dhirubhai ambani story of success - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, December 28, 2016

dhirubhai ambani story of success

dhirubhai ambani

Dhirubhai Ambani story of success


रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी आज हयात असते तर त्यांनी आपला 84 वा वाढदिवस(28 डिसेंबर)साजरा केला असता.धीरुभाई अंबानी यांचा स्ट्रगल,त्यांचा बिझनेस आणि आयुष्याविषयी आपल्याला माहिती आहेच.पण,धीरुभाईंच्या आयुष्यातील'ती'8 वर्षे फार महत्त्वाचे होते.

मे 1950 मध्ये नोकरीसाठी यमनमध्ये गेलेले धीरुभाई डिसेंबर 1958 मध्ये मायदेशी परतले.त्यांनी रिलायन्स कंपनी सुरु केली.धीरुभाईंच्या संपूर्ण आयुष्यात 1950-58 ही 8 वर्षे महत्त्वाचे ठरल्याचे काही मोजक्याच लोकांना माहीत असावे.

यमनमध्ये केली 200 रुपये महिन्याची नोकरी

धीरूभाई यमनला नोकरीसाठी गेले होते.सुरुवातील त्यांनी एका पेट्रोलियम कंपनीत 200 रुपये महिन्याची नोकरी केली.नोकरी सोडली तेव्हा त्यांचा पगार 1100 रुपये होता.

धीरुभाई यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहे.धीरूभाईंविषयी जाणून घेण्यासाठी team ने त्यांच्या खास 3 मित्रांशी संवाद साधला.तिघांनी धीरुभाईंसोबत काम केले होते.2002 मध्ये धीरूभाईंचे निधन झाले.पण,तिघे आजही अंबानी फॅमिलीच्या संपर्कात आहेत.मीडिया ही माहिती पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे.चला तर मग,जाणून घेऊया आमचे एक्सक्युसिव्ह रिपोर्ट...

(कटेंट सोर्स:1950 ते 1958 या काळात यमनमध्ये धीरूभाई यांच्यासोबत एका कंपनीत काम करणारे त्यांचे मित्र भरतभाई शाह.यमनच्या ब्रिटिश कॉलनीत राहाणारे एम.लॉकमॅन,कंपनीच्या मेसमध्ये साफसफाईची व्यवस्था पाहाणार्‍या टीमचे मेंबर एलाद.5 पिढ्यांपासून यमनमध्ये राहाणारे हिम्मत जगानी यांचे चिरंजिव परूभाई जगानी.कोकिलाबेन यांनी एका मॅगझिनला दिलेला इंटरव्ह्यू आणि इंटरनेट रिसर्च)
- धीरूभाईंचे यमनमधील मित्र भरतभाई शाह यांनी सांगितले की, 'मी आणि धीरू 1950 ते 1958 ही 8 वर्षे 'ए. बेसे अॅण्ड कंपनी'त‍ सोबत काम केले. ज्युनियर क्लरीकल स्टॉफ म्हणून कंपनीत दोघांची नियुक्ती झाली होती.
- 'तत्कालीन काळात धीरूभाई आमच्या 28 सहकार्‍यांमध्ये सशक्त होते. सगळे त्यांचा 'गामा पहेलवाल' असे संबोधत होते. इतकेच नव्हेतर कंपनीत त्यांना सगळे घाबरत होते.
- धीरुभाई राहात असलेल्या मेसमध्ये सगळ्यांना रात्री 1 ग्लास दूध मिळत होते. तरी देखील धीरूभाई यांचे पोट भरत नव्हते. ते 11 वाजता सगळे झोपल्यानंतर धी‍रुभाई हळूच उठत आणि किचनमध्ये जाऊन सगळे दूध संपवून टाकत असत.
- दरम्यान, भरतभाई आणि धीरूभाई यांचा वाढदिवस एकाच दिवशी, एकाच वर्षी झाला होता. ते म्हणजे 28 डिसेंबर 1932, पहाटे 5 वाजता.
-भरतभाई सध्या दुबाईत आहेत. Al Mustaneer Trading Company चे ते चेअरमन आहेत.

