child saving - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 30, 2016

child saving

Child Saving

*मुलांना बचत करायला शिकवा...*_
लहान मुलांना वाढत्या वयासोबत चांगल्या सवयीही लावणे आवश्यक असते. अनेक चांगल्या सवयीबरोबरच त्यांना पैशांची बचत करण्यासही शिकवले पाहिजे. जेणेकरुन त्यांचे भवितव्य चांगले होईल. पण ही सवय लावावी तरी कशी? त्यासाठी जाणून घ्या पुढील काही ट्रिक्स...
 तुम्ही सांगितलेली कामे मुलांनी जबाबदारीने केल्यावर किंवा चांगला अभ्यास केल्यावर त्यांना काही रक्कम बक्षिस म्हणून द्या. तसेच दिलेली रक्कम साठवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. यामुळे त्यांना अभ्यास करण्याबरोबरच पैसे साठवण्याची सवयसुद्धा लागते.
 मुलांनी साठवलेल्या पैशांतून तुम्ही त्यांनाच काही तरी वस्तू घेण्यास सांगू शकता. यामुळे त्यांना बचतीचे महत्त्व समजेल.
 कधी-कधी मुले काही गोष्टींसाठी खूपच हट्ट करतात. यावेळी त्यांना ठामपणे 'नाही' म्हणून सांगितले पाहिजे. पैशाचे महत्त्व आणि बचत किती महत्त्वाची असते हे त्यांना समजावा.
 लहानपणापासूनच जर मुलांच्या हट्टावर नियंत्रण ठेवले नाही तर भविष्यातसुद्धा त्यांचा दृष्टिकोन किंवा स्वभाव हट्टी होण्याची शक्यता असते. त्यांना एकमेंकाना देण्याची किंवा शेअरची सवय लावा. यामुळे ते आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि लोकांचा विचार करू लागतील,
_*प्लीज, मुलांना घाबरवू नका...!*_
लहान मुल ऐकत नसलं की, अनेक पालक त्यांना भीती घालतात. जसे की, तू जेवला नाहीस तर भूत येऊन तुला घेऊन जाईल, झोपला नाहीस तर पोलीस पकडतील, ऐकले नाहीस तर तुला हॉस्टेलमध्ये घालेन. याचा फायदा तात्पुरता होतो पण मुलांवर याचा दीर्घकाळ वाईट परिणाम होतो. कसं ते जाणून घेऊयात... 
 तुम्ही मुलांना जे काही बोलता त्याचा मनात विचार करुन काही विचित्र कल्पना करतात आणि यातूनच त्यांचा गैरसमज होऊ शकतो. त्यांना ते सर्व खरंच वाटते. काही मुले तर त्याची भीती मनात बाळगतात आणि डिप्रेसही होतात. तेव्हा भीती न घालता मुलांची समजूत काढणे खूप गरजेचे असते.
 लहान मुलांची मने हळवी असतात आणि आपली भीती ते कोणालाही उघडपणे सांगू शकत नाहीत. अशा गोष्टी ते वारंवार आठवत राहतात आणि मग त्यांना सतत भीती वाटू लागते. यामुळे ते झोपेतून दचकून जागी होतात किंवा शाळेमध्ये सक्रीय राहत नाहीत.
 जर तुम्हाला मुलांनी काही गोष्टी ऐकाव्या, असे तुम्हाला वाटते, त्या करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या झोपेची एक ठराविक वेळ निश्चित करा आणि त्यांच्या जेवणाबद्दल विशेष काळजी घ्या. जेव्हा ते काही गोष्टी ऐकत नसतील तेव्हा तुमच्यातील संयम ढळू देऊ नका आणि गोड बोलून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करा. पण तरीही ऐकत नसतील तर शांत राहा आणि त्यांना समजावून सांगा की, तू जे करत आहेत ते चुकीचे आहे. यामुळे तुलाच त्रास होईल, अशाप्रकारे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करा. पण, त्यांच्या मनात कसलीही भीती उत्पन्न करू नका.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here