*ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन* *मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप - २०१६*

*ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन*
*मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप - २०१६*
www.managaveacademy.blogspot.in
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे हजारो गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुष्काळ या गंभीर समस्येवर मात करता यावी यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक समाजसेवी व्यक्ती तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने युद्धपातळीवर विविध प्रकारचे कार्य हाती घेतले आहे. राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या 'जलयुक्त शिवार' या अभियानाने गेल्या काही वर्षात प्रशासकीय अधिकारी व गावकरी यांमधील प्रभावी भागिदारीद्वारे जलसंधारणाच्या उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम आता राज्यात सर्वत्र दिसू लागले आहेत. तरीदेखील या अभियानाची अंमलबजावणी करताना शासनाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे ज्यावर शासनाला विशेष लक्ष केंद्रित करायचे आहे.

*ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन*
www.managaveacademy.blogspot.in
‘ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन’ हि एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे, ज्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि सेवा प्रदान करून ग्रामीण भागांना शाश्वत विकासासाठी सक्षम व स्वयंपूर्ण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू आहे.

सामाजिक हिताच्या दृष्टीने ‘कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी’ या कायद्याअंतर्गत विविध कॉर्पोरेट्सकडून हाती घेतले जाणारे प्रकल्प व अशा पद्धतीचे शासकीय उपक्रम यांच्या अंमलबजावणीत शासन व कॉर्पोरेट्स यांना एकत्रितपणे काम करता येईल. सध्या अस्तित्वात असणाऱ्या कॉर्पोरेट्सच्या सामाजिक हिताच्या प्रकल्पांना, शासकीय योजना व प्रशासकीय यंत्रणा यांचे साहाय्य लाभेल. त्याचप्रमाणे शासन देखील कॉर्पोरेट्सचे तांत्रिक कौशल्य, कामाच्या सर्वोत्तम पद्धती व अनुभव या सर्व गोष्टींना आपल्या कार्यामध्ये सामाविष्ट करेल.

महाराष्ट्रतील दुष्काळ किंवा अन्य सामाजिक समस्यांनी ग्रासलेल्या १००० गावांचे या कार्यक्रमाअंतर्गत २०१८ पर्यंत 'आदर्श गाव' म्हणून रूपांतर करण्यात येईल व अशा गावांचा आदर्श ठेवून महाराष्ट्रातील अन्य गावांचा देखील विकास करण्यात येईल.

*ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रम:*
•'ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रम' हा या मिशनच्या अंमलबजावणीतील एक महत्वाचा घटक असणार आहे. प्रत्येक गावासाठी एका फेलोची नेमणूक केली जाईल आणि तो फेलो कार्यक्रमाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार राहील. माननीय मुख्यमंत्र्यांकडून सर्व फेलोजना पाठबळ देण्यात येईल कि ज्याचे योग्य वेळेत गावांचा विकास करण्यामध्ये फेलोजना साहाय्य होईल.
•फेलोच्या भूमिकेचे महत्व लक्षात घेता, १२ महिनांच्या फेलोशिप कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. व्यापक निवड प्रक्रियेनंतर, कामासंदर्भात फेलोजना सविस्तर प्रशिक्षण देण्यात येईल व त्यानंतर संबंधित गावांमध्ये फेलोजची नेमणूक करण्यात येईल.

*संपर्क:  fellowship.ruraldev@maharashtra.gov.in*

*कार्यक्रमाचा तपशील*

1.*पात्रता निकष*
निवडीसाठीचे पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत:
oअर्ज भरण्याच्या वेळी उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षाच्या मध्ये असायला हवे.
oमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के गुण प्राप्त केलेले, कोणत्याही शाखेचे पदवीधर /पदव्युत्तर पदवीधर या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. तसेच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी ची मान्यता असलेल्या भारताबाहेरील विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले पदवीधर/पदव्युत्तर सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.
oकामाचे स्वरूप लक्षात घेता उमेदवारास कोणत्याही शासकीय रुग्णालयातून शारीरिक पात्रतेची तपासणी करणे आवश्यक राहील.

2.*निवड प्रक्रिया*
निवड प्रक्रिया दोन टप्यात राबवली जाईल. 
पहिल्या टप्यात उमेदवारांना रेज़्यूमे, दिलेल्या ३ विषयांवर संक्षिप्त निबंध (मराठी/इंग्रजी/हिंदी यापैकी कोणत्याही एका भाषेत) लिखाण व वैयत्तिक माहिती संदर्भातील एक गूगल फॉर्म देखील भरावा लागेल. पहिल्या टप्यात निवड झालेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत दुसऱ्या टप्यात घेण्यात येईल.

