अपमानाचा बदला ९३०० कोटी रुपये मोजून... - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 25, 2017

अपमानाचा बदला ९३०० कोटी रुपये मोजून...

अपमानाचा बदला ९३०० कोटी रुपये मोजून...
--------------------------------------
ही घटना प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याशी संबंधित आहे. रतन टाटा यांनी अपमानाचा बदला जग्वार कंपनी खरेदी करून घेतला होता. टाटा यांनी जग्वार कंपनीसाठी सुमारे 9300 कोटी रुपये मोजले होते.

रतन टाटा यांनी अपमानाचा बदला घेण्याच्या उद्देशाने जग्वार कंपनी खरेदी केल्याचे त्यांचे निकटवर्तीय प्रवीण काडले यांनी सांगितली. ही घटना मुंबईतील आहे. रतन टाटांना चव्हाण पुरस्कार यांना जाहीर झाला होता. टाटांचे प्रतिनिधीत्त्व करत प्रवीण काडले यांनी हा पुरस्कार स्विकारला होता. यावेळी काडले यांनी एक किस्सा सांगितला तो असा...

सामान्य व्यक्ति जास्त आक्रमक असतो, असे म्हटले जाते. कारण, तो अपमानाचा बदला तत्काळ घेत असतो. परंतु,एखादा प्रतिष्ठीत व्यक्ति फार संयमी असतो. तो ‍अपमानाचा विजयासाठी साधन म्हणून वापर करत असतो. आणि तेच रतन टाटा यांनी केले होते.

रतन टाटा यांनी 1998 मध्ये हॅचबॅक कार इंडिका बाजारात उतरवली होती. परंतु, कार बाजारात येऊन एक वर्ष झाले तरी ग्राहक तिच्याकडे पाहात नसल्याचे दिसले. तेव्हा काही लोकांनी टाटांना कार डिव्हिजन विक्री करण्‍याचा सल्ला दिला. त्याला टाटांनी देखील होकार दिला. अनेक कंपन्यांशी संपर्क करण्‍यात आला. त्यात अमेरिकन कंपनी फोर्डने उत्सुकता दर्शवली. फोर्डचे अधिकारी टाटा मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये आले. सर्व चर्चा झाल्यानंतर टाटाच्या अधिकार्‍यांना फोर्ड हेडक्वॉर्टर डेट्रॉयटला बोलवण्यात आले.

रतन टाटा यांच्यासोबत काडले हे देखील डेट्रायट येथे गेले होते. दोन्ही कंपन्यांच्या अधिकार्‍यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. परंतु, फोर्डच्या अधिकार्‍यांनी वर्तवणूक ही अपमानजनक होती. 'तुम्हाला कार विषयी माहिती नाही तर बिझनेस का सुरु केला. कंपनी खरेदी करून आम्ही तुमच्यावर एक प्रकारे उपकारच करत आहोत.' असे म्हणत फोर्ड चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना अपमानीत केले. रतन टाटांना याचे मोठे दु:ख झाले होते. परंतु त्यांनी ते दाखवले नाही. त्यांनी डेट्रॉइट हून न्यूयॉर्कला येण्याच्या निर्णय घेतला. 90 मिनिटांच्या प्रवासांत रतन टाटा हे नाराज दिसत होते.

या घटनेच्या नऊ वर्षांनी 2008 मध्ये फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर पोहोचली होती. अमेरिकेतील ऑटो हब डेट्रॉयटची आर्थिक स्थिती देखील दिवसेंदिवस खराब होत होती. तेव्हा टाटा यांनी फोर्ड कंपनीचा लक्झरी ब्रँड जग्वार लॅण्ड रोव्हर (जेएलआर) खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 'फोर्ड'चे अधिकारी चर्चा करण्यासाठी बॉम्बे हाऊसमध्ये पोहोचले. सौदा 2.3 अब्ज डॉलर (जवळपास 9300 कोटी रुपये) मध्ये ठरला. तेव्हा फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड हे रतन टाटा यांना म्हटले, ‘जेएलआर खरेदी करून तुम्ही आमच्यावर मोठे उपकार केले आहेत.’ आणि हाच रतन टाटांचा विजय होता. दरम्यान, त्याकाळात जेएलआर तोटात होती. मात्र, काही वर्षातच टाटा जेएलआरने तोटा भरुन काढला होता.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here