business woman of india: Sayuja Shrinivas - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 16, 2017

business woman of india: Sayuja Shrinivas

Business woman of india: Sayuja Shrinivas

तिला मॉलमधून बाहेर फेकण्यात आले आणि फेसबुकवर ब्लॉक झाली : सायुज्याच्या स्टार्टअपची कहाणी


तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही; जोवर तुम्ही टोकाचा विरोध म्हणजे काय असतो ते सायुज्या श्रीनिवास याना भेटून जाणून घेणार नाही.बहुतांश लोक त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी सहजपणे मार्ग शोधतात, जरी जगाने म्हटले की ही तुमची जागा नाही तर दुसरीकडे जातात. परंतू तिला मात्र दूर ढकलण्यात आले इतके की तो तिच्या जीवनाचा दुसरा अध्याय ठरला.

बहुतांश संघर्षरत उद्यमींना त्यांच्या ध्येयांच्या पूर्तीसाठी अशा प्रकारच्या अनुभवांचा सामना करावा लागतो, जणू काही ते आवश्यक असते की त्यांचे हात अशा वाईट अनुभवांनी रंगलेच पाहिजेत. परंतू त्यांनी सर्वेक्षण केले, नमूने वाटले, दारोदार जावून विचारणा केली, आणि काहीच झाले नाही, त्यांनतर त्या थांबल्या परंतू त्याचवेळी जेंव्हा त्यांच्या या प्रयत्नातून व्यवसाय उभा राहिला. ब-याच महिला जेंव्हा अशा प्रकारच्या अनुभवातून जात असतात त्यावेळी त्याच्यातील जिद्द चिकाटी आणि हुशारी यांचा कस लागत असतो. त्यांच्या छंदाबद्दल प्रश्न विचारले जातात, आणि तरीही त्यांच्या छंदाला आदराने पाहिले जाईलच यांची शाश्वती नसते. तरीही पुन्हा, अनेक उद्यमी म्हणजे २४ वर्षीय सायुज्या नसतात.

,सायुज्या यांची धैर्यशिलता

धाडसी अभियंता सायुज्या या उद्यमी जगताकडे त्यांच्या चुलत भावंडामुळे वळल्या त्यांच्या महाविद्यालयीन काळातील रिमोट होता तो, ज्याने त्यावेळी एक स्टार्टअप सुरु केले होते. परंतू त्यांनी मात्र संधी मिळाली म्हणून टाटा स्टिल जमशेदपूर, ओरिसा येथे व्यवस्थापक म्हणून नोकरी करणे पसंत केले. परंतू ज्या ठिकाणी त्या गेल्या होत्या तेथून त्यांना परतावे लागले. सायुज्या यांच्या मनात फॅशन रेंटल स्टार्टअप करण्याचा विचार आला. लिबे रेंट एका हॉलिवूड सिनेमातून ही संकल्पना सुचली, ही संकल्पना चांगलीच परिपक्व आहे आणि जगभरात मान्यता पावली आहे.

“ मला खात्री होती की अशा प्रकारची सेवा सुरु केली तर, मला त्याचा उपयोग होईल. त्यावेळी अशा प्रकारचे फार काही स्टार्टअप भारतात नव्हते. मात्र काही मॉम आणि पॉप चे शोरुम देशभरात होते” त्या म्हणाल्या.

परंतू त्याचवेळी, जग त्यांना हे देखील सांगत होते की केवळ कल्पना असून चालत नाही, त्या महिला असल्याने त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने ब-याच काही गोष्टींचा विचार करावा लागणार होता. “ माझ्या मनातील चिंता समाजातील अडथळ्यांबाबतच्या होत्या, ज्या मी नेहमी काम करताना अनुभवल्या होत्या. मात्र मला काही प्रमाणात कंपनीचे काम करण्याचे स्वातंत्र्य होते.” त्या म्हणाल्या.

हे अडथळे त्यांना घरातही आले. “ वर्षभर काम करताना मी स्वत:ची तयारी केली, अर्थकारण शिकले, इत्यादी. आणि डिझायनर, ड्राय क्लिनर्स सोबत काम करण्यास सुरुवात केली. पण एका मध्यमवर्गीय रुढीप्रिय घरातील मुलगी म्हणून मला अशा प्रकारच्या धोकादायक काही गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली. मी माझ्या आई वडिलांना न सांगताच बाहेर पडले. मला स्टार्टअप करायचे होते आणि मी ते केले होते.” त्या सांगतात.‘वेगळे पडल्याची भावना’

त्यांनी दूर चेन्नईला आपल्या कल्पनेनुसार काम सुरु केले, एकटीनेच, पैसे नसताना. ब-याच महिलांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्वेक्षण झाल्यावर आणि मॉलमध्ये देखील पाहणी केल्यावर आणि पुन्हा पुन्हा धुडकावून लावल्यानंतर काही गोष्टीवर त्यांचे मत तयार होवू लागले. सायुज्या यांनी पहिले पाऊल उचलले आणि फेसबूक पेज सुरु केले. त्यांना त्यांनी डिझाईन केलेले कपडे वापरण्यासाठी काही मैत्रिणी मिळाल्या, त्यांच्या कडून छायाचित्रे घेतली आणि त्याच्या याद्या तयार केल्या.