.धीरूभाई यांचे निकटवर्तीय मगनभाई पटेल यांना धीरुभाईंचा पहिला इंटरव्ह्यू घेतला होता. सेलेक्शन बोर्ड त्यांच्या प्रचंड प्रभावित झाला होता.
- इंटरव्ह्यूमध्ये पटेल यांनी धीरूभाईंच्या हातात इंग्रजी वृत्तपत्र 'टाइम्स ऑफ इंडिया' देऊन पहिली न्यूज वाचण्यास सांगितली होती.
- भरतभाई यांनी सांगितले की, 'टेस्ट पास केल्यानंतर धीरूभाई, इटालियन शिप 'कॅबोटो'ने एडन पोहोचले. विना व्हिसा प्रवाशांना यमनला घेऊन जाणारी ही शेवटची शिप होती. भरतभाईंचा मासिक पगार 225 आणि धीरूभाईंचा पगार 200 रुपये ठरला होता.

या काळात धीरूभाईंसोबत काम करणारे हिम्मतभाई जगानी यांचे चिरंजिव परूभाई जगानी यांनी सांगितले की, 'पहिल्यांदाच यमनला आलेल्या धीरुभाईंची हिम्मतभाई खूप गंमत घेत असत. एकदा सायंकाळी शिफ्ट संपवून हिम्मतभाईंनी धीरूभाईंसोबत समुद्रात उडी घेऊन 2 मिनिटे पाण्यात राहाण्याची शर्यत लावली.
- धीरूभाईंनी देखी ती स्विकारली. जिंकणार्‍यास आईसक्रीम पार्टी द्यावी लागेल, असे ठरले होते. दोघांनी समुद्रात उद्या घेतल्या. 2 मिनिटांनी पुन्हा जहाजावर पोहोचले.
- धीरुभाईंनी समुद्रात उडी घेतल्याचे पाहून सगळ्यांना धक्का बसला होता. समुद्रात शार्क मासा होता. पण धीरुभाईंना ही शर्यत जिंकायचीच होती.
- त्यानंतर मात्र, धीरुभाईंची थट्टा करण्याच्या हिम्मतभाईंचीही हिम्मत होत नव्हती. बहुतेक सहकार्‍यांनी धीरुभाईंकडून समुद्रात पोहोणे शिकून घेतले होते.

सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत धीरूभाई बेसे अॅण्ड कंपनीत काम करत होते. नंतरचा वेळ ते अरब आणि इंडियन कम्युनिटीच्या लोकांच्या गाठीभेटी घेत असत. त्यांच्याकडून बिझनेस आणि ट्रेडिंग शिकून घेत.
- ट्रेडिंग आणि हिसाब-किताब जाणून घेण्यासाठी धीरूभाईंनी काही महिने ऑफिसनंतर फ्रीमध्ये दुसर्‍या ठिकाणी नोकरी देखील केली. यावरुन धीरूभाईंना बेसे अॅण्‍ड कंपनीने निलंबित केले होते.
- जगानी यांनी सांगितले की, कंपनीला धीरुभाईंच्या खासगी ट्रेडिंगबाबत भनक लागली होती. कंपनी मॅनेजमेंटने धीरुभाईंना सस्पेंड केले होते.
- जमनादास यांनी सर्व जबाबदारी स्वत:वर घेऊन नोकरीचा राजीनामा देऊन धीरूभाईंची नोकरी वाचवली होती.

