*📚पुस्तक रचना बदलणार ?*

*📚पुस्तक रचना बदलणार ?*

By pudhari | www.managaveacademy.blogdspot.in

मुंबई : प्रतिनिधी

शैक्षणिक वर्षभरात लागणार्‍या सर्व विषयांची वर्षभराची पुस्तके तयार करण्यापेक्षा सर्व विषयांचा केवळ एका महिन्याचा अभ्यासक्रम असलेले एक वेगळे पुस्तक तयार करण्यात यावे, असा उपाय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नेमलेल्या समितीने दप्तराच्या ओझ्यावर शोधला आहे. 

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आतापर्यंत अनेक उपाय सुचविले आहेत. त्यात बालभारतीचे पुस्तक बदलण्याचीही शिफारस होती. सुरूवातीला या समितीने प्रत्येक विषयाचे वर्षभराचे पुस्तक तयार न करता सर्व विषयांचे एकच परंतु तीन महिन्यांचा अभ्यासक्रम असलेले पुस्तक तयार करावे, असा उपाय सुचविला होता. मात्र दोन वर्षे उलटूनही या प्रस्तावाला शालेय शिक्षण विभागाची मंजुरी मिळालेली नाही असेही समिती सदस्यांचे म्हणणे आहे.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांचे प्रस्ताव शालेय शिक्षण विभागात पडून आहेत.शिक्षण विभागाने या प्रस्तावांची दखल घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी केली तरच दप्तराचे ओझे कमी करण्यास मदत होणार आहे अन्यथा दप्तराचे ओझे तसेच राहणार आहे असेही समितीचे म्हणणे आहे.

📚📖📒Ⓜ🅰🅿📙📖📚

Post a Comment

0 Comments