क्रीडा घडामोडी:- २०१६:- महिलांचे ‘विराट’ राज्य


क्रीडा घडामोडी:- २०१६:-
महिलांचे ‘विराट’ राज्य
---------------------------------------
* रिओ ऑलिम्पिक, ट्वेन्टी-२० विश्वचषक, कनिष्ठ हॉकी विश्वचषक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धानी सरते वर्ष क्रीडाप्रेमींच्या स्मरणात राहील. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि कुस्तीपटू साक्षी मलिक तसेच कसोटी कर्णधार विराट कोहली यांनी २०१६ या वर्षांत भारतीयांच्या चेहऱ्यावर स्मित फुलवले.
* कबड्डी, हॉकी, महिला क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, जिम्नॅस्टिक या खेळांमधील भारतीयांची कामगिरी लक्षवेधी ठरली. हे वर्ष महिला खेळाडूंच्या पराक्रमामुळे गाजले. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान राखले. हॉकी संघांनी आपल्या दमदार कामगिरीनिशी आशा उंचावल्या आहेत. तसेच १५ वर्षांनंतर भारताने कनिष्ठ विश्वचषकावर नाव कोरले. कबड्डी आणि कॅरम या खेळांमधील विश्वचषकात भारताचे वर्चस्व अबाधित राहिले.
* ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांच्यामुळे भारताला   दोन पदके.
* भारतात दीपा कर्माकरमुळे जिम्नॅस्टिकला संजीवनी. तर ललिता बाबरची ३००० मीटर स्टीपलेसमध्ये ऐतिहासिक कामगिरी.
* टेनिसपटू सानिया मिर्झासाठी हे स्वप्नवत वर्ष. तर भारतीय महिला क्रिकेट संघाची आशियाई स्पध्रेत मक्तेदारी

बॅडमिंटन:-
------------

* पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिक रौप्यपदकासह इतिहास घडवला. अंतिम मुकाबल्यात कॅरोलिन मारिनने तिला नमवले.
* ऑलिम्पिक स्पध्रेत पदक पटकावणारी सायनानंतर ती दुसरी भारतीय बॅडिमटनपटू तर रौप्यपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली.  * सिंधूने चीन सुपर सीरिज जेतेपद जिंकले  सुपर सीरिज दर्जाच्या स्पध्रेचे सिंधूचे पहिलेच जेतेपद ठरले.  
* सायना नेहवालला यंदाच्या वर्षांत गुडघ्याच्या दुखापतीने सतावले. मात्र तिने केलेले पुनरागमन संस्मरणीय ठरले. समीर वर्माने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार प्रदर्शनासह छाप उमटवली.

कुस्ती:-
--------
* साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत देशाला यंदाच्या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.
* भारताला ऑलिम्पिकमध्ये या खेळात पदक मिळवून देणारी ती पहिली महिला ठरली.
* उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे नरसिंग यादवला रिओहून एकही लढत न खेळता मायदेशी परतावे लागले.

जिम्नॅस्टिक्स:-
----------------
* रिओ ऑलिम्पिकमध्ये यंदा सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते त्रिपुराच्या २३ वर्षीय जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरने. महिलांच्या व्हॉल्ट प्रकारातील अंतिम फेरीत फक्त ०.१५० गुणांनी तिचे कांस्यपदक हुकले.  
* तिने सर्वात आव्हानात्मक असा प्रोडय़ुनोव्हा प्रकार सादर करण्याची जोखीम पत्करली होती. ऑलिम्किपमध्ये पात्र ठरलेली ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्टिकपटू. याचप्रमाणे ५२ वर्षांनंतर प्रथमच भारतीय खेळाडू ऑलिम्पिक जिम्नॅस्टिकमध्ये प्रतिनिधित्व करीत होता.
* तिच्या या वैशिष्टय़पूर्ण पराक्रमाबद्दल क्रीडा मंत्रालयाने तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान केला. तिचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला.

क्रिकेट:-
----------
*भारतीय क्रिकेटसाठी हे वर्ष विराट कोहलीमय होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने सलग १८ सामन्यांपैकी एकही सामना गमावला नाही.
* कोहलीची तीन द्विशतके आणि आर. अश्विनची भेदक फिरकी गोलंदाजी हे या वर्षांचे वैशिष्टय़ ठरले.
* करुण नायरने भारताचा दुसरा त्रिशतकवीर होण्याचा मान पटकावला. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी समाधानकारक राहिली. त्याचबरोबर भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारत अनुक्रमे तिसऱ्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. याचशिवाय सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींमुळे बीसीसीआय आणि त्यांच्या संलग्न संघटनांवरील फासे आवळले गेले आहेत. महिला क्रिकेटपटूंनीही आशिया चषक उंचावून सलग सहाव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली.

अ‍‍ॅथलेटिक्स:-
------------
*ललिता बाबरने तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवत मोठय़ा अपेक्षा निर्माण केल्या होत्या. परंतु तिला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अन्य खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रकारांमध्ये पहिल्या २० क्रमांकांमध्येही स्थान मिळविता आले नाही. त्या तुलनेत पॅरालिम्पिकमध्ये देवेंद्र झांझरिया (भालाफेक-सुवर्ण), मरिय्यप्पन थांगवेलु (उंच उडी-सुवर्ण), वरुणसिंग भाटी (उंच उडी-कांस्य), दीपा मलिक (गोळाफेक-रौप्य) यांनी पदकांची कमाई करीत सुदृढ खेळाडूंनी आदर्श घ्यावा अशीच कामगिरी केली.

टेनिस:-
-------
* सानिया मिर्झाने जागतिक टेनिसमधील दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. सानिया आणि मार्टनिा िहगीस जोडीने ८ जेतेपदांची कमाई केली. यामध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम जेतेपदाचा समावेश आहे. सलग ४१ विजयाची मालिका खंडित झाल्यावर काही दिवसांतच या दोघींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Post a Comment

0 Comments