तत्कालीन मेसमध्ये खानपानाची व्यवस्था पाहाणार्‍या टीमचे मेंबर एलाद यांनी सांगितले, धीरूभाईंनीकडे बिझनेस माइंड होता. यमनची करन्सी 'रियाल'मधून चांदी काढून त्यांनी लाखो रुपये कमावले होते.
- 1950 दशकात 'रियाल' मार्केटमधून गायब होण्याच्या मार्गावर होती. रियाल वितळवून त्यातून चांदी काढून ती धीरुभाई लंडन मेटल एक्सचेंजमध्ये करण्याचे काम करत होते.
- ही बाब अरब ट्रेजरीच्या अधिकार्‍यांना समजली होती. अधिकारी नोटिस घेऊन धीरुभाईंकडे पोहोचले होते. पण, पुढे काहीच झाले नाही.
- यमनच्या रियालचे बाजारात जितके मुल्य नाही, तितके मुल्य त्यामध्ये असलेल्या चांदीला होते, हे धीरूभाईंनी ओळखले होते.
- धीरुभाई रियाल गोळा करत. त्यानंतर चांदी काढून ती लंडन बुलियानमध्ये जास्त दरात विकत. यातून धीरुभाईंनी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपये कमावले होते.


धीरूभाईंनी रिलायन्स कंपनी सुरु केली. रिलायन्स हे नाव धीरुभाई यांनी त्यांचा यमनचा मित्र प्रवीणभाई ठक्कर यांच्याकडून उधार घेतले होते.
- 2002 मध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये प्रवीणभाईंनी खुद्दा याबाबत खुलासा केला होता. 'रिलायन्स' हे नाव धीरूभाईंने आपल्याकडून उधार घेतल्याचे प्रवीणभाईंनी सांगितले होते.
- प्रवीणभाई म्हणाले होते की, 1953 मध्ये त्यांनी रोलेक्स आणि कॅननची एजन्सी घेतली होती. आपल्या स्टोअरला त्यांनी रिलायन्स नाव दिले होते. बिझनेसचा झपाट्याने विस्तार झाला. काही वर्षातच प्रवीणभाईंनी मर्सडीज कार खरेदी केली होती.
- हे पाहून धीरुभाई देखील चकीत झाले होते. धीरूभाईंनी प्रवीणभाईंची भेट घेतली. ते म्हणले, 'रिलायन्स' हे नाव आपल्याला खूप पसंद आहे. हे नाव ग्राहकांचा विश्वास दर्शवते. खरंच रिलायन्स हे लकी नाव आहे. ते मला देऊन टाक.'
- ठक्कर यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, चर्चा सुरु असताना काही महिन्यांनंतर धीरूभाईंचा विवाह झाला. 3000 डॉलरच्या सेव्हिंगसोबत मायदेशात परतून धीरुभाई अंबानी यांनी रिलायन्स कंपनी सुरु केली.
- 1977 मध्ये राजकोटच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका मीटिंगमध्ये धीरूभाईंनी स्वत: हे कबूल केले होते. रिलायन्स हे नाव मित्राकडून उधारीत घेतल्याचे धीरुभाईंनी सां‍गितले होते. मित्राचे दक्षिण यमनमध्ये रिलायन्स नामक मोठे स्टोअर असून ती मोठी हस्ती झाली आहे.
- धीरूभाईंनी त्याबदल्यात राजकोटमधील 'विमल'चे 2 मोठे स्टोअर प्रवीणकुमार ठक्कर यांच्या नावावर केले होते.

1955 मध्ये विवाहकरून कोकिलाबेन पहिल्यांदा यमन पोहोचल्या. तेव्हा धीरूभाई त्यांना घेण्यासाठी आपली ब्लॅक कार घेऊन पोहोचले होते.
- त्याआधी धीरुभाई अंबानींनी पत्नी कोकिलाबेन यांनी पत्र लिहिले होते. ‘कोकिला मी एक कार खरेदी केली आहे. ती घेऊन मी तुला घ्यायला येणार आहे. तु कारचा कलर गेस कर. कारचा रंग ब्लॅक आहे. बिल्कुल माझ्या सारखा.’
- कोकिलाबेन यांनी एका गुजराती मॅगझीनला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये याबाबत खुलासा केला होता.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here