* शेअर बाजारात नुकसान होण्याची कारणे व चुका *

* शेअर बाजारात नुकसान होण्याची कारणे व चुका *


1) शेअर खरेदी करण्यापुर्वी टेक्निकल व फंडामेंटलची व्यवस्थित माहीतगार व्यक्तिकडुन अभ्यासाचा सराव न करणे, खरेदी केल्यानंतर चुकीचे सल्लागार शोधत राहाणे व चुकीचे मोफत शंभर लोकांकडुन सल्ला मसलत करणे.

2) स्वत: चे गुरु स्वत: बनुन चुकीचे अनुमान लावुन शेअर बाजारात सुसाट व मोकाट सुरवात करणे.

3) बरेच प्रकारचे शेअरस खरेदी करुन ठेवायचे. योग्य दिशेने चाललेले शेअरस मध्ये लवकर profit book करुन, चुकीच्या दिशेने चालेल्या शेअरस मध्ये average करत राहुन छोटा profit व मोठा loss करत राहाणे.

4)  चुकीच्या tips व बाहरील चुकीच्या बातम्या बघुन निर्णय घेवुन गुंतवणुक करणे.

5)शेअर बाजाराची चढ व उतार पाहुन मानसिक संतुलन बिघडवुन घाईने निर्णय घेवुन वारंवार विनाकारण loss book करणे.

6) कमी कीमंतीचा व पडणारा शेअरस खरेदी करून, कुवती पेक्षा जास्त ( कर्जाउ रक्कमेने ) शेअरस खरेदी करणे.

7) वेळेचे,नियमांचे व पैसाचे कोणतेही बंधन न ठेवता गुंतवणुक करणे.

8)स्वत:ला काय वाटते हे मत ठरवुन, भावना प्रधान होवुन सर्व नियम पायधुळी मिळवुन काम करणे.

9) गुंतवणुक केलेल्या रक्कमेची समान स्वरुपात विभागणी न करता सैरावैरा कशीही गुंतवणूक करणे व profit booking. करतानाही मनाला वाटेल तशी कशीही विभागणी न करता book करणे.

Post a Comment

0 Comments