*बोधकथा*
एका सरळसोट, अरुंद डोंगरातून जाणारी पायवाट होती. दुपारी १२ वाजले होते. रणरणत्या उन्हान बेजार केल होत. एक साधू या मार्गागारून तीर्थयात्रा करत डोंगरावरील देवीला जात होता. त्यच्या जवळ तों शाली, दोन उपरणी, दोन पंचे आणि एक कमंडलू, एवढच समान होत. पण रस्त्याच्या चढणीमुळे त्याला एवढं समान ओझं वाटत होत, आणि घामाच्या धारा त्यांच्या अंगावरून वाहत होत्या. थोडं पुढ गेल्यावर त्याला एक ७० वर्षाची आदिवासी महिला ८ वर्षाच्या झाडावरून पडून पाय मोडलेल्या मुलाला, वैद्यकीय उतारासाठी पाठीवर घेऊन येत होती, असे दिसले. तो मुलगा धष्टपुष्ट होता. ती वृद्धा मोठ्या उत्साहान तो सरळसोट उतरणीचा रस्ता उतरत होती.
साधून त्या महिलेला विचारलं,"आजी इतकं ओझं घेऊन या वयाला तुम्ही ही उतरणीचा रस्ता कसा उतरता? मी तर एवढ्याशा ओझ्यान हैराण झालो आहे." त्या वृद्धेन साधूना नीट निरखून पाहिलं, आणि म्हणाली, "महाराज ओझं आपण वाहत आहात, हा तर माझा नातू आहे!"
*तात्पर्य*
*ख-या प्रेमान केलेल्या गोष्टीच ओझं वाटत नाही*
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.