3.*कामाचे स्वरूप*

गावांमध्ये ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित गावामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या फेलोची असेल. नियुक्त करण्यात आलेल्या फेलोंची प्रमुख भूमिका खालील प्रमाणे असेल:

oगावात विकास घडवून आण्यासाठी, गावकऱ्यांच्या वर्तवणुकीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे.
oशासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या योजना आणि विकास कार्यांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचवणे.
oकॉर्पोरेट, शासन आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावणे.
oग्रामीण भागात प्राथमिक सर्वेक्षण करणे.
नियुक्त करण्यात आलेल्या फेलोंची जबाबदारी खालील प्रमाणे राहील. 
oजिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि मुख्यमंत्री कार्यालय यांमध्ये समन्वय साधणे.
oग्रामीण विकास योजनेवर त्या गावातील ग्रामपंचायती सोबत काम करणे.
oगावात सामाजिक व आर्थिक विश्लेषण करून गावकऱ्यांच्या खऱ्या गरजांचा शोध घेणे.
oस्थानिक प्रशासनाला नियोजनामध्ये सहाय्य करणे.
oजिल्हा प्रशासनाकडून अधिक चांगल्या सेवा सुविधा कशा पद्धतीने पुरवल्या जाऊ शकतील यासाठी आवश्यक ते संशोधन करणे.
oस्वयं सहायता गट (एसएचजी) आणि पंचायत यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.
oमनरेगा, स्वच्छ भारत अभियान, आयसीडीएस यांसारख्या विविध शासकीय योजनांच्या अधिक चांगल्या अंमलबजावणीसाठी सहाय्य करणे.
oनाविन्यपूर्ण योजनांचा आराखडा तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
oग्रामीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबतचा अभिप्राय कार्यकारी समिती आणि प्रशासकीय परिषद यांना देणे.

4.*प्रशिक्षण कार्यक्रम*

ग्रामीण पातळीवर सर्व कार्य उत्तम रित्या पार पाडण्यासाठी फेलोजना व्यापक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फेलोजला देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या वर्तमान कौशल्यांमध्ये वाढ होईल; तसेच ते स्वतःला एक गुणवत्तापूर्ण व्यावसायिक म्हणून घडवू शकतील. काम सुरु करण्यापूर्वी फेलोजसाठी, टिस (टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस) आणि आयआयटी बॉम्बे- सीतारा (द सेंटर फॉर टेकनॉलॉजि अल्टरनेटिव्हस फॉर रूरल एरियाज) द्वारे एक 'ओरिएंटेशन प्रोग्रॅम' आयोजित करण्यात येईल ज्याद्वारे फेलोजला ग्रामीण स्तरावर नियोजन करणे सोपे जाईल.प्रत्येक फेलोसाठी एका मार्गदर्शकाची नेमणूक करण्यात येईल जो त्या फेलोला संपूर्ण १२ महिन्यांसाठी मार्गदर्शन देईल आणि येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास साहाय्य करेल. मार्गदर्शकांमध्ये शासकीय अधिकारी, शैक्षणिक क्षेत्र व विविध कॉर्पोरेट्स मध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांचा समावेश असेल.

5.*मानधन*
कार्यक्रमाच्या कालावधीत प्रत्येक फेलोला दरमहा रु. ३०,०००/- मानधन दिले जाईल.

*अर्ज करण्याची प्रक्रिया*
*पहिला टप्पा*
वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरण्याकरिता अर्जदारांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.
1.फेलोशिपचा अर्ज: फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
2.रेज़्यूमे (कृपया आपला रेज़्यूमे १-२ पानांपर्यंतच मर्यादित ठेवावा)
3.खालील ३ प्रश्नांची उत्तरे २००-२५० शब्दांमध्ये (मराठी/इंग्रजी/हिंदी यापैकी कोणत्याही एका भाषेत) एका वर्ड/पीडीएफ डॉक्युमेंट मध्ये सादर करावीत. प्रत्येक उत्तराच्या आधी त्याच्याशी संबंधित प्रश्न नमूद करावा व तिन्ही प्रश्नांची उत्तरे एकाच वर्ड डॉक्युमेंट मध्ये लिहावीत. संबंधित प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:
a.तुम्हला ग्राम विकास फेलों म्हणून का काम करायचे आहे?
b.स्थानिक लोकांसाठी काम करण्याच्या हेतूने फेलोजची नेमणूक महाराष्ट्रातील दुर्गम भागात करण्यात येणार आहे; त्या अनुषंगाने तुमच्याकडे असे कोणते अनुभव आहेत ज्यामुळे तुम्हाला वाटते कि तुम्ही अशा दुर्गम भागात काम करू शकाल?
c.फेलोशिप कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या अनुभवाचा वापर तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात कशा पद्धतीने करू इच्छिता?

कृपया आपला रेज़्यूमे आणि वर नमूद केलेल्या प्रश्नांची उत्तरे सादर करणारे वर्ड/पीडीएफ *डॉक्युमेंट fellowship.ruraldev@maharashtra.gov.in येथे* पाठवावे.फेलोशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख : २५ डिसेंबर २०१६.
*दुसरा टप्पा*
पहिला टप्यावर मिळालेल्या अर्जांच्या आधारे काही उमेदवार निवडले जातील व निवड समिती समोर त्यांची वैयत्तिक मुलाखत घेण्यात येईल. वैयत्तिक मुलाखतीनंतर उमेदवारांची फेलो म्ह्णून अंतिम निवड करण्यात येईल.निवडक उमेदवाऱ्याच्या मुलाखती जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होतील................... माहिती महाराष्ट्र शासन वेब पोर्टल द्वारा ,,

Pls fallow us at
www.managaveacademy.blogspot.in

Post a Comment

0 Comments