त्यांना अन्य शहरातूनही विचारणा होवू लागल्या, पण त्या स्वत:च डिलीवरी करत होत्या त्यामुळे त्यांनी केवळ चेन्नई मधील महिलांचे काम सुरु केले. “पंरतू हे करताना महिलांच्या ब-याच गरजांची मला माहिती मिळत होती. मी महिलांना चेन्नईतून माहिती आणि संदेश देणे सुरु केले. दहा मधल्या एखादीचे उत्तर येत असे तरीही. शेवटी मी एकटीच होते, सर्व मुलींशी फेसबूक वरून संपर्कात होते आणि मी फेसबुक मध्ये काही काळ अडकून पडले”. त्या हसून पुढे सांगतात. “पण माझ्याकडे चांगले प्रोफाईल होते त्यामुळे महिला मला संपर्क करत होत्या. आणि काहीनी कळविले नाही त्यामुळे माझे फेसबुक अकाउंट वाचले होते”.

‘लिबे रेंट’ अर्थात भाड्याने देणे अशी संकल्पना होती. महीनो न महिन्याच्या सवयीने आणि प्रायोगिक चुकांच्या नंतर शिकत आणि संकल्पना मांडत शेवटी ऑगस्ट २०१४मध्ये त्यांनी एक ढाचा तयार केला ज्यावर त्या त्यांच्या नाविन्यपूर्ण डिझाइन्स घाऊक किमतीसह मांडू लागल्या. आणि घावूक दराच्या दहा टक्के दराने त्या भाड्याने देवू लागल्या. त्यासाठी अनामत काही नव्हती. त्यांनी त्यांची वाहतूक आणि धुलाईसाठी बाहेरच्यांची मदत घेतली.

आधी सुरुवात केल्याचा फायदा

सध्या, लिबेरेंट हे बंगळुरूमधील तीन तासात डिलीवरी करणारे एकमेव भाडोत्री फॅशन रेंटल स्टार्टअप आहे. तर चेन्नई आणि हैद्राबादमध्ये बारा तासात डिलीवरी करणारे आणि पुणे आणि मुंबईत २४ तासात डिलीवरी करणारे. ज्यांच्याकडे पुरेसे आणि सक्षम वाहतूक पर्याय आणि नेटवर्क आहेत आणि वेगाने डिलीवरी करु शकते.

कंपनी घरी ट्रायल पाहण्याचा पर्याय देखील देते, ज्यावेळी महिला तीन वेगवेगळ्या वस्त्रांची निवड करतात त्यावेळी त्यांना घरी त्याचे प्रयोग करून पाहण्याचे पर्याय आहेत, आणि त्यातील एक त्या भाड्याने कार्यक्रमासाठी घेवू शकतात. संकेतस्थळावर वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यायांची सुविधा देण्यात आली आहे जसे की लहान, मध्यम, मोठे इत्यादी. एकदा की त्यांनी कपडा निवडला की त्यांना त्यांचा आकार सांगावा लागतो. लिबेरेंट त्यानुसार त्यात बदल करून ते रवाना करते.

“ ही अशी जागा आहे ज्यात तंत्रज्ञान खूप उपयोगी पडते. नव्या शोधक प्रकारच्या उद्योगात ब-याच अडचणी असतात, जेंव्हा कपडे वेगवेगळ्या मापाच्या व्यक्तिना, सांगतील त्या तारखेला, त्यावेळी वापरता येण्याजोगे करायचे असतात. जे सारेकाही इ कॉमर्स संकेतस्थळावरून केले जाते.” त्या सांगतात.

त्यांच्या ग्राहकांची घासाघीस चोविस तास सुरु असते. अशा महिलांकडून दिवसाच्या कोणत्याही वेळी सूचनाची देवाण-घेवाण, स्टाइलबाबत टिप्स इ. सुरु असते. “ आम्ही त्यांना अधिक चाणाक्षपणाने सेवा देत असतो, त्या ग्राहकांची हवे असलेले आकार, खर्चाची मर्यादा इत्यादी आणि त्यानुसार सूचना करायच्या असतात ज्या आमचे भविष्य असते”.सायुज्या सांगतात.

