युवराज सिंग देत आहे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसा, तुम्हीही घ्या लाभ - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 26, 2017

युवराज सिंग देत आहे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसा, तुम्हीही घ्या लाभ

युवराज सिंग देत आहे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसा, तुम्हीही घ्या लाभ
----------------------------------------

नवी दिल्ली- तुम्हाला स्वत:चा व्यवसाय सुरु कारायचा आहे, परंतु पैश्याच्या अडचनीमुळे थांबला आहात, तर आता तुमची चिंता दुर होणार आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावरिल धुरंदर फलंदाज युवराज सिंगने तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. क्रिकेटच्या मैदानावर 6 सिक्सर मारणाऱ्या युवराज सिंगने मृत्युला आउट करुन परतल्यानंतर आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

तुम्ही सुरु करत असलेल्या व्यवसायाला युवराज सिंग भांडवल उपलब्ध करुन देणार आहे. त्याचबरोबर तुमच्या व्यावसायाच्या कल्पनेला देखिल एक वेगळी ओळख मिळवून देणार आहे. 2011 मध्ये कॅन्सरच्या आजारार मात करुन परतलेल्या युवराजने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याच बरोबर त्याने तरुण व्यवसायिकांना मदत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी त्याने युवीकॅन वेन्चर्स (http://www.youwecanventures.com) नावाने एक कंपनी स्थापन केली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही कंपनी तुमच्या व्यावसायाला कशा पद्धतीने मदत करेल.

युवराजने कधी केली सुरुवात...

कॅन्सरच्या आजारावर मात करुन परतल्यानंतर युवराज सिंगने आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. तरुण व्यावसायिकांना मदत करण्याचा निर्णय युवराजने घेतला आहे. ज्या तरुणांकडे आयडिया आहे, जिद्द आहे परंतु पैसा किंवा इतर सपोर्ट नसल्याने ते आपल्या स्वप्नांपासून दुर आहेत, अशा तरुणांसाठी युवराजने युवीकॅन वेंचर्स नावाने कंपनीची स्थापना केली आहे.

काय करते युवराजची कंपनी...

जर तुमच्याकडे एखादी आयडिया असेल आणि तुम्हाला ती वास्तावात उतरवायची असेल तर युवराज तुम्हाला मदत करु शकतो. युवराज तुम्हाला ब्रॅन्ड मार्केटिंग स्ट्रेंथ, टेक्नॉलॉजी टीम आणि आर्थिक मदत देऊ शकतो. जागतिक दर्जाचे ब्रॅन्ड पुमा, रिबॉक, हीरो मोटार्स यासारख्या कंपन्याशी युवराज असोसिएट्स आहे आणि तुमचा व्यावसाय सुरु करण्यासाठी युवराजचे हे सर्व असोसिएट्स पैसा गुतवू शकतात.

काय मदत मिळणार....

युवीकॅनच्या मध्यामतून व्यवसायासाठी अशाप्रकारे मदत करण्यात येत.

सीड भांडवल
टेक्नॉलॉजी सल्लागार
फायनन्सिअल सल्लागार
ब्रॅन्डिंग, मार्केटिंग आणि पीआरसाठी ही कंपनी काम करणार आहे.

अर्ज कसा करणार....

जर तुम्हाला स्वत:च्या व्यावसायाची कल्पना वास्तावात उतरवायची असेल तर तुमचा अर्ज proposal@youwecanventures.com येथे पाठवू शकता. युवराज आणि त्याची टीम तुमच्या अर्जाची छाननी करतील आणि तुमच्या व्यवसायाची कल्पना आवडल्यास तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

फेसबुक पेज
http://www.facebook.com/YouWeCanVentures

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here