स्पर्धा मार्गदर्शन वर्ग:

स्पर्धा मार्गदर्शन वर्ग:
चिंतन, त्याचा अभ्यास करा. तरच तुमच्यातून कर्तव्य फुलून येईल. माझ्या मते, युवकांसाठी हे ‘परफेक्ट सोल्युशन’ आहे.

मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा विवेकानंदांना सहजपणानं जन्मजात गुरू मानलं. देशाच्या त्या वेळच्या लोकसंख्येमध्ये असा विचार करणारे जेवढे असतील, तेवढंच प्रमाण आजही असावं.

आजचं युग विज्ञानाचं आहे. स्वामीजींनी मांडलेला अध्यात्म विचार हा विज्ञाननिष्ठच आहे. जाणारा प्रत्येक दिवस विज्ञानाची होणारी प्रगती आपल्याला अध्यात्माकडं घेऊन जाते. अध्यात्म आणि विज्ञान यांच्यात फरक, द्वैत अजिबातच नाही. स्वामीजी युवकांना सांगतात की, मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका. स्वतंत्र विचार करा. कोणीही काहीही सांगत असलं, तरी तुमच्या स्वतंत्र विचारांना जे पटतंय तेच करा. यामध्ये पुन्हा बुद्धिनिष्ठा, विवेकनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा येते. त्याचवेळेला आत्मविश्‍वासही येतो. स्वतंत्र विचार करूनच मी ज्या मुक्कामाला पोहोचलो त्या मुक्कामाला पोहोचणार आहात, याचा अर्थ प्रतिभेची जोपासना हाही विचार यामध्ये दिसतो.

9/11 हा आजच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस. अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला. त्या दिवशीची दृश्यं पाहून मला आठवले स्वामीजी. स्वामीजींचं शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतील  6 मिनिटांचं भाषण, जिथं त्यांनी इंग्रजीमधून हिंदू धर्म जगाला समजावून सांगितला. ती तारीख होती 11 सप्टेंबर 1893 आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याची तारीख होती 11 सप्टेंबर 2001. मला तेव्हापासून वाटत आलं आहे की, नव्या जगाला एक शीर्षक द्यायचं झालं, तर स्वामी विवेकानंद विरुद्ध ओसामा बिन लादेन. दोन 9/11 चा हा संघर्ष आहे. आपण त्यातील कोणत्या बाजूचे सैनिक, हे निश्‍चित आहे. जिथे अध्यात्म, जिथे वेदांतांच्या विचारांचा परिपोष होतो आणि तो वेदांत म्हणजे माणसामाणसात जाती-पातीत भिंती उभा करणारा नाही, तर ईश्‍वर सर्वत्र भरलेला आहे आणि आपलं जगणं याचा अर्थ तो ईश्‍वर व्यक्त करायचा आहे, सर्व धर्मांचा-विचारधारांचा समान आदर आहे. कुणावरच ईश्‍वर मानण्याचीही सक्ती नाही. कारण, आपण सर्व अंती एकाच मुक्कामावर पोहोचणार आहोत. तो वेदांत. तो पाया मानतो तो हिंदू धर्म. तोच भारताच्या राष्ट्रीयत्वाचा आधार, हे स्वामीजींनी जागतिक परिषदेत जाहीर केलं आणि तोच आजच्या आणि उद्याच्या विश्‍वबंधुत्वाचाही आधार आहे.

-  अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

Post a Comment

0 Comments