forgot mobile password android: काय पासवर्ड ‍विसरलात? घरबसल्या 'अनलॉक' करा तुमचा स्मार्टफोन - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, December 27, 2016

forgot mobile password android: काय पासवर्ड ‍विसरलात? घरबसल्या 'अनलॉक' करा तुमचा स्मार्टफोन

Forgot Mobile Password Android


 काय पासवर्ड ‍विसरलात? घरबसल्या 'अनलॉक' करा तुमचा स्मार्टफोन
'स्मार्टफोन'ने संपूर्ण जगाला भूरळ घातली आहे. धावत्या जगात आता व्यक्तीपेक्षा 'स्मार्टफोन'ला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण बहुतेक कामे स्मार्टफोनच्या माध्यमातून चटकण हातावेगळी करता येतात. बॅंक ट्रान्जेक्शन असो अथवा रेल्वे तिकीट बुकिंग सगळं काही फोनवरून अगदी सहज करता येते.

'स्मार्टफोन'कडे घरातील तिजोरी म्हणूनही पाहिले जाते. कारण फोनमध्ये पर्सनल माहितीशिवाय प्रोफेशनल डाटा सेव्ह करता येतो. त्यामुळे आपला स्मार्टफोन सुरक्षित राहावा म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत असतो. फोनमधील डाटा चोरी झाला तर आपल्याला मोठ्या नुकसानाला तोंड देण्याचीही वेळ येऊ शकते. त्यामुळे स्मार्टफोन लॉक करण्यासाठी 'पासवर्ड' आणि 'पॅटर्न'चा वापर केला जातो. परंतु, घरातील तिजोरीला लावलेल्या कुलुपाची किल्ली हरवल्यानंतर जशी अवस्था होते, अगदी तशीच अवस्था स्मार्टफोनचा पासवर्ड अथवा पॅटर्न विसरल्यानंतर होत असते.

फोनचा पासवर्ड विसरल्यानंतर महत्त्वाची कामे रखडतात. अनेकदा तर एखाद्या मोबाईल शॉपमध्ये जावून आल्याला फोनचा लॉक तोडावा लागतो. असे करताना फोनमधील सगळा डाटा डिलीट होण्याची शक्यता अधिक असते. परंतु, आता चिंता सोडा, तुम्ही काही खास 'ट्रिक्स'चा वापर करून फोनचा 'पासवर्ड' घरबसल्या रिसेट करून अनलॉक करू शकता. 

पासवर्ड विसल्यानंतर आपला स्मार्टफोन घरबसल्या अनलॉक कसा करावा, याबाबतच्या काही खास 'ट्रिक्स'
जर तुमचा स्मार्टफोन लॉक झाला असेल तर त्याला सगळ्यात आधी शटडाउन अर्थात बंद करून टाका. फोन बंद करण्यासाठी पासवर्डची गरज भासत नाही.

तुमचा फोन बंद करण्‍यासाठीही पासवर्डची गरज पडत असेल तर फोनची बॅटरी काढून फोन बंद करून टाका.

यानंतर 'पॉवर' बटनसोबत व्हॉल्यूम 'अप'चे बटन एकदाच दाबत राहावे. ही स्टेप वेग-वेगळ्या डिवाइसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. काही फोनमध्ये

व्हॉल्यूम 'लो' बटनच्या माध्यमातूनही होते.
उदाहरण..
* नेक्सस 7- व्हॉल्यूम अप+ व्हॉल्यूम डाउन + पॉवर
* सॅमसंग गॅलेक्सी S3- व्हॉल्यूम अप + होम + पॉवर
* मोटोरोला ड्रॉइड- होम + पॉवर

तुमच्या फोनमधील सेटिंग्जबाबत तुम्हाला माहिती नसेल तर 'गूगल'ची मदत घेता येवू शकते.
तुमच्या फोनवर लोगो स्क्रीन दिसत नाही तोपर्यंत ही स्टेप करत राहा. यानंतर पॉवर बटन दाबणे बंद करा. व्हॉल्यूम बटन दाबून ठेवा. असे केल्याने अँड्रॉइड  सिस्टिम रिकव्हरी स्क्रीन डिस्प्ले होईल. या स्टेपबाबत कमी लोकांना माहिती आहे.
अँड्राइड रिकव्हरी सिस्टिम सुरु असताना एक ड्रॉप मेनू येईल. फोनवरील स्क्रीन कॉम्प्यूटरच्या कमांड स्क्रीनसारखी दिसेल. या स्क्रीन पर व्हॉल्यूम बटनच्या
मदतीने 'नेव्हिगेट' करा आणि पॉवर बटनने आपला पर्याय निवडा.
आता स्क्रीनवरील 'रीबूट सिस्टिम रोम' अथवा 'रीसेट फॅक्टरी सेटिंग्स'चा पर्याय निवडा. अनेक फोनमध्ये हा पर्याय 'डिलीट ऑल यूजर डाटा' या नावाने

असतो. त्यानंतर स्क्रीन पर YES अथवा NO असे पर्याय दिसेल. या पैकी YES हा पर्याय निवडावा.

स्मार्टफोनमधील संपूर्ण डाटा रीसेट होण्यास थोडा वेळ लागले. सिस्टिम पूर्ण झाल्यानंतर अँड्रॉइड सिस्टिम रिकव्हरी स्क्रीन पुन्हा एकदा डिस्प्ले होवू लागेल.
आता स्क्रीनवरील 'रीबूट सिस्टिम' हा पर्याय निवडवा. लक्षात ठेवा, चुकूनही अन्य पर्याय निवडू नका. कारण संपूर्ण प्रोसेस पुन्हा नव्याने करावी लागेल.

आता तुमचा फोन नॉर्मल पद्धतीने रीबूट होईल. या फोनमध्ये आता 'पासवर्ड' अथवा 'पॅटर्न' टाकण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे फॅक्टरी सेटिंग्ज नव्याने अँक्टिवेट होईल. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here