" भाग्यवंत मी शिक्षक "

🔲🌹 " भाग्यवंत मी शिक्षक " 🌹🔲          

देवा फार छान केलंस ....................
मला शिक्षक बनवलंस ..........म्हणून !

डाँक्टर बनवले असते तर ................
नाराज चेहरे पाहावे लागले असते .

इंजिनिअर बनवले असते तर .............
दिवसभर निर्जीव यंत्र पाहावे लागले असते .

वकील बनवले असते तर ...................
इच्छा नसतांना बोलावे लागले असते .

बँक अधिकारी बनवले असते तर .........
दुसर्यांचे धन सांभाळत बसावे लागले असते .

नेता बनवले असते तर ...... नाईलाजाने
सगळ्यांची मने धरावी लागली असती .

🌹👏 विद्यार्थी म्हणजे देव कसा असतो
           याचे साक्षात रूप ...निर्मळ हास्य
           व   evergreen Garden !

देवा तू माझी किती काळजी घेतलीस
हे मला आत्ता कळलं

            रोज विद्यार्थी रूपाने तुझे अनंत
            रूप दाखवतोस

दिवसभर माझ्याशी हसतोस ,बोलतोस
खरंच मी किती भाग्यवान.... ................
कि दररोज तुझी भेट होते .

             साधुसंत किती जप-तप करतात?
             तरी तू त्यांना रोज भेटत नाहीस .

या जन्मी तुला रोज भेटण्याची...................                      सेवा दिल्या बद्दल किती आभार मानू .

             म्हणून तर मोठमोठे नेते देखिल
             लहान मुलांना भेटून आनंदी होतात.

देवा..... तुझे आभार मानायला ................
माझ्या जवळ शब्दच नाहीत .

🌹👏👍 --- देवा फार छान केलंस .........
                     मला शिक्षक बनवलंस !

🌷 आपल्या शिक्षक मित्रांना जरूर पाठवा ,
      शिक्षक बदलंला तर देश नक्कीच बदलेल .
👏�👏�👌�👌

Post a Comment

0 Comments