Skip to main content

उत्पादने, मार्केटिंग व प्रत्यक्ष नफा

व्यवसायाच्या वाटेवर चालताना
भाग - ३ – उत्पादने, मार्केटिंग व प्रत्यक्ष नफा
-----------------------------------------------------------
लेख २४. नेहमी उत्साहात काम करण्याची कला
-----------------------------------------------------------
जीवनाच्या अगदी क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक माणसाला अत्यंत गरज असते अशी काही मूल्ये आहेत त्यामध्ये आत्मविश्वास, समाधान, धाडस, उत्साह, इच्छाशक्ती यांचा समावेश होतो. ही मूल्ये जीवनात असली तरच ते जीवन हे जीवन आहे नाहीतर तो जीवनातला जिवंतपणा हरवून गेल्याचे लक्षण आहे. माणसाला पैसा, संपत्ती, आरोग्य, चांगले घर, आरामदायी वस्तू या सारख्या भौतिक गोष्टींची गरज आहेच मात्र या गोष्टी जीवनाची केवळ एकच बाजू आहेत. जीवनाची दुसरी बाजू ही मानसिक मूल्यांची आहे. सर्व भौतिक वस्तू प्राप्त केल्यानंतर जर मनशांती, आत्मविश्वास, समाधान, उत्साह, धाडस व इच्छाशक्ती ही मूल्ये प्राप्त करण्यासाठी धडपडणे व्यर्थच ठरण्याची शक्यता आहे. याउलट जर आधीपासूनच आपल्याकडे ही मूल्ये असतील तर आपल्याला भौतिक गोष्टींचा आनंद चांगल्या पध्दतीने उपभोगता येतो.

मानसिक मूल्ये / आत्मिक तत्त्वे ही बाजारात विकत मिळत नाहीत. एक दिवसात शरीरात निर्माण करताही येत नाहीत. त्यासाठी सततचे प्रयत्न करणे गरजेचे असते. उदाहरण द्यायचे झाले तर अगदी भौतिक सुखसोयीची रेलचेल असणाऱ्या बंगल्यात उबदार रजईत मनशांती हरवलेला माणूस झोपेच्या गोळ्या खाऊनही झोपू शकत नाही. याउलट अंगावर फाटके कपडे घातलेला साधे बारदानही अंथरायला नसणारा एखादा भिकारी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच्या फूटपाथवर मेल्यासारखा गाढ झोपलेला दिसतो. आपल्याला या दोन्हींचा समन्वय साधत जीवन सुंदर बनवायचे आहे. व आपला उद्योग वाढवायचा आहे. पहिल्या श्रीमंत माणसाच्या उदाहरणातील भौतिकता प्राप्त करण्याबरोबरच दुसऱ्या उदाहरणातील भिकाऱ्याच्या झोपेचे रहस्य आपल्याला साध्य करायचे आहे. विज्ञानाने कितीतरी प्रगती केली असली तरी हजारो वर्षापासून अस्तित्वात असणारी ही मूल्ये इथून पुढे चिरकाल टिकणार आहेत. त्याची सोबत करतच आपल्याला जगणे सुखकर करणे व आपला उद्योग उभा करणे फायदेशीर ठरणार आहे. जसे दोन अधिक दोन या प्रश्नाचे उत्तर हजारो वर्षापूर्वीही चार होते. ते भारतातही चारच असते. पाकिस्तान, अमेरिका, पृथ्वी, मंगळ व विश्वातल्या सर्व ठिकाणी हे उत्तर चारच असते. ते स्थळानुसार व काळानुसार बदलत नाही. म्हणून ते गणिती तत्त्व ठरते. जे चिरकाल टिकते व स्थळकाळानुसार बदलत नाही त्यालाच तत्त्व म्हणतात.

तर आता ही मानसिक / आत्मिक तत्त्वे कशी मिळावयाची? कायमस्वरुपी जीवनात कशी टिकवायची याच्या काही पध्दती पाहू या.