विस्ताराचे स्वातंत्र्य

जाने.२०१६मध्ये लिबेरेंट चा विस्तार दोन गुंतवणुकदारांपासून सुरु झाला, रवी मंथा आणि संगिता काथीवाडा. “मी हा विस्तार एकटी महिला संस्थापक आणि तिच्या समोरची आव्हाने म्हणून पाहते. ज्यावेळी मी निधी उभारण्यास सुरुवात केली त्यावेळी मी २२ वर्षांची मुलगी होते. मला माझ्या कामातून त्यांना सिध्द करुन द्यायचे होते की, मी या उद्योगात खूप मोठ्या कालावधीसाठी काम करणार आहे” त्या सांगतात.

एक महिला म्हणून असलेल्या आव्हांनाना त्यांना तोंड द्यावे लागले असल्याचे त्या सांगतात. त्याच्या कॉन्फरन्स रुम मध्ये, दालनात आणि त्या ज्या समाजात आहेत त्या व्यवस्थेत. “ मी माझ्या सहकारींसोबत या सा-या अडचणींना सामोरी जात असते- कारण, समाजात रात्री उशीरा पर्यंत पुरुषांसोबत काम करणा-या महिलांबाबत लोक काय समजतात? त्याही पेक्षा लोक विचार करतात की, मुलींना तंत्रज्ञानाबाबत काहीच समजत नाही. माझ्याकडे एक शिकावू आहे जो माझे काहीच ऐकत नाही कारण त्याला मी त्या योग्यतेची वाटत नाही.” त्या सांगतात.

त्यांनी भार वाटून घ्यावा म्हणून सह भागीदाराचा शोध सुरु केला. जी कठीण बाब होती. शेवटी फेब्रूवारी २०१६मध्ये त्यांनी अभिषेक मोरे यांच्यासोबत कामाची वाटणी करुन घेतली. ते बीआयटी मधून २०१२मध्ये पदवी घेतलेले आहेत. ते सीए कडे काम करत होते. त्यांनी या आव्हानांसाठी होकार दिला. आणि मान्य केले की सायुज्या सांगतील त्या दिशेने त्या पध्दतीने ते काम करण्यास तयार आहेत.

टिकून राहणारे

सध्या, ते ३० टक्के दराने वृध्दी करत आहेत. “ आमच्या उदयोगाचे गणित सध्या जुळले आहे, आणि आम्ही चार पाच कपड्यातून नफा मिळवत आहोत.” त्या सांगतात.

वृध्दिचा वेग नेहमी त्यावेळी मंदावतो ज्यावळी ‘निलाजरे रटाळ ग्राहक असतात’ “ आम्ही बाहेर पडलो आणि बंद पडणा-या कंपन्याकडून काही गोष्टी शिकलो, आम्ही बाजारपेठीय पध्दतींचा अवलंब केला त्याच प्रकारच्या ग्राहकांशी संबंध प्रस्थापित केला त्यामुळे आम्हाला त्यांना शिकवत बसावे लागत नाही. आम्ही त्यांना इतकेच सांगतो की, आम्हाला जमणार नाही” त्या म्हणाल्या.

वृध्दीमधील दुसरा अडसर असा की, जो आत आणि बाहेरही असतो. “माझ्या जवळ सर्वच ग्राहकांचे क्रमांक आणि व्हॉटस अप क्रमांक असतात आणि आम्ही ज्यावेळी संपर्क करतो त्यावेळी ते प्रतिसाद देतात. आमच्या संकेतस्थळावर तुम्हाला आमच्या ग्राहकांची छायाचित्र् मिळतील आणि मॉडेल्सची चित्र दिसणार नाहीत. काही आमच्यासाठी समूह संपर्क माध्यमातून मार्केटिंग करतात. अगदी मोफत. ते आम्हाला मदत करु इच्छितात आणि प्रेम करतात म्हणून”. त्या सांगतात.

बाजाराचे अवलोकन

भारतातील फॅशन बाजार २५ दशलक्ष डॉलर्सचा आहे. ज्यात अतिउच्च फॅशनचा वाटा एक तृतियांश आहे. फॅशन रेंटल स्टार्टअपची कामगिरी गेल्या तीन वर्षात चांगली झाली आहे. जसे की फ्लायरोब, ब्लिंग, व्रँप्ड, इत्यादी त्यापैकी काही आहेत. तर काही ब्लिंग सारख्या उद्योगात अनुपम मित्तल, जे पिपल समुहाचे संस्थापक आणि मुख्यकार्यकारी आहेत, त्यांच्या सारख्यांनी यावर्षी मे महिन्यात गुंतवणूक केली आहे. काहीना अद्याप मार्ग मिळत नाही, जसे की, क्लोझी ज्यांनी गुंतवणूक झाल्यावरही सहाच महिन्यात व्यवसाय बंद केला. “ या उद्योगात सामावून घेण्याची क्षमता खूप मोठी आहे आणि येत्या दहा वर्षात फॅशन रेंटल हा मुख्यप्रवाहात सामील होईल.” त्या शेवटी म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here