उद्योग आधार - गरज, महत्त्व व प्राप्त करण्याची प्रक्रिया. - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, December 31, 2016

उद्योग आधार - गरज, महत्त्व व प्राप्त करण्याची प्रक्रिया.

व्यवसायाच्या वाटेवर चालताना
गेले लिहायचे राहून – आता वाचकांच्या आग्रहास्तव
-------------------------------------------------------
लेख ३१ – उद्योग आधार - गरज, महत्त्व व प्राप्त करण्याची प्रक्रिया.
-------------------------------------------------------
भांडवली उभारणीचे विविध पर्याय आपण पाहिले. भांडवलनिर्मिती करताना तारण नसल्यास काय करावे ते पाहिले. त्यात नवउद्योजकांसाठी पर्वणी ठरलेला भांडवलनिर्मितीचा मार्ग म्हणजे मुद्रा कर्ज. हे मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी आपला उद्योग नोंद असणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या उद्योगाचा आधार नंबर म्हणजे उद्योग आधार कार्ड आपल्याकडे असणे गरजेचे आहे. उद्योग आधार नोंदणी केलेल्या उद्योजकाला मुद्रा कर्ज मिळणे इतर उद्योजकापेक्षा सोपे ठरते. कारण उद्योग आधार ही आधार कार्ड प्रमाणेच उद्योजकाची वैशिष्टपूर्ण ओळख असते. या उद्योग आधार कार्डावर एक व्यवसायिक एकाहून अधिक उद्योगाची नोंदणी करु शकतो.

बहुतांश लघुउद्योजक (एकल व्यक्ती कंपनी, एलएलपी, प्रा. लि. व लि. कंपन्या वगळून इतर सर्व) हे आपले व्यवसाय स्थानिक पातळीवर आपला उद्योग रजिस्टर करतात. त्यामुळे केंद्र सरकार कडे या उद्योगाची नोंद प्रत्यक्षरित्या केली जात नाही. व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगाचे (MSME) चे लाभ उद्योजकांना मिळत नाहीत. कारण एमएसएमई केंद्र सरकारच्या अधिकाराखाली चालणारे खाते आहे. त्यामुळे आपला उद्योग हा MSME मध्ये रजिस्टर / नोंद करण्यासाठी उद्योग आधार हे एक महत्त्वाचे साधन ठरते. त्यानंतर या उद्योजकांना MSME चे लाभ मिळतात. मुद्रा कर्ज हे सुध्दा MSME साठीच आहे. त्यामुळे आपल्याकडे उद्योग आधार असल्यास मुद्रा कर्ज मिळवताना त्याचा फायदा होतो.

👍 उद्योग आधार प्राप्त करण्याची प्रक्रिया –
आधार क्रमांक व उद्योजकाचे नाव – उद्योग आधार नोंदणीच्या संकेतस्थळावर (Website) उद्योग आधाराचा फॉर्म भरण्यासाठी उद्योजकाकडे स्वतःचा आधार क्रमांक व आधार कार्डावरील जसेच्या तसे नाव (spelling व नावाचा क्रम न चुकवता) असणे गरजेचे आहे. तेव्हाचा हा अर्ज पुढील टप्प्यात जातो. या दोन नोंदी भरुन झाल्यावर validate aadhar या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर “Your Aadhaar has been validated successfully.You can continue Udyog Aadhaar registration process.” असा हिरव्या अक्षरात मेसेज दिसतो. त्यानंतर उद्योजकाने आपला प्रवर्ग select (निवडायचा) करायचा आहे. प्रवर्ग मधील पर्याय १. जनरल २. एससी ३. एसटी ४. ओबीसी.

चौथ्या क्रमांकाच्या रकान्यात आपल्या उद्योगाचे नाव लिहायचे आहे. संघटन प्रकार या पाचव्या क्रमांकाच्या रकान्यात आठ पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे. (पर्याय १. प्रोप्रायटरी २. एचयुएफ – हिंदु अनडिवायडेड फॅमिली ३. पार्टनरशिप ४. को-ऑपरेटिव्ह ५. प्रा. लि. कंपनी ६. पब्लिक लि. कंपनी ७. सेल्फ हेल्प ग्रुप ८. इतर)

सहाव्या रकान्यात व्यवस्थित पत्ता लिहणे आवश्यक आहे. पत्ता लिहून झाल्यावर राज्य व जिल्हा पर्यायातून निवडायचे आहेत. पिनकोड, मोबाईल क्र. व ईमेल काळजीपूर्वक (न चुकता) भरायचे आहेत.

व्यवसाय चालू केल्याची तारीख सातव्या रकान्यात लिहायची आहे. त्यासाठी त्या रकान्याच्या खाली दिलेल्या कॅलेंडरचा उपयोग करायचा आहे. सर्वप्रथम फॉर्म भरणाऱ्या उद्योजकांनी आठव्या रकान्यात N/A हा पर्याय निवडायचा आहे. या आधी जर उद्योग आधारचा फॉर्म भरला असेल तर उरलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडावा.

बँक डिटेल या नवव्या रकान्यात आपल्या बँकेचा आयएफएससी क्रमांक व आपला बँक खाते क्रमांक लिहावा.
दहाव्या रकान्यात आपण वस्तू निर्मिती करत असू तर Manufacturing हा पर्याय आणि सेवा प्रदान करणारा व्यावसायिकांनी Services हा पर्याय निवडावा.

अकरावा पर्याय निवडताना पाच अंकाचा NIC (National Industry Classification Code) भरायचा असतो. त्यासाठी दहाव्या रकान्यात निवडलेला पर्याय (Manufacturing / Services) परत एकदा निवडायचा आहे. अकराव्या क्रमांकाच्या रकान्यानंतर दिलेले NIC 2 Digit Code, NIC 4 Digit Code व NIC 5 Digit Code पर्याय काळजीपूर्वक वाचून योग्य तो पर्याय निवडून आपला कोड तयार करायचा आहे.
एकापेक्षा जास्त उद्योग नोंद करायचे असतील तर अकराव्या क्रमांकाच्या रकान्यानंतर येणाऱ्या Add More या बटनावर क्लिक करुन परत अकराव्या क्रमांकाची प्रक्रिया रिपीट करायची आहे. एकच उद्योग नोंदवायचा असेल तर बाराव्या रकान्याकडे जायचे आहे.

बाराव्या रकान्यात आपण किती लोकांना रोजगार दिला आहे त्याची संख्या लिहायची आहे. तेराव्या रकान्यात आपण व्यवसायासाठी किती गुंतवणूक केली आहे. त्याची रक्कम लाखात लिहायची आहे. (एक लाख गुंतवणूक लकेली असल्यास 01 असे लिहायचे आहे.)

चौदाव्या रकान्यात दिलेल्या पर्यायामधून आपले जिल्हा उद्योग केंद्र निवडायचे आहे. व शेवटी verification code बघून लिहायचा आहे. व फार्म submit करायचा आहे. त्यानंतर आपल्या screen वर आपले उद्योग आधार दिसते. त्याची प्रिंट काढायची आहे. व ते कायम सोबत ठेवायचे आहे.
प्रिंट काढता आली नाही तर काही काळजी करण्यासारखे नसते. आपण पाचव्या रकान्यात भरलेल्या ईमेल आयडीवर आपल्या उद्योग आधार कार्डची एक प्रत वेबसाईट वरुन मेल केलेली असते.

http://udyogaadhaar.gov.in/UA/UAMRegistration.aspx  या लिंक वर क्लिक करुन लगेच उद्योग आधार लगेच नोंद करुन घ्या. उद्या आपण मुद्रा कर्ज मिळवताना येणारे अडथळे व त्यावरचे सहज सोपे उपाय याबाबत जाणून घेणार आहोत. तेव्हा भांडवल मिळणार आहे ही खात्री बाळगा. व पुढची पावले उचलण्याच्या तयारीत रहा.
- अमोल चंद्रकांत कदम,

3 comments:

 1. https://www.msmeudyogaadhar.com
  *📑MSME | उद्योग आधार | SSI सर्टिफिकेट 2 तासांत नोंदणी.*
  🕹आपला व्यवसाय MSME (सूक्ष्म , लघु और मध्यम उद्योग मंत्रालय) अंतर्गत नोंदवा आणि मिळवा शासकीय अनेक योजनांचे फायदे.
  📍नवीन व अस्तित्वातील व्यवसायांसाठी- *कर्ज, सबसिडीज आणि कर सवलतीसाठी पात्र*

  *♻नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा🖱*👉www.msmeudyogaadhar.com

  *✅2 तासांत सर्टिफिकेट*
  *✅विनामूल्य सल्ला*
  *✅लाइफटाइम वैधता*
  *✅सरकार मंजूर ISO प्रमाणित पोर्टल ®™*

  ☎अधिक माहितीसाठी.: व्हॉट्सअ‍ॅप @ 9511760650
  https://api.whatsapp.com/send?phone=919511760650

  ReplyDelete
 2. आपण ही सर्व माहिती दिल्या बदल मी आपला आभारी आहे सर,जिल्हा उद्योग केंद्रात नवीन उघोग आलेली माहिती मिळवण्या साठी कोणती अँप किंवा msg सेवा उपलब्ध आहेत का !

  ReplyDelete

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here