👤 पुस्तके – चांगली विचार देणारी, सकारात्मक व प्रेरणादायी पुस्तके वाचणे ही कृती आपल्याला कायम उत्साहवर्धक ठरते. पुस्तके वाचण्यासाठी वेळ मिळत नसला तर आता ईबुक व Audio book बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ती येता जाता मोबाईलवर / टॅबवर वाचू शकतो किंवा ऐकू शकतो. हा फायदेशीर उपाय आता सहजसोपा झाला आहे. अतिपरिणामकारक व यशस्वी माणसे ही कायम पुस्तकांचे वाचन करत असतात.

👤 ध्यान व प्राणायम – जीवनात अध्यात्माबरोबर विज्ञानाची (अंधश्रध्दा नव्हे) जोड दिल्यास चिरकाल टिकणारे मानसिक स्वास्थ प्राप्त होते. त्यासाठी ध्यान ही प्रभावी पध्दत आहे. त्यामुळे मनाची एकाग्रता व प्रसन्नता वाढते. श्रेष्ठ मनुष्याची साधारण व्यक्तीबरोबर तुलना केल्यास त्याच्यांतील फरक हा केवळ एकाग्रतेच्या कमीअधिक प्रमाणामुळ असतो हे लक्षात येईल.

👤 मौन – महिन्यातून एक दिवस पूर्ण मौन पाळल्यास खूप उर्जा मिळते. आपल्या आंतरिक शक्ती जागृत होतात. त्यामुळे मोठमोठी कामे करण्याची इच्छाशक्ती निर्माण होत असते. कठिण प्रसंगात टिकून राहण्याची एक अनामिक ताकद मौनामुळे प्राप्त होत असते. प्रचंड कर्म करणाऱ्या व्यक्ती या कमालीच्या शांत असतात. याउलट ज्या व्यक्ती सहज रागावतात त्यांच्या हातून मोठी कामे होत नाहीत. कारण त्यांच्यातील सर्व शक्ती कर्माच्या रुपाने बाहेर येण्याच्या ऐवजी रागावण्यात खर्ची पडते. त्यामुळे असा माणूस स्वतःची मोडतोड करतो. मौनाने बरेच परिणाम साध्य होतात. स्वतःची सजगता (Alertness) वाढते.

👤 BWY Day – Busy With Yourself Day म्हणजे महिन्यातील एक दिवस स्वतःसाठी. नेहमीच्या वातावरणापासून दूर म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात २४ तास मौनात राहणे. व्यवसाय तसेच घरातील कोणत्याही समस्येचा विचार न करता केवळ आपल्या आवडीच्या विषयात स्वतःला डुबवून टाकणे किंवा स्वतःच्या छंदात हरवून जाणे. ही कृती आपल्याला चिरकाल टिकणारा आनंद व उत्साह देऊन जाते. मोठमोठे व्यावसायिक हा BWY Day साजरा करतात.

👤 संगीत – विचारावर निंयत्रण मिळवण्यासाठी विशेष संस्कार केलेले संगीत ऐकणे फायदेशीर ठरते. Western व classical अशा दोन्ही प्रकारातील संगीताच्या सीडी बाजारात उपलब्ध आहेत. अशा सीडीचे विषय thoughts, Spirit, Energy अशा नावाने असतात. या सीडींची किंमत इतर संगीताच्या सीडींच्या तुलनेत ५ ते ७ पट जास्त असते. याशिवाय आवडीची गाणी ऐकणे, वेळ काढून आवडीचे खेळ खेळणे, सकाळची प्रभातफेरी (Morning Walk), पर्यटन, देवदर्शन, सहली अशा अनेक गोष्टी आपला व्यवसाय सांभाळून वारंवार करत राहिल्यास एक आनंदी व यशस्वी उद्योजकीय जीवन जगण्याचा खराखुरा आनंद मिळतो. असा आनंद व उत्साह आपल्या जीवनात ओसांडून वाहण्यासाठी शुभेच्छा!!!

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती

Comments

Popular posts from this blog

व्यवसाय यादी

महाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे।
 दोस्तो मैं आपको आज इस तरह के बिझिनेस आयडिया देणे वाले है की शायद आपकें नजदीकि के लोक हसेंगे । मगर इस तरह के लोगो को नजर अंदाज करना सीख लो। क्यो कीं एक दिन वही लोग आपकें कामयाबी की दास्त बताऍंगे।  दोस्तो हमे गुलामी की इतनी आदत लगी है की हम बिझिनेस के बारे में सोचना बंद करा लिया है। मैने यहा ऐसें कुछ स्मॉल स्केल बिझिनेस आयडिया की यादी दे रहा हू की आप कमी लागत मैं स्टार्ट कर सकते हो।
1.इंटरनेट कॅफे I C
2. फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
3. कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
4. आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
5. एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES
6. पी.व्ही.सी. केबल P.V.C VABLE
7. चहा स्टॉल TEA STALL
8. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा WATER & SOIL TESTING LAB.
9. वडा पाव WADAPAV
10. शटल कॉक MANUFACTURING SHUTTLECOCK
11. ससे पालन RABBIT FARMING
12. ईमू पालन ( शहामृग ) EMU FARMING
13. खवा  MAKING KHAVA
14. हात कागद  HAND MADE PAPER
15…

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’

सुरू करा स्वतःचे ‘स्टार्टअप’
ऑफिसमधील तेच तेच आणि कंटाळवाण्या कामाच्या पद्धतीतून बाहेर पडण्याची इच्छा असेल.. आपल्या मर्जीप्रमाणे काम करून हवा तेवढा पैसा आणि समाधान मिळविणाऱ्यांचे अनुकरण करायचे असेल, तर आता केंद्र सरकारने तुमच्यासाठी उद्योगाच्या गुहेचे दार उघडले आहे. 'स्टार्टअप' नावाची ही संधी तुमचे दार ठोठावत आहे. चालून आलेली हीसंधी नेमकी कशी हेरायची या विषयी टाकलेला हा दृष्टिक्षेप...देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत. त्यातही तरुणांना आणि नवकल्पनांच्या जगात भराऱ्या मारणाऱ्यांना आयतीच संधी चालून आली आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने नवकल्पनांच्या विमानाला टेक्नॉलॉजीचे पंख लावण्यासाठी आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया-स्टँडअप इंडिया' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आणि १६ जानेवारी रोजी त्या विषयीचे धोरणही जाहीर केले.स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्या…

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी

रीढ की हड्डी के ख़राब होने के बाद भी खड़ी करी ३४०० करोड़ की कंपनी
 जब अमेरिका के ३१  वर्षीय लिजा फॉलज़ोन (https://en.wikipedia.org/wiki/Lisa_Falzone) ने तीन साल पहले अपनी खुद की कंपनी शुरू की, तो लोगों ने उनका मज़ाक उड़ाया। कहने की जरूरत नहीं है कि यह लकवाग्रस्त लड़की क्या कर सकती है? लेकिन लीजा ने उन लोगों के मुंह बंद कर दिए हैं जो आज उनके उच्च प्रदर्शन से नाराज हैं। आज, यह लगभग 2 करोड़ रुपये की कंपनी का है। लिजा जल्द ही $ 1 बिलियन का आईपीओ लॉन्च करने वाली है। अगर ऐसा होता है तो वह दुनिया की पहली महिला होगी जो इतना बड़ा आईपीओ लॉन्च करेगी।

Liza ने २०१३ में एक Revell Systems (http://revelsystems.com) कंपनी शुरू की। लकवाग्रस्त होने के बाद रीढ़ की हड्डी टूट गई थी। यह इस समय के दौरान था कि उसे इस विचार का एहसास हुआ। २०१० में, लिज़ा स्टैनफोर्ड विश्वविद्यालय में प्रबंधन की डिग्री का पीछा कर रही थी। वह विश्वविद्यालय में तैराकी भी करती थी। एक दिन, जब वह तैरने के लिए घर से निकल रहा था, वह अचानक सीढ़ियों पर गिर गया। डॉक्टर ने पुष्टि की कि रीढ़ की हड्डी टूट गई थी। ऑपरेशन के कारण लिजा खड़ी नहीं…