खुशखबर, ९९९ रुपयांत ४जी फोन देणार रिलायन्स जिओ

खुशखबर, ९९९ रुपयांत ४जी फोन देणार रिलायन्स जिओ

नवी दिल्ली : गेल्या वर्षी फ्री व्हॉईस कॉलिंग तसेच फ्री डेटा ऑफर आणून टेलिकॉम मार्केटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओ आता कमी किंमतीत नवा ४जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. 

या महिन्याच्या तिमाहीत कंपनी ९९९ ते १५०० रुपयांच्या दरम्यानचा नवा हँडसेट लाँच करु शकतात. या हँडसेटमुळे स्मार्टफोन बाजारात मोठा धमाका होईल असे तज्ञांचे मत आहे. 

सप्टेंबरमध्ये जिओने फ्रीमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि डेटाची ऑफर आणली होती. ही ऑफर सुरु झाल्यानंतर हातोहात जिओचे सिम विकले गेले. सुरुवातीला ही ऑफर डिसेंबरपर्यंत होती. मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता ही ऑफर मार्चपर्यंत वाढवण्यात आलीये. 

त्यामुळे रिलायन्स जिओच्या नव्या कमी किंमतीतील स्मार्टफोनला यूझर पसंती दर्शवतील अशी आशा व्यक्त केली जातेय. यामुळे इतर स्मार्टफोन कंपन्यांसाठी मोठी स्पर्धाही निर्माण होईल. 

Post a Comment

0 Comments