डिजिटल व्यवहारांसाठी लवकरच सरकारी मोबाईल अॅप


डिजिटल व्यवहारांसाठी लवकरच सरकारी मोबाईल अॅप

देशातील तब्बल ४० कोटी बँक खाती ही आधार कार्डाशी जोडली गेलेली आहेत.

बायोमेट्रिक यंत्राद्वारे स्मार्टफोनचे रूपांतर पॉइंट ऑफ सेल (पीओएस) यंत्रात केले जाईल. ई-व्यवहारांसाठी आम्ही सामाईक व्यासपीठ (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) असलेले मोबाईल अॅप विकसित करत आहोत. आगामी दोन ते चार दिवसांत त्याचे काम पूर्ण होईल.

सरकारकडून डिजिटल व्यवहारांसाठी लवकरच आधार कार्डाशी संलग्न असलेले मोबाईल अॅप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. या डिजिटल व्यवहारांच्या अंमलबजावणीसाठी देशभरातील एक कोटी जणांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही लवकरच अर्थ मंत्रालयाच्या मदतीने आधार कार्डावर आधारित असलेली व्यवहार प्रणाली (एईपीएस) सुरू करणार आहोत. देशातील तब्बल ४० कोटी बँक खाती ही आधार कार्डाशी जोडली गेलेली आहेत. आगामी काळात उर्वरित बँक खातीही आधार कार्डाशी जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली. दरम्यान, सरकारकडून ई-पेमेंटसाठी सुरू करण्यात येणाऱ्या अॅपविषयी माहिती देताना रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, बायोमेट्रिक यंत्राद्वारे स्मार्टफोनचे रूपांतर पॉइंट ऑफ सेल (पीओएस) यंत्रात केले जाईल. ई-व्यवहारांसाठी आम्ही सामाईक व्यासपीठ (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) असलेले मोबाईल अॅप विकसित करत आहोत. आगामी दोन ते चार दिवसांत त्याचे काम पूर्ण होईल. या अॅपमध्ये ग्राहकांना आधार नंबर टाकून आणि बायोमॅट्रिक यंत्राद्वारे अंगठ्याचा ठसा स्कॅन करून एखाद्याला पैसे पाठवता येतील, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शैक्षणिक व इतर आवश्यक माहिती वाचण्यासाठी
www.managaveacademy.blogspot.in
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Maharashtra Tech Teachers
या टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

https://telegram.me/joinchat/D_DVJUB564B4aS2ESSNNMQ

टेलिग्राम  चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा
telegram.me/MangaveAcademy

Post a Comment

0 Comments