Sendriya khat nirmiti udyog
बहुतांश शेतक-यांना खते आणि रसायने यांची जाण असते, जसे की नायट्रोजन आणि फॉस्फरस ज्यामुळे पिकांची चांगली वाढ होते. त्यांना हे देखील माहिती असते की गाईंच्या शेणातून नायट्रोजन मिळते. असे असताना त्या शेतक-यांना त्याच्या जवळ उपलब्ध शेणातून चांगले खते मिळत असेल तर त्याने महागडी खते का वापरावी? खरोखर असा विचार एका शेतक-याने केला.
चार वर्षांपूर्वी, केवळ काही कागदोपत्री माहितीच्या आधारे तामिळनाडूच्या इरोडे जिल्ह्यातील गोबीचेट्टपलायम येथे मायराडा कृषी विज्ञान केंद्रात भारताच्या कृषीक्षेत्रातील जमिनीच्या सुपिकेतेच्या विषयात निष्णात म्हणून ओळखले जाणारे शेतकरी जी आर सक्थिवल यांच्या प्रयत्नातून टाकाऊ पासून उपजाऊ खतांची निर्मिती करण्यात यश आले आहे. सेंद्रीय चळवळीचे खंदे समर्थक असलेले सक्थिवल यांनी नेहमीच उपलब्ध स्त्रोतांचा पुरेपूर वापर कस करता येईल यावर लक्ष दिले, आणि त्यांनी जनावरांच्या शेणाचा योग्य प्रकारे वापर केला जे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
अनेक वर्षांच्या निरिक्षण आणि नियोजनातून, त्यांनी एक योजना तयार केली ज्यात गायींच्या शेणाला आणि मुत्राचा पुनर्वापर करून उपयोगात आणले आहे. त्यासाठी त्यानी चार खणांची एक टाकी तयार केली. प्रथम जनावरांच्या गोठ्यात पडणात मूत्र वाहून एका पाईप मध्ये जमा होईल अशी रचना केली. तेथून ते वाहून एका टाकीत जमा होते. त्यांनतर जमिनीवर पडणारे शेण हाताने उचलण्यात येते. मल-मूत्र यांचे एकत्रित मिश्रण त्यासाठी तयार केलेल्या चार टाक्यातून टप्प्याटप्याने वाहून शुध्द केले जाते. त्यामुळे ते ढवळले जाऊन त्यात रासायनिक प्रकिया सुरू होते त्यातून त्याच्या पोषक तत्वांची गुणवत्ता वाढते. हे मिश्रण ड्रिपच्या माध्यमातून लागवड करण्यात आलेल्या ऊसाच्या शेतीला खत म्हणून पुरविले जाते. शेणाचा उपयोग करून अशा प्रकारे ते वाया जावू दिले जात नाही. ते बायगँस संयंत्रासाठी वापरले जाते,जेथे या टाकाऊ पदार्थातून मिथेन वेगळा केला जातो त्यातून शेतक-यांच्या घरातील चूल पेटवली जाते.
चार-टाकी पध्दतीने गायीचे मल मुत्र आंबविणे आणि शुध्द स्वरुपातील सेंद्रीय खत तयार करणे.
जरी चार टाकी पध्दतीने देशभरातील शेतक-यांचे लक्ष वेधून घेतले आहे, तरी बहुतांश शेतक-यांना ते तयार करणे आर्थिक दृष्ट्या खर्चाचे आहे. या चार टाकी पध्दतीच्या प्रकल्पाला साधने आणि मजुरी धरून ४०हजार रुपया इतका खर्च अपेक्षित आहे. लहान शेती करणा-या शेतक-याला तो परवडणारा नाही, त्यामुळे परिणामत: त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.
अलागेसन, हे चेन्नीमलाई येथील मायलाडीमधील शेतकरी आहेत, त्यांना सोपा आणि स्वस्तातील प्रकल्प तयार करायचा होता, जेणे करून जास्तीत जास्त शेतक-यांना त्यांच्या शेतात तो वापरता यावा. त्यांनी शेण आणि मुत्र यांचे एकत्रीकरण वेगळ्या प्रकारे करण्याचे ठरविले जे करणे पूर्वी खर्चिक होते. त्यांनी एक खणाच्या टाकीचा वापर केला, त्यात सिमेंट वापरले नाही. त्यामुळे मजुरीचा प्रश्न नव्हता, बांधकामाचा प्रश्न नव्हता. त्यांनी मोठी प्लास्टिकची टाकी बसविली.
गायींचे मल-मूत्र एकत्रितपणे २४तास त्यात जमा केले, प्रत्येक एक किलो शेणात चार लिटर गोमूत्र यांचे मिश्रण केले. त्यांनतर हे मिश्रण आंबविण्यासाठी ठेवून दिले. त्यामुळे कमी किमतीत तेच मिश्रण तयार झाले. या सा-या कामाला केवळ आठशे ते हजार रुपयांचा खर्च येतो.
प्लास्टिक बरणी किंवा टाकी लावण्यामुळे दोन प्रकारचे फायदे होतात, सर्वात महत्वाचे म्हणजे ते परवडण्याजोगे आहे. दुसरे आणि महत्वाचे ते वाहून नेणे सहज साध्य आहे. एका जागी केलेल्या टाकीच्या रचनेत शेतक-याला ती सहजपणे वाहून नेण्यात अडचणी असतात. त्याचप्रमाणे टाकीची स्वच्छता करण्यात प्लास्टिक टाकी असल्याने सोपे ठरते.
हे दोनही संशोधक अजूनही या प्रयोगावर संशोधन करत आहेत जेणे करून मोठ्या प्रमाणात हे सेंद्रीय खत जास्तीत जास्त शेतकरी आणि शेतांपर्यत कसे पोहोचविता येईल याचा ते अभ्यास करत आहेत. असे असले तरी इरोडे आणि परिसरातील अधिकांश शेतक-यांनी या सेंद्रीय खतांच्या कारखान्याचा वापर सुरु केला आहे. यासाठी आणखी थोडा काळ जावा लागेल, जेणे करून या वाहून नेण्यास सोप्या असलेल्या खतांच्या फँक्टरी पेरणी आणि इतर नेहमीच्या शेतीच्या कामांइतक्या सहज बनतील.
shendriy khat
sendriya khat in english
sendriya khat information in marathi
sendriya khat
sendriya khat nirmiti udyog
sendriya khat project in marathi
sendriya khat wikipedia
sendriya khat project in marathi pdf
sendriya khat price
sendriya khat company
sendriya khat prakar
sendriya khat nirmiti
sendriya sheti khat
sendriya khate information in marathi
sendriya khat meaning in english
sendriya khat kalachi garaj
सेंद्रिय खत फायदे
sendriya khat photo
sendriya khat project in english
sendriya khat meaning in marathi
sendriya khat images
sendriya khate mahiti
sendriya khat project in marathi download
sendriya khat nirmiti mahiti in marathi
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.