mudra loan Yojna: मुद्रा कर्ज समज, वास्तव आणि प्रत्यक्ष लाभ - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, January 1, 2017

mudra loan Yojna: मुद्रा कर्ज समज, वास्तव आणि प्रत्यक्ष लाभMudra loan Yojna

मुद्रा कर्ज समज, वास्तव आणि प्रत्यक्ष लाभ

मुद्रा कर्जाचे नाव काढले आणि काही प्रश्न प्रकर्षाने जाणवले. ते पुढील प्रमाणे आहेत :
बँकवाले म्हणतात की मुद्रा कर्जासाठी तारण लागते. योजना सांगते की तारणाची आवश्यकता नाही यापैकी मग खरे कोणाचे? काही बँकात तर बँकेतल्या लोकानांच मुद्रा हा कर्जप्रकार आहे हेच माहिती नसते तेव्हा काय करावे? अशा बँका जर निमशहरी किंवा ग्रामीण भागात असल्या तर अजूनच प्रश्नचिन्ह. कारण पुण्या-मुंबईसारख्या शहरात एका किलोमीटर मध्ये २५-३० बँका सहज सापडतील. त्यामुळे एका बँकेतल्यानी टेकून घेतले नाही तर दुसरी असा विचार हा शहरी भागातला उद्योजक करु शकतो. याउलट ग्रामीण / निमशहरी भागात २५-३० किलोमीटरच्या टप्प्यात एखाद-दुसरी बँक असते. याच एखाद-दुसऱ्या बँकेतल्या लोकांनी मुद्रा कर्ज माहिती नाही. म्हणून उद्योजकाला धुडकावून लावले तर उद्योजक परत उभा राहणार कसा? जाणार कुठे? करणार काय? असे प्रश्न अजून काही प्रश्न विचारले जातात.
“आमचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत. आम्हाला आमचे प्रश्नच समजावून सांगणाराची गरज नाही. आम्हाला या प्रश्नाच्या गर्तेतून वर काढण्यासाठी हात देणारा व वर उचलणारा माणूस पाहिजे. रात्र दिवस दुःखाचा शोक करत बसणे हा काही ते दुःख दूर करण्याचा उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी प्रयत्न करणेच गरजेचे आहे. भेकड होऊन तुमचा काही एक फायदा होणार नाही. निर्भय बना. आम्ही पुष्कळ दिवस रडलो. पण त्याचा काय फायदा? जगातल्या सर्व देवतांची आम्ही रडून प्रार्थना केली. त्याशिवाय परकियांनी वेळोवेळी प्रसुत केलेल्या देवांचीही आम्ही प्रार्थना केली. पण उपयोग शून्य. एकही देव आपल्या कामाला आला नाही. जोपर्यंत आपण स्वतःहून कंबर कसून प्रयत्न करत नाही तोपर्यंत या जगातील एकही देव आपल्या सहाय्याला येत नाही. मग अशा देवांचा काय फायदा? आता रडणे पुरे. उठा, जागे व्हा, सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि जाणून असा की तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. (You are the creator of your own destiny).” – स्वामी विवेकानंद.
स्वामीजींच्या या वाक्यात देव या शब्दाच्या ऐवजी आपण गृहीत धरलेली व्यवसायाला मदत करणारी व्यक्ती असा अर्थ घ्यायचा आहे. तर प्रार्थना या शब्दाचा अर्थ आपण या लोकांकडे केलेल्या विनंत्या व मागण्या असा घ्यायचा आहे. तर आता नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून प्रश्नांच्या गर्तेतून वर काढण्यासाठी हात देणारी व वर उचलणारी माणसे आपल्याला भेटणार आहेत. आपण पहिल्या पिढीचे उद्योजक आहोत. त्यामुळे आपण नेहमी जाणून असले पाहिजे पहिल्या पिढीच्या प्रत्येक गोष्टी करणाऱ्या प्रत्येकालाच प्रंचड त्रास सहन करावा लागतो. प्रचंड समजदारी दाखवावी लागते. व नंतरच आपले प्रयत्न सफल होतात. पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना त्रास सोसावा लागला, पृथ्वी गोल आहे हे सांगणाऱ्या पहिल्या संशोधकाला गिलोटिनवर चढवून मारण्यात आले. अर्थात आपल्याला एवढा त्रास सोसावा लागणार नाही. मात्र प्रचंड प्रमाणात समजदारी दाखवावी लागेल. आणि या समजदारीचा फायदा व्यवसाय वेगाने वाढवण्यासाठी प्रचंड फायदा होणार आहे. तेव्हा आपण थोडी समजदारी दाखवून १०० टक्के मुद्रा कर्ज कसे मिळवायचे? हे पाहू या.
सर्वात पहिली गोष्ट मुद्रा कर्जासाठी कोणत्याही प्रकारचे तारण लागत नाही. तेव्हा बँकवाले हे तारण का मागतात? या प्रश्नाचे उत्तर समजदारीने सोडवू या. बँकांना कर्जदार पाहिजेच असतात. कर्ज वाटली नाहीत. तर बँका ठेवीदारांचे व्याज परत करु शकणार नाहीत. तसेच बँका चालवणे कठीण होईल. पण कर्ज वाटताना कर्जदाराकंडून पैसे व्याजासहित परत मिळण्याची हमी म्हणून तारण घेतले जाते. याउलट आपले प्रश्न असा असतो की माझ्याक़डे तारण ठेवण्याची क्षमता असती किंवा पैसेच असते तर मी कर्ज मागण्यासाठी कशाला बँकांचे उंबरठे झिजवले असते? या दोन्ही गोष्टीचा सुवर्णमध्य व प्रभावी इलाज आहे. तो म्हणजे आपण तयार केलेला आपला बिझनेस प्लॅन. या बिझनेस प्लॅन मुळे हे सिध्द होते की आपण घेतलेले पैसे परत देऊ शकतो. बँकेला विश्वास पटला की बँक कर्ज देतेच. आपल्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन अतिशय योग्यरित्या बनवलेला असला पाहिजे. आणि बँकेला विश्वास पटेपर्यंत परत परत तो सुधारणा करत राहिले पाहिजे. योग्यरित्या त्याचे सादरीकरण सुध्दा महत्त्वाचे ठरते. (तुम्ही जर बिझनेस प्लॅन मध्ये परत परत सुधारणा करुन बँकेला सादर करत असला तर बँकेच्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला खरेच व्यवसाय करायचा आहे आणि तुम्ही निश्चित पैसे परत देऊ शकता. किंवा जास्तीत जास्त वेळा जाऊन तुम्ही रोज त्याला प्रश्न विचारत असाल व प्लॅन मध्ये सुधारणा करत असाल तेव्हा वैतागून एक दिवस कशाला रोज ही कटकट? अशा उदार भावनेतून का होईना आपल्याला कर्ज मिळेलच. आपल्याला कर्ज मिळण्याशी मतलब आहे. त्याच्या मार्गाशी नाही. हे उद्योजकांने लक्षात ठेवले पाहिजे.)
दुसरा प्रश्न काही बँकात तर बँकेतल्या लोकानांच मुद्रा हा कर्जप्रकार आहे हेच माहिती नसते तेव्हा काय करावे? हो हे शक्य आहे. कारण बँकाच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या शाखा, कर्जाचे अगणित प्रकार, याशिवाय सर्व कर्जे ही तारणावरच दिली जातात हा ठाम समज झालेली बँकिंग क्षेत्रातील माणसे अशा प्रकारची क्लिष्ट यंत्रणा असल्याने हे होतेच. सरकारने ज्या अविर्भावात या योजना सुरु केलेल्या असतात. त्या तेवढ्याच क्षमतेने शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा आपल्याकडे नसते. प्रश्नाचे अनेक कंगोरे आणि प्रभावी उत्तरे आपण उद्या पाहू. तोपर्यंत आपल्या बिझनेस प्लॅन तयार करायला सुरवात करुयात. आवश्यक असल्यास बिझनेस प्लॅन कसा तयार करावा याबद्दल आपण एक लेख या मालिकेत समाविष्ट करु. बिझनेस प्लॅन कसा तयार कराव याबाबत ज्या उद्योजकांना माहिती पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये तसे लिहावे. म्हणजे तशा प्रकारे लेखात त्या प्रश्नांची उत्तरे देता येतील. आपले इतर प्रश्नही लिहा. जरुर सोडवले जातील.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here