_*असे वापरा BHIM अॅप*_ - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 2, 2017

_*असे वापरा BHIM अॅप*_

_*असे वापरा BHIM अॅप*_

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल व्यवहारांसाठी BHIM हे अॅप लाँच करण्यात आले आहे. भिम अॅप आता तुमची बँक असणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असून त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचे नामकरण केले असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली येथे ‘डिजीधन मेला’ या कार्यक्रमात माहिती दिली. या अॅपचे वैशिष्ट्ये म्हणजे केवळ अंगठा लावून तुम्ही व्यवहार करू शकता.

👉 अँड्रॉईड स्मार्टफोनवर भिम अॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा.

👉 त्यानंतर तुमचे बँक खाते आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अॅप डाऊनलोड करतानाच विचारला जातो

👉 तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल.

👉 मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भिम अॅपचा वापर करता येईल.

👉 इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा अॅपमध्ये आहेत.

👉 भिम अॅपद्वारे युजर्स पैसे पाठवू शकतात, किंवा इतरांकडून मोबाईल नंबरवर घेऊही शकतात.

👉एमएमआयडी किंवा आयएफएससी कोडच्या माध्यमातून नॉन-यूपीआय बँकेच्या ग्राहकांनाही पैसे पाठवता येऊ शकतात.

👉यासाठी अॅपमध्ये इंग्रजी भाषेत सेंड किंवा रिसीव्ह मनी असा पर्याय देण्यात आला आहे.

👉 बँक खात्यातील रक्कम देखील अॅपमध्ये पाहता येईल.

_*कोणत्या बँकाचा आहे समावेश*_ : अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, अक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कॅथोलिक सीरियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, डीसीबी बँक, देना बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडस्लँड बँक, कर्नाटका बँक, करुर बँक, कोटक महिंद्रा बँक, ओरिएंटल बँक, पंजाब नॅशनल बँक, आरबीएल बँक, साऊथ इंडियन बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, यूनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक, या बँका सध्या भिम अपमध्ये उपलब्ध आहेत.
Pls visit youtube for more info by using following link

https://youtu.be/wcOYV_fDYtg

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here