Skip to main content

परिपाठ कसा असावा.

www.managaveacademy.blogspot.in

🎤 *परिपाठ कसा असावा.*
💥 *प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परीपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदीन दिवसाची सुरुवात परीपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वेळ लागणार नाही.*
  📌  *प्राथमिक शाळेतील इ.५ वी ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी १० विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गट पाडावेत व पुढील रुपरेषेनुसार परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.*
📌 *सावधान- विश्राम:- ओर्डर देणाऱ्या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.*
📌 *राष्ट्रगीत :- सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.*
📌 *प्रतिज्ञा :- आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिसऱ्या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी.*
📌 *भारताचे संविधान :- परीपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील.*
📌  *प्रार्थना - ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे.
ज्या १० विद्यार्थ्यांचा (मुले- मुली) परिपाठ असेल त्यांनी पुढीलप्रमाणे परिपाठ सदर करावा.*
*अॉर्डर देणारा विद्यार्थी खालील वाक्य वाचुन दाखवेल.*
“ उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय बांधता येईल केंव्हाही
पण क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी “
📌 *पंचांग – केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो , कोणता वर आणि कोणती तारीख आहे. हे आपल्याला पंचांगाच्या माध्यमातून समजते. म्हणून आजचा घेऊन येत आहे. ( संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.)*
📌 *दिनविशेष – उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही न काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे.*
📌 *सुविचार – सुविचार म्हणजे सुंदर असे विचार एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.*
📌 *बोधकथा – कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी . परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शिकायला मिळते. चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळते. म्हणून आजची बोधकथा घेऊन येत आहे.*
📌 *बातमीपत्र – जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे (वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन) समजत असते. म्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे.*
📌 *प्रश्नमंजुषा – जगात ज्ञानाचा विस्फोट झाला आहे. आता मिळालेले ज्ञान थोड्यावेळेने शिळे होत आहे. स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपणाजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे.*
( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्याना विचारावे.)
📌 *इंग्रजी शब्दार्थ – इंग्रजी हि सर्व जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिचा पाया मजबुत करण्यासाठी इंग्रजी शब्दार्थांचा साठा असणे महत्त्वाचे आहे. म्हणून आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे.*
( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)
📌 *पाढे – गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे.*
( प्रतिदिन २ ते ३० पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)
📌 *समुह्गीत – ओर्डर मिळाल्यास सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुह्गीत गायन करावे.*
📌 *पसायदान – बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन व सरळ बसुन समूहाचे पसायदान घ्यावे.*
📌 *मौन – २ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.*
📌 *विसर्जन – हळुच डोळे उघडून शांत बसावे.*
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

www.managaveacademy.blogspot.in

*_आपल्या शाळा नावा रूपाला अनायाच्या असेल तर_*         
..........................................................
1 शाळेत वेळेवर हजर रहा.
2 शाळेतून वेळीवर घरी जा.
3 पूर्ण वेळ अध्यापन करा.
4 विद्यार्थ्याची गुणवत्ता दररोज तपासा.
5 गणवेश आग्रही ठेवा.
6 अध्यापनात सातत्य ठेवा.
7 निमित्त सांगणे बंद करा.
8 उणिवांवर पाणी सोडा.
9 पालकांकडून सहकार्य मागत रहा.
    शाळेची गुणवत्ता समोर मांडा.
10 आपण फक्त नोकरी करत आहोत म्हणुन कार्य करू नका.
11 फक्त विद्यार्थ्याचा विचार करा.
12 जाऊदे म्हणणे सोडा.
13 व्यवस्था ढासळली आहे म्हणून
     आपण ढासळू नका.
14 टाईमपास थांबवा.
15 आपल्या सर्वच गोष्टी सांगत नाही.
     आपण त्यात सुधारणा करा.
16 कोणी चुकून कामे करा असे सांगीतले म्हणून रागवू नका.
17 खेड्यात ड्युटी त्रास करून घेऊ नका.
18 खेड्यात ड्युटी करणाऱ्यांना कमी समजू नका.
19 फक्त आपणच शाळा उज्ज्वल करू शकता हे विसरू नका.
20 आपल्या आजूबाजूचे कामचोर सुधरा.
21 दररोज एक गोष्ट गुणवत्ता पूर्ण शाळेची इतरांना टाका, चालना मिळेल.                            
22. कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन दया . नावे ठेऊ नका सहकार्य करा.
23. मला माफ करा.

💥💥 *शाळा म्हणजे शिक्षक आणि शाळेची हानी तर आपली मानहानी.*      

                              
🙏शिक्षक व शाळा हितार्थ जारी🙏

www.managaveacademy.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…