शिक्षणातला अंतिम निकष कोणता ? ______ - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 12, 2017

शिक्षणातला अंतिम निकष कोणता ? ______

शिक्षणातला अंतिम निकष कोणता ? ___________________________
एकदा आमचे असेच एक इंग्रजी शिक्षकांचे प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक आले होते.आम्ही दिवसभर व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे ?स्पेलिंग पाठ करावेत की नाही ? कविता कशी शिकवायची ?अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे ?याचा काथ्याकूट आम्ही दिवसभर करीत होतो.संध्याकाळी ५ वाजले.सर्वांना जाण्याची घाई होती.आम्ही उठू लागताच ते निवृत्त शिक्षक बोलायला उठले आणि म्हणाले मी फक्त ३ मिनीट बोलणार आहे .वैतागाने सारे खाली बसले. ते शिक्षक म्हणाले की दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली.तुम्ही शिकवण्याच्या काही पद्धती नक्की केल्या आहेत पण मी एक छोटे उदाहरण सांगतो ते जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल.आम्ही आता आणखी काय उपदेश ऐकायचा अशा भावनेने ऐकत राहिलो. ते म्हणाले की एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे.तिथे एक आदिवासी नवरा बायको राहतात. त्यांना एक ६ महिन्याचं मूल आहे.आजूबाजूला एक ही घर नाही. एकदा संध्याकाळी नवर्‍याला  अचानक गावाला जावे लागले . पत्नी आणि मूल एकटेच आहेत.रात्री दोघे झोपले आणि अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले. ती आई घाबरून जाईल पण नातर ती  तर ती आई काय करेल ? सांगा ना काय करेल ? ते आम्हाला विचारू लागले . आम्ही सारे शांत झालो.                 कुणीच काही बोलेना. ते शिक्षक आम्हाला विचारू लागले की  ती बालमानसशास्त्राची पुस्तके उघडून पाहिलं का ? की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहिलं का ?सांगा ना काय करेल ?  आम्हाला मुद्दा कळाला. ते  किंचित हसले आणि पुढे म्हणाले ती यातले काहीच करणार नाही. ती तिला सुचेल ते करीन. ती त्याला कडेवर घेईन .छातीशी कवटाळेल..  त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल त्याच्यापुढे नाचून दाखवीन. गाणी म्हणेल.त्याला दूध पाजीन.त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविन. हे सारं सारं ती तिथपर्यंत करीन की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही.
                      ते पुढे म्हणाले की सारे  ती  का करीन ? हे तिला सारे का सुचेल ? कारण ते तिचे मूल आहे म्हणून. त्या शिक्षकाने क्षणभर सगळीकडे बघितले बोलताना क्षणभर थांबले आणि म्हणाले की त्या बाईसारखे तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का ? तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल तर माझ्या मित्रांनो तुम्ही जे काही वर्गात कराल,तेच उपक्रम असतील,तीच अध्यापनाची पद्धती असेल. तुम्ही हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल आणि तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल. यापलीकडे शिक्षण नावाचे काहीही नसते ....आणि ते शिक्षक शांतपणे खाली  बसले.
आम्ही थक्क झालो.  सुन्न झालो
(शिक्षकांसाठी साने गुरुजी या हेरंब कुलकर्णी यांच्या साधना प्रकाशनाच्या आगामी पुस्तकातून )

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here