तयारी सुरू केली असे जर कोणाला सांगितले तर यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र वांजरखेडा गावातील विजय कावंदे या ३४ वर…

" भाग्यवंत मी शिक्षक "

🔲🌹 " भाग्यवंत मी शिक्षक " 🌹🔲           देवा फार छान केलंस ....................
मला शिक्षक बनवलंस ..........म्हणून !डाँक्टर बनवले असते तर ................
नाराज चेहरे पाहावे लागले असते .इंजिनिअर बनवले असते तर .............
दिवसभर निर्जीव यंत्र पाहावे लागले असते .वकील बनवले असते तर ...................
इच्छा नसतांना बोलावे लागले असते .बँक अधिकारी बनवले असते तर .........
दुसर्यांचे धन सांभाळत बसावे लागले असते .नेता बनवले असते तर ...... नाईलाजाने
सगळ्यांची मने धरावी लागली असती . 🌹👏 विद्यार्थी म्हणजे देव कसा असतो
           याचे साक्षात रूप ...निर्मळ हास्य
           व   evergreen Garden !देवा तू माझी किती काळजी घेतलीस
हे मला आत्ता कळलं             रोज विद्यार्थी रूपाने तुझे अनंत
            रूप दाखवतोस दिवसभर माझ्याशी हसतोस ,बोलतोस
खरंच मी किती भाग्यवान.... ................
कि दररोज तुझी भेट होते .             साधुसंत किती जप-तप करतात?
             तरी तू त्यांना रोज भेटत नाहीस .या जन्मी तुला रोज भेटण्याची...................                      सेवा दिल्या बद्दल किती …

ग्रामीण गोदाम योजना

ग्रामीण गोदाम योजनाग्रामीणगोदाम योजनागोदाम योजनेचे फायदे
मालाची शास्त्रोक्त पध्दतीने साठवणुक केल्याने मालाचा दर्जा कायम राहतो.
मालाचे ग्रेडींग केल्यामुळे मालाला किंमत जास्त मिळते.
गोदामामध्ये मालावर औषधांची फवारणी, किटकनाशके यांचा आवश्यकतेनुसार वापर होत असल्याने माल किड, उंदीर, किटके यांचेपासुन संरक्षित राहतो.
गोदामामध्ये माल ठेवल्याने बाजारातील चढत्या भावाचा शेतक-यास फायदा मिळतो व त्याचे उत्पन्नात भर पडते.
गोदामात ठेवलेल्या मालावर धान्य कर्ज तारण योजनेमार्फत प्रचलित भावाच्या 75 पर्यत कर्ज मिळते. त्यामुळे शेतक-याची पैशाची गरज भागते.
व्यावसायिकपणे गोदाम योजना राबविल्यास शेतकरी, सहकारी संस्था यांना उत्तम व्यवसाय करता येतो. त्यामुळे उत्पन्नात भर पडते. बेकारी दूर होण्यास मदत होते.
वरील प्रमाणे ग्रामीण गोदामांची आवश्यकता व गोदामाचे मिळणारे फायदे विचारात घेऊन केंद्र शासनाने सन 2001-02 पासून ग्रामीण गोदाम योजना संपुर्ण देशासाठी लागु केली आहे. सदर योजनेमध्ये केंद्र शासनाने दि.26/6/2008 पासून काही सुधारणा केलेल्या असून 11 व्या योजनेमध्ये या योजनेचा समावश करुन सदर योजनेला 31 मार्च 2012 पर्यंत म…