बोधकथा - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 12, 2017

बोधकथा


                         *बोधकथा*
       
   " खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा बनारसचा राजा दुसऱ्या राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपती लुटून त्याचे राज्यही कबजा करतो . युद्धातून आणलेली सर्व संपत्ती तो पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या आपल्या बागेत पुरून टाकतो. या युद्धाच्या धामधुमीत पराभूत राजाचा राजकुमार स्वतःची सुटका करून घेतो आणि तो तेथून पळून जातो. विजेत्या राजाने त्याला कधीच पाहिलेले नसते.
राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि बनारसच्या राजाला भेटायला जाण्याचे निर्णय घेतो. तो आणि त्याचे अनुयायी बनारसच्या राजाकडे जातात. बनारसचा राजा त्याचे तेज:पुंज रूप पाहून त्याला चांगला पाहुणचार करतो त्याला राजेशाही वागणूक देतो.
तो संन्यासी त्याच्या जादूच्या मंत्राच्या शक्तीने खजिना कोठे पुरून ठेवला आहे हे शोधून काढतो. तो त्याला राजवाड्याच्या आवारातील बागेत सापडतो, लवकरच ते सारे धन घेऊन तेथून पळून जातो. जेव्हा बनारसच्या राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते. त्याला खूप दु:ख होते.
तेव्हा त्याचा प्रधान त्याला म्हणतो महाराज आपण का दु:खी होता, जी संपत्ती तुमची कधी नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दु:ख बाळगत आहात? बनारसच्या राजाला सत्य उमगते. राजा दुखातून बाहेर पडतो.

*तात्पर्य - करावे तसे भरावे.*

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here