Skip to main content

आपल्या व्यवसायाचा ब्रँड बनवण्याचे ५ फायदे - अतुल राजोळी

आपल्या व्यवसायाचा ब्रँड बनवण्याचे ५ फायदे - अतुल राजोळी

मित्रांनो, प्रचंड स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपल्या व्यवसायाचा 'ब्रँड' निर्माण होणं गरजेचं आहे. ब्रँड म्हणजे प्रतिमा! आपल्या व्यवसायाबद्दल, किंवा प्रॉडक्ट व सर्विसबद्दल लोकांच्या मनात काय प्रतिमा आहे? जर ही प्रतिमा सकारात्मक असेल, ग्राहकांच्या गरजांना लक्षात घेऊन जाणिवपूर्वकपणे तयार केली असेल तर आपल्या प्रॉडक्टच्या व सर्विसेसच्या प्रति ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. या विश्वासामुळे ग्राहक आपोआपच आपल्या प्रॉडक्ट व सर्विसच्या प्रति एकनिष्ठ बनतो.
आपल्या व्यवसायाचा ब्रँड असण्याचे ५ फायदे खालिल प्रमाणे आहेत:

१) विक्री करणे सोपे:
जर आपल्या प्रॉडक्टबद्दल बाजारपेठेत आधीपासून उच्च विश्वसनियता प्रस्थापित झाली असेल तर आपलं प्रॉडक्ट विकणं कठीण नसतं. कारण ग्राहकाला माहीत असतं की त्याला काय मिळणार आहे. त्याला पटवण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागत नाहीत.

२) जास्त प्रमाणात विक्री:
'ब्रँडेड' प्रॉडक्ट व सर्विसेस इतर प्रॉडक्ट सर्विसेसपेक्षा जास्त प्रमाणात विकले जातात. ब्रँडमुळे कंपनीच्या उत्पन्नावर सुध्दा सकारात्मक परिणाम होतो.

३) वेगात विक्री:
बऱ्याच प्रॉडक्टच्या विक्री प्रक्रीयेला फार वेळ लागतो. ग्राहक खरेदी बाबतचा निर्णय घेण्यासाठी वेळ लावतो. इतर प्रॉडक्टचा सुध्दा विचार करतो त्यामुळे विक्री प्रक्रियेत फार विलंब होतो. ब्रँडच्या विश्वसनियतेमुळे ही अडचण दुर होते.

४) आपल्या प्रॉडक्टची योग्य किंमत मिळते:
स्पर्धेमध्ये टिकून रहाण्यासाठी उद्योजक आपल्या प्रॉडक्टची किंमत कमी करतात. परंतु 'ब्रँड' ला नेहमी हवी ती किंमत प्राप्त होते. ब्रँडेड प्रॉडक्ट महाग जरी असले तरी ग्राहक जास्त किंमत देण्यास कोणतीही शंका घेतल्याशिवाय तयार होतो.

५) व्यवसायाचे मुल्यांकन वाढते:
'ब्रँड' हा कंपनीचा Intangible Asset असतो. कंपनीच्या Balance Sheet वर जरी त्याचं मुल्य दिसत नसलं तरी बाजारातील कंपनीच्या मुल्यांकनामधे 'ब्रँड' मुळे कितीतरी पट जास्त किंमत असते.

आपल्या व्यवसायाचा 'ब्रँड' बनवण्यासाठी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांची एक दिवसीय कार्यशाळा... 'A-Tool For BRANDING'.
दिनांक: २२ डिसेंबर २०१६
वेळ: सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६
स्थळ: बॉर्न टू विन ट्रेनिंग सेंटर, ४२-४३, काकड इंडस्ट्री, एस. कीर रोड, माटुंगा रोड (प.)
अधिक माहीतीसाठी संपर्क साधा... 7666426654
ऑनालाईन नाव नोंदणीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा: http://goo.gl/ftu61